Good news: शिल्पा शेट्टी पुन्हा आई, घरी आली लक्ष्मी

Good news: शिल्पा शेट्टी पुन्हा आई, घरी आली लक्ष्मी

शिल्पा शेट्टी हे नाव कोणाला माहीत नाही  असे नाही. शिल्पाने बॉलीवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शिल्पा शेट्टी कुंद्राने गुडन्यूज आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर करत आपल्या चाहत्यांनान एक सुखद धक्का दिला आहे. शिल्पा शेट्टी पुन्हा आई झाली आहे. तिच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला असून तिने या मुलीचे नाव समिशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले आहे. हे वाचून सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. शिल्पाच्या या मुलीचा जन्म सरोगसीद्वारे झाल्याचे स्पष्ट आहे.  कारण शिल्पा सध्या दोन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ही बातमी या शुभमुहूर्तावर शिल्पाने शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टनंतर तिचे अनेक सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी अभिनंदन केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांची महागाथा घेऊन येत आहे मराठमोळा रितेश देशमुख

प्रार्थनांना यश मिळाले आणि घरात चमत्कार झाला

शिल्पाने बाळाच्या  हाताचा गोंडस फोटो शेअर करत आपला आनंद शेअर केला आहे. शिल्पाने पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ओम श्री गणेशाय नमः. आमच्या प्रार्थनेला यश मिळाले आणि घरात चमत्कार झाला. आम्हाला आमच्याकडे आलेल्या या गोड परीचे स्वागत करताना आणि तिच्या येण्याची घोषणा करत असताना अत्यानंद होत आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी या गोड परीचा जन्म झाला असून तिचं नाव समिशा शेट्टी कुंद्रा आहे. सा अर्थात संस्कृतमध्ये हवे असणे आणि मिशा या रशियन शब्दाचा अर्थ देवाप्रमाणे असणारी असा तिच्या नावाचा अर्थ आहे. आमची लक्ष्मी घरात आल्यानंतर आमचं कुटुंब पूर्ण झाल्याचा आम्हाला आनंद आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशिर्वादाबद्दल मी आभारी आहे.’ शिल्पाने अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली असून  तिचा मुलगा वियान राज कुंद्रा हा अतिशय आनंदी असल्याचंही तिने यामध्ये म्हटलं आहे. वियान सध्या आठ वर्षांचा असून आता शिल्पाच्या घरी मुलीचा जन्म झाल्याने त्यांचे कुटुंब पूर्ण झाल्याचेही तिने म्हटलं आहे. तिची ही मुलगी अर्थातच सरोगसीद्वारे जन्माला आली आहे. 

पुन्हा एकदा जरीनची होणार 'मिर्झापूर 2' मध्ये एंट्री

अभिनंदनाचा वर्षाव

शिल्पाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर कमेंट्स आणि अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. शिल्पा नेहमीच वियानला जपते आणि त्याला जास्तीत जास्त चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करते. ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण आपण एक उत्तम आई आहोत हेदेखील तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे. आता तिच्या  घरात पुन्हा एकदा लहान बाळाचा जन्म झाला असून तिला मुलगी झाली आहे आणि तिची जबाबदारी अजून वाढली आहे. 

नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेंडला इशारा, 'माझ्या नावाचा वापर करण्याचं धाडस नको करू'

शिल्पा लवकरच दिसणार दोन चित्रपटांमध्ये

शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. एक नाही तर तब्बल दोन चित्रपटांमधून ती दिसणार आहे. ‘निकम्मा’ या चित्रपटात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीसह शिल्पा असून दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हंगामा 2’ या चित्रपटातही ती दिसणार आहे. हा कॉमेडी चित्रपट असून यामध्ये परेश रावल आणि मिझान जाफरीसह शिल्पा काम करत आहे. या दोन्ही चित्रपटांकडून शिल्पाला अपेक्षा आहेत आणि हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतील असं तिला वाटत आहे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.