अबब! हुबेहूब शाहरुख खान…सोशल मीडियावर या शाहरुखची चर्चा

अबब! हुबेहूब शाहरुख खान…सोशल मीडियावर या शाहरुखची चर्चा

असं म्हणतात एकसारख्या दिसणाऱ्या किमान सात व्यक्ती तरी संपूर्ण जगात असतात. इतर व्यक्तींसारख्या दिसणाऱ्या सात लोकांचे माहीत नाही. पण जर सेलिब्रिटीप्रमाणे कोणी दिसणारे असेल तर मग सोशल मीडियावर त्याची चर्चा होऊ लागते. पूर्वी डुप्लिकेट हिरो किंवा हिरोईन यांना अनेक कार्यक्रमासाठी बोलावले जायचे. हे डुप्लिकेट सेलिब्रिटीसारखे अगदी 10 ते 20 टक्के दिसायल असतात. पण आताचे डुप्लिकेट त्यांच्या आयडॉलला फॉलो करता करता त्यांची स्टाईलही हुबेहुब फॉलो करतात. सध्या शाहरुख खानच्या हुबेहूब दिसणाऱ्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पाहा तुम्हाला कसा वाटतो हा शाहरुखचा डुप्लिकेट

सरकार दो... शोले चित्रपटातून घराघरात पोहोचलेले विजू खोटे यांचे निधन

कोण आहे ही व्यक्ती

Twitter

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही व्यक्ती नेमकी कोण आहे. अकरम-अल-इसावी असे या व्यक्तीचे नाव आहे. तो पेशाने फोटोग्राफर असून त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर एक प्रसिद्ध फोटोग्राफरने टाकले. जॉर्डनमध्ये राहणारा अकरम सध्या सगळ्यांचेच आकर्षण झाला आहे. शाहरुखप्रमाणे दिसतो म्हणून लोकांनी त्याचे फोटो देखील काढले आहेत.हा फोटो अपलोड होताच अनेकांनी त्यावर कमेंट द्यायला सुरुवात केली आहे. हा काहींना हुबेहुब शाहरुख असल्याचे वाटले तर काहींना काही वर्षानंतर शाहरुख असा दिसेल असे वाटते. या आधीही अकरमला प्रसिद्धी मिळाली आहे. पण पुन्हा एकदा त्याचा फोटो पोस्ट झाल्यानंतर त्याला परत प्रसिद्धी मिळू लागली आहे. 

फोटो काढण्यात आनंद

शाहरुख खानचे चाहते जगभरात आहे. आता अकरम अगदी तसाच दिसत असल्यामुळे त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. पण अकरमला याचा कंटाळा येत नाही. उलट तो अगदी आवडीने आपले फोटो काढू देतो. त्यामुळेच लोक त्याच्याकडे फोटो काढण्यासाठी येतात. सध्या त्याची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत असून  त्याचे फोटो मस्त व्हायरल होताना दिसत आहे. 

शाहरुख सध्या काय करतोय?

Instagram

बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख सध्या काय करतोय असा प्रश्न पडला असेल तर शाहरुखचा सध्या तरी चित्रपटाचा काहीच प्लॅन समोर आलेला नाही. त्याने ‘झिरो’ हा शेवटचा चित्रपट केला. तो कसा होता हे विशेष सांगायला नको. फॅन आणि झिरो हे त्याचे दोन्ही चित्रपट चांगलेच दणदणीत आपटले. या दोन्ही चित्रपटात त्याने काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला खरा पण शाहरुखच्या फॅनला तो तितकासा रुचला असे वाटत नाही.म्हणूनच त्याच्या चित्रपटांना आता फारशी पसंती दिली जात नाही.

फूड डिलीव्हरी करणारा विशाल ठरला 'डान्स दिवाने 2' चा विजेता

मुलगा करणार का डेब्यु

Instagram

आता शाहरुख खानकडे लोकांचे लक्ष नसले तरी त्याचा मुलगा आर्यन खान याकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष आहे. हुबेहुब शाहरुखसारखा दिसणारा आर्यन आता चांगलाच हँडसम आणि हिरो मटेरिअल आहे. त्याचा फिटनेस आणि लुक पाहता त्याने चित्रपटात यावे असे देखील अनेकांना वाटत आहे. आता तो कधी डेब्यु करेल ? त्यासाठी वाट पाहावी लागेल म्हणा. पण शाहरुखची मुलगी सुहाना मात्र तिच्या अॅक्टिंग करीअरसाठी सज्ज झाली आहे. 


बाकी सगळं सोडलं तर सध्या जॉर्डनच्या या शाहरुखची सोशल मीडियावर हवा आहे


खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.