सुहाना खानच्या जन्मानंतर असं बदललं शाहरूखचं आयुष्य

सुहाना खानच्या जन्मानंतर असं बदललं शाहरूखचं आयुष्य

शाहरूख खानची ओळख बॉलीवूडचा किंग खान, बॉलीवूडचा बादशाह अशी आहे. मात्र त्याच्या स्वतःच्या घरात मात्र फक्त त्याच्या मुलांचीच सत्ता चालते. शाहरूखचे त्याच्या तिन्ही मुलांवर खूप प्रेम आहे. शाहरूख खानला आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम अशी तिन मुलं आहेत. शाहरूख त्याच्या बायको आणि मुलांची अगदी एखाद्या नाजूक फुलाप्रमाणे जपणूक करताना आढळतो. स्वतःच्या कामात कितीही बिझी असला तरी कुटुंबासाठी तो आवर्जून वेळ काढतो. एवढंच नाही तर असं म्हणतात की मुलगी सुहाना खान हिच्या जन्मानंतर तर शाहरूखने त्याच्या जीवनशैलीत खास बदल केले होते. कारण मुलगी आणि वडीलांचं नातंच काही खास असतं. यासाठीच जाणून घ्या की शाहरूखच्या जीवनात सुहानाच्या जन्मानंतर असे काय काय बदल झाले होते.

Instagram

वेळेच महत्त्व -

शाहरूखला सुहानाच्या जन्मानंतर वेळेचं महत्त्व पटू लागलं. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचे वडील होता तेव्हा तुम्हाला काही गोष्टी वेळेत कराव्याच लागतात. पूर्वी तुम्ही वेळ पाळा अथवा पाळू नका मुलांच्या जन्मानंतर प्रत्येक पित्याला वेळेचं महत्त्व आपोआप पटू लागतं. कारण तुम्हाला आता तुमच्या मुलांसोबत घालवण्यासाठी पुरेसा वेळ काढावा लागतो. कितीही थकला असला तरी घरी गेल्यावर मुलांच्या निरागसतेमुळे तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटू लागतं. असं म्हणतात शाहरूखदेखील सुहानाच्या जन्मानंतरच त्यांच्या कुटुंबासाठी खास वेळ काढू लागला. 

तडजोड करणे -

जेव्हा तुम्ही नवीन आईवडील होता तेव्हा तुम्हाला आपल्या तानुल्यासाठी झोप कमी करावीच लागते. कारण तुमचं बाळ रात्री कधीही उठू शकतं आणि त्याला तुमच्या दोघांची गरज लागू शकते. शाहरूखची जीवनशैली तर तेव्हा इतकी दगदगीची होती की शूटिंग, चित्रपटांचे प्रमोशन यातून त्याला घरी गेल्यावर गाढ झोप घ्यावी असं वाटायचं. मात्र सुहानाच्याजन्मानंतर त्याने बऱ्याचदा आपली झोपमोड केलेली आहे. अशा छोट्या मोठ्या तडजोडीतर प्रत्येक पित्याला कराव्याच लागतात.

आर्थिक बाजू मजबूत करणे -

मुलं जस जशी मोठी होऊ लागतात. त्यांच्या गरजा तितक्याच वाढू लागतात. तुमच्या मुलांना आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी मिळावं असं तुम्हाला नक्कीच वाटत असतं. या सर्व गोष्टींसाठी मुलांच्या जन्मानंतर तुम्हाला अधिक पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. शाहरूखनेही सुहानाच्या जन्मानंतर स्वतःच्या काम आणि स्टेटसमध्ये वाढ केली. ज्यामुळे तो आज त्याच्या तिन्ही मुलांना एक चांगलं आणि ऐश्वर्यसंपन्न आयुष्य देऊ शकतो. 

स्वतःला चांगल्या सवयी लावणे -

तुमची मुलं तुमचं ऐकण्यापेक्षा तुमचं निरिक्षणच जास्त करत असतात. कारण मुलांचे पहिले आदर्श नेहमी त्यांचे आईवडीलच असतात. म्हणूनच तुम्ही मुलांसमोर कोणतीही चुकीची गोष्ट करू शकत नाही. शाहरूखनेही त्याच्या मुलांच्या जन्मानंतर त्याच्या चुकीच्या सवयी कमी करण्याचा प्रयत्न केला. स्मोकींग, मद्यपान अशी गोष्टी मुलांसमोर केल्या तर त्याचा चुकीचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होऊ शकतो. 

जेव्हा तुम्ही तरूण असता तेव्हा तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे जगत असता. मात्र जेव्हा तुम्ही आईवडील होता तेव्हा मुलांसाठी तुम्हाला काही गोष्टी स्वतःच्या आयुष्यात बदलाव्याच लागतात. अनेक पालकांचा हाच अनुभव आहे. अर्थात या गोष्टी तुम्ही स्वतःहून करत असता कारण तुम्हाला तुमच्या मुलांचे संगोपन योग्य पद्धतीने करायचे असते. त्यांचे भविष्य उज्वल करायचे असते. मग पिता एखादा सेलिब्रेटी असो अथवा सामान्य नागरिक तो त्याच्या मुलांसाठी स्वतःमध्ये असे बदल नक्कीच करू शकतो.