किंग खानची बायको गौरीने सांगितलं हे गुपित

किंग खानची बायको गौरीने सांगितलं हे गुपित

बॉलीवूडचं पॉवर कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान आणि गौरी खान यांच्यावर फॅन्स आणि पापाराझ्झींची नेहमीच नजर असते. किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूखच्या खाजगी आयुष्याबाबतही फॅन्सना जाणून घ्यायचं असतं. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाबद्दलच्या गोष्टी ऐकून फॅन्स नक्कीच प्रभावित होतात. मग ते शाहरूख कुटुंबाची काळजी कशी घेतो याबाबत असो वा त्याची मुलं कुठे शिकायला जातात हे जाणून घेणं असो. जणू हे कळल्याप्रमाणे गौरीने नुकतीच शाहरूखबद्दलची एक खाजगी गोष्ट एका मुलाखतीत शेअर केली. 

शाहरूख आणि गौरीची प्रेमकहाणी तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. दोघांची प्रेमकहाणी आणि आत्तापर्यंतचा प्रवास यामुळेही त्यांचे अनेक चाहते आहेतच. आपल्या स्टार्सबाबत आणि त्यांच्या कुटुंबियाबाबत एखादी गोष्ट कळताच फॅन्स सुखावतात. म्हणूनच स्टार्स वेळोवेळी फॅन्ससोबत नवीन काहीतरी शेअर करतात. गौरीने शेअर केलं शाहरूखबाबतचं धक्कादायक गुपित.

असं म्हणतात की, बायकांना पुरूषांपेक्षा तयारीसाठी जास्त वेळ लागतो. पण गौरीने सांगितलं की, शाहरूखला तयार व्हायला गौरीपेक्षाही जास्त वेळ लागतो. तिने सांगितलं की, जिथे मला पाच मिनिटं लागतात तिथे शाहरूखला पाच तास लागतात. एवढंच नाहीतर गौरीने हेही सांगितलं की, शाहरूखची एक खोली फक्त त्याच्या वार्डरोबने भरलेली आहे. याबाबत शाहरूखला विचारलं असता तो म्हणाला की, मी तर दरवेळी तेच कपडे घालतो. मी ब्लॅक सूट घालतो. पण प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारचा ब्लॅक सूट घालावा लागतो.

काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान आणि गौरी खान या स्टार जोडीने एका इव्हेंटमध्ये सामील झाले होते. या इव्हेंटमध्ये त्यांना मोस्ट स्टाईलिश कपल ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या दरम्यान गौरी आणि शाहरूखने ही गोष्ट शेअर केली होती. 

एवढंच नाहीतर या इव्हेंटमधला शाहरूख आणि गौरीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शाहरूखने बायको गौरीसोबत एंट्री करता करता तिचा गाऊनही सांभाळला होता. या व्हिडिओला शाहरूखच्या फॅन्सनी खूप व्हायरल केलं. तसंच शाहरूखच्या अशाच छोट्या छोट्या क्युट जेस्चर्समुळे तो नेहमी कौतुकही मिळवतो. 

लवकरच होणार शाहरूखचं दर्शन

शाहरूखचं दर्शन अवॉर्ड फंक्शनमध्ये होत असलं तरी अजून मोठ्या पडद्यापासून तो जरा दूरच आहे. त्याचा शेवटचा आलेला सिनेमा म्हणजे झिरो. जो बॉक्सऑफिसवर आपटला होता. त्यानंतर बातमी आली होती की, शाहरूख दिग्दर्शक एटलीच्या सिनेमात दिसणार आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा मात्र अजूनही झालेली नाही. पण आता मेन रोल नाही पण एका कॅमिओला शाहरूखने हिरवा कंदील दिला आहे. 

शाहरुख खान लवकरच आगामी ब्रम्हास्त्र या दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत आहेत. तर अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि डिंपल कपाडीयासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. सूत्रानुसार, चित्रपटात शाहरूखचा गेस्ट अपियरंस असेल आणि शाहरूखची भूमिका रणबीरचा प्रवास पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.  किंग खानने या चित्रपटासाठी आपल्या तारखाही दिल्या आहेत. शाहरूखने या आधीही रणबीरच्या ए दिल है मुश्कील या चित्रपटात कॅमिओ केला होता. 

सो...येणाऱ्या वर्षात शाहरूखच्या फॅन्सना त्यांच्या किंग खानचं दर्शन नक्कीच होईल, यात शंका नाही.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.