आधी बाहुबलीचा आवाज आणि आता महाराष्ट्राचे आराध्यदैवत साकारणार शरद

आधी बाहुबलीचा आवाज आणि आता महाराष्ट्राचे आराध्यदैवत साकारणार शरद

बाहुबली रिलीज होऊन कितीही वर्ष झाली तरी ‘अमरेंद्र बाहुबली याने मैं’ हा डायलॉग आजही आठवला तर अंगावर काटा येतो. प्रभास पडद्यावर बाहुबली साकारत असला तरी त्याला आवाज देणारा शरद केळकर त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाऊन पोहोचला. प्रभासपेक्षाही शरद केळकर सगळ्यांच्या मनात जाऊन बसला. आता शरद आणखी एका मोठ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आवाजाच्या स्वरुपात नाही. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे पात्र पडद्यावर साकारणार आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच शेअर केले असून त्याला छत्रपतींच्या रुपात पाहून त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे.

परिणितीनं अजय देवगणच्या मोठ्या सिनेमातून घेतली एक्झिट, ‘हे’ आहे कारण

या चित्रपटात साकारतोय शिवाजी महाराज

Instagram

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत ‘तान्हाजी’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात शरद शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अजय देवगण या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून काही महिन्यांपूर्वी त्याचाही तानाजी लुक व्हायरल झाला होता. आता या चित्रपटाचे दुसरे आणि महत्वाचे चित्रपट रिलीज झाल्यानंतर या पोस्टरची आणि पर्यायाने शरदची चर्चा होऊ लागली आहे. शरदचा आवाज तर चांगला आहेच आणि अभिनयसुद्धा पण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तो कशी साकारेल याचीही उत्सुकता अनेकांना आहे. 

शरदचा लुक

आतापर्यंत शरद अनेक चित्रपटांमधून ग्रे शेड असलेल्या भूमिका साकारताना दिसला आहे. त्याने जरी नकारात्मक भूमिका चित्रपटात साकारल्या असल्या तरी त्याचा प्रत्येक चित्रपटातील परफेक्ट लुक नेहमीच भाव खाऊन जातो. आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शरद केळकर शिवाजी महाराजांच्या लुकमध्ये कसा दिसेल असा विचारही कदाचित आपण केला नसेल पण या पोस्टरनंतर शिवाजी महाराज साकारावा तर शरद केळकरनेच असे वाटत आहे. शरदला शिवाजी महाराजांचा लुक शोभून दिसत आहे.

सा रे ग म प विजेता एश्वर्य निगम या गायिकेसोबत अडकला लग्नबंधनात

शरद आणि व्हिलन

Instagram

चित्रपटांमध्ये शरद आणि व्हिलन असं समीकरण बनून गेलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्याने निगेटीव्ह रोल साकारले आहेत. नुकताच ‘हाऊसफुल 4’ हा चित्रपट येऊन गेला या चित्रपटातही त्याचा निगेटीव्ह रोल होता. त्याचा रोल निगेटीव्ह असला तरी त्याची प्रत्येक चित्रपटातील एन्ट्री ही इतकी खास असते की कधी कधी निगेटीव्ह रोल असूनही त्याच्या प्रेमात पडायला होतं. पण आता शरद छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय म्हटल्यावर त्याची इमेज यापुढे बदलेलं इतकं नक्की आहे. आता या पोस्टरनंतर टीझर किंवा ट्रेलर कधी येईल याची प्रतिक्षा आहे.

अजय देवगणने शेअर केले पोस्टर

अजय देवगणने शिवाजी महाराजांसोबत या चित्रपटात अन्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे पोस्टर शेअर केले आहेत. प्रत्येक ऐतिहासिक पात्राची ओळख त्याने करुन दिली आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.