आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. पण त्या भाषा किती जणांना वाचता किंवा लिहिता येतात हे नक्की नाही. बऱ्याच जणांना भाषा बोलता येत असली तरीही नीट लिहिता अथवा वाचता येत नाही. यापैकीच एक आहे उर्दू भाषा. उर्दू भाषेचा अनेक ठिकाणी प्रयोग केला जातो. विशेषतः बॉलीवूडमध्ये. त्यामुळेच सरकारने उर्दू भाषा प्रमोट करण्याचं मनावर घेतलं आहे. ही भाषा प्रमोट करण्यासाठी बॉलीवूडच्या स्टार्सची मदत घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख खान, सलमान खान आणि कतरिना कैफ हे तिनही स्टार्स उर्दू भाषेचा लवकरच प्रचार करण्यास सुरुवात करणार आहेत. मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या ऑटोनॉमस बॉडी नॅशनल कौन्सिलिंग फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज (NCPUL) नुसार शाहरुख खान, सलमान खान आणि कतरिना कैफसारख्या सुपरस्टार्सकडून या भाषेचा जास्तीत जास्त चांगला प्रचार करण्यात येऊ शकतो.
शाहरूख, सलमान आणि कतरिना आता होणार उर्दूचा चेहरा
NCPUL ही संस्था उर्दू भाषेच्या प्रचारासाठी कार्यक्रम आयोजित करते आणि यासाठी तरूण मुलांनादेखील ही संस्था एकत्र आणते. इतर भाषांप्रमाणेच उर्दू भाषेचा प्रचार होणंदेखील गरजेचं आहे. NCPUL चे संचालक अकील अहमदच्या म्हणण्यानुसार, बॉलीवूडची प्रसिद्ध नावं शाहरूख खान आणि सलमान खान यांची भेट घेण्यासाठी सध्या ते उत्सुक आहेत. या प्रसिद्ध स्टार्सना काही लाईन्स उर्दू भाषेत बोलण्यासाठी सांगण्यात येईल आणि नंतर त्यांचे व्हिडिओज अन्य कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं आहे.
उर्दू ही बॉलीवूडमध्ये वापरली जाते
उर्दू ही भाषा बऱ्याच बॉलीवूड चित्रपटांमध्ये वापरली जाते. उर्दू भाषेचा उपयोग बरेचदा गाण्यांमधील भावना दर्शवण्यासाठी आणि संवादांमध्येही करण्यात येतो. या भाषेचा लहेजा अप्रतिम असून ही भाषा ऐकायला आणि बोलायला खूप चांगली वाटते. अगदी प्रेक्षकांनाही ही भाषा चांगली वाटते. वास्तविक मिळालेल्या माहितीनुसार 2014-19 दरम्यान मोदी सरकारकडून या गव्हर्नमेंट बॉडीला 332.76 कोटीचं बजेट मिळालं होतं. तर यूपीएच्या काळामध्ये हेच बजेट 176.48 कोटी इतकं होतं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण NCPUL ही संस्था उर्दू मध्ये पुस्तकं पब्लिश करते आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर उर्दू भाषेचा प्रचार करण्यासाठी अनेक कॉन्फरन्सदेखील ही संस्था आयोजित करत असते. याशिवाय ही संस्था अरबी आणि उर्दू भाषेचा डिप्लोमा कोर्सदेखील घेते.
शाहरूख, सलमान आणि कतरिनाकडून कोणतंही स्टेटमेंट नाही
दरम्यान या संदर्भामध्ये शाहरूख खान, सलमान खान आणि कतरिना कैफ या तिनही कलाकारांकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. त्यामुळे नक्की हे तिघं या भाषेचा प्रचार करण्यासाठी उत्सुक आहेत की नाही याची खात्रीलायक बातमी नाही. चित्रपटाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, सलमान आणि कतरिनाचा यावर्षी ‘भारत’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित होत आहे. शिवाय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला ‘नोटबुक’ प्रदर्शित होत आहे. यामध्ये मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन आणि सलमानच्या मित्राचा मुलगा झहीर इकबाल बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शाहरूख खान नेटफ्लिक्सवर आपल्या वेबसिरीजची निर्मिती करण्यामध्ये व्यग्र आहे. शाहरूखने आपल्या कोणत्याही आगामी चित्रपटांबद्दल घोषणा केलेली नाही.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
एकेकाळी ऑडीशनमध्ये रिजेक्ट झालेले हे स्टार्स तुम्हाला माहीत आहेत का?
‘कहोना प्यार है’ फेम क्युट ते हॉट अमिषा पटेलचा नवा ‘हॉट’ व्हिडिओ
मैने प्यार किया फेम भाग्यश्री पटवर्धनचा मुलगा अभिमन्यू करतोय बॉलीवूडमध्ये पदार्पण