जेव्हा मीराने केली 'कबीर सिंह' करण्यासाठी शाहिदची मनधरणी

जेव्हा मीराने केली 'कबीर सिंह' करण्यासाठी शाहिदची मनधरणी

बेखयाली में भी तेरा ही खयाल आए… हे गाणं सध्या कानाकोपऱ्यात वाजतंय. हेच गाणं असलेल्या ‘कबीर सिंह’ हा सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलंच यश मिळवलं आहे. तसंच शाहिदची या चित्रपटातील भूमिका आणि त्याच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डीच्या ‘कबीर सिंह’ सिनेमाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत तब्बल 300 करोड रूपयांपेक्षाही जास्त कमावले आहेत. त्यामुळे हा चित्रपट 2019 सालातला सर्वात हिट चित्रपट म्हणून समोर येतोय. पण तुम्हाला माहीत आहे का, शाहिदला या सिनेमा करण्यासाठी तयार केलं होतं त्याची बायको मीरा राजपूतने. 

मीराने केली होती मनधरणी

Instagram

‘कबीर सिंह’ स्टारर शाहिद कपूरने आपल्या ताज्या मुलाखतीत सांगितलं की, मीरा राजपूत अनेक प्रकारे मनधरणी करत त्याला या चित्रपटासाठी राजी केलं होतं. असं अनेकदा होतं की, आपण एखाद्या गोष्टीसाठी तयार नसतो पण तीच गोष्ट आपल्या जवळच्या व्यक्तीने सांगितल्यावर आपण तयार होतो. असं काहीसं झालं शाहिदचं कबीर सिंह या भूमिकेबाबत आणि यातील किसींग सीनमुळे तो द्विधा मनस्थितीत होता. मग त्याने कसा या भूमिकेला दिला होकार.

नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने खुलासा केला की, मीरा ही खूप सकारात्मक विचार करणारी महिला आहे. तिला विश्वास होता की, मीही भूमिका करावी. आम्ही दोघांनीही अर्जुन रेड्डी म्हणजेच कबीर सिंहचा ओरिजिनल सिनेमा एकत्र पाहिला आणि आम्हाला संदीपचं काम खूपच आवडलं. मीराला तेव्हाच कळलं होतं की, कबीर सिंहच्या भूमिकेला खूप वाव आहे. त्यामुळे हा सिनेमा माझ्या करिअर लिस्टमध्ये असलाच पाहिजे. तिने तेव्हाच सांगितलं की, जर मी कबीर सिंहची भूमिका योग्यरित्या सादर केली तर लोकांना नक्कीच आवडेल. त्यानंतर जेव्हा मीराने कबीर सिंह पाहिला तेव्हा तिला तो खूपच आवडला. आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर शाहिदच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तसंच ही त्याच्या करिअरमधील चांगली भूमिका असल्याचं म्हटलं जातंय. 

मीराने केलं शाहिदचं कौतुक

Instagram

शाहिद कपूर स्टारर 'कबीर सिंह' पाहिल्यानंतर मीरा राजपूतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टही केलं होतं की, बेबी आता भरारी घेण्याची वेळ आली आहे आणि ही गोष्ट तंतोतंत खरी ठरली. कबीर सिंहने रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भरारी घेतली आहे. या चित्रपटाने पैसा वसूल गल्ला जमवला आङे. तिसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा हिट जात असून जोरदार कमाई करत आहे.

शाहिद आणि मीराची जोडी

शाहिदने त्याच्या फिल्मी आणि खाजगी आयुष्यात खूप चढउतार पाहिले आहेत. पण मीरा त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याला स्थैर्य मिळालं आहे. मीरा प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत खंबीरपणे उभी असते. नुकतीच या दोघांनी त्यांची अॅनिव्हर्सरीही सेलिब्रेट केली. तसंच शमीराच्या क्युट फॅमिलीबाबत जितकं बोलावं तितकं कमीच आहे. क्युट मिशा आणि क्युट झेन हे दोघंही खूपच गोड आहेत. आपल्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मीराचा त्याने मोबाईलमध्ये सेव्ह केलेला फोटो शेअर करत तिला थँक्सही म्हटलं.