नन्ही परी'च्या स्वागतासाठी शिल्पाने ठेवली ग्रँड पार्टी

नन्ही परी'च्या स्वागतासाठी शिल्पाने ठेवली ग्रँड पार्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई बनली आहे. सरोगसीच्या माध्यमातून तिच्या घरी ‘नन्ही परी’ आली असली तरी तिच्या स्वागताची जय्यत तयारी तिने आधीच करुन ठेवली होती. तिने तिच्या मुलीचे नाव समिशा ठेवले असून समीशा आली या आनंदात तिने तिच्या घरी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती आल्या होत्या.समिशाच्या वेलकम पार्टीसाठीच हे सोशल मीडियावरुन व्हायरल झालेल्या फोटोमधून कळत आहे. एकूणच काय समिशाच्या येण्याने कुंद्रा आणि शेट्टी परीवारातील आनंद द्विगुणित झाला आहे.

मुलीचा फोटो केला शेअर

Instagram

शिल्पा शेट्टी हीने स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याचे सांगितले होते. तिने तिच्या हाताचा फोटो शेअर केला होता. 15 फेब्रुवारी रोजी समिशाचा जान्म झाला. या नावाचा अर्थ काय हे देखील तिने या पोस्टमधून सांगितले होते. आता या मुलीच्या स्वागतासाठी काही तरी खास करायला हवे. म्हणूनच तिने तिच्या खास मित्रांसाठी ही पार्टी ठेवली होती. या पार्टीत त्यांनी बरीच धमाल केली असे कळत आहे. शिल्पाने समिशाचा चेहरा दाखवला नसला तरी ती क्युट असेल अशाच प्रतिक्रिया या फोटोंवर येत आहेत.

View this post on Instagram

Celebrating our baby Samisha Shetty Kundra ❤️❤️❤️

A post shared by Akanksha (@akankshamalhotra) on

5 वर्षांपासून व्हायचे होते आई

शिल्पाला विहान नावाचा मुलगा आहे. पण दुसऱ्या बाळासाठी ती गेल्या 5 वर्षांपासून प्रयत्न करत होती. एका मुलाखती दरम्यान तिने याचा खुलासा केला आहे. ती गेल्या फेब्रुवारी महिन्यात  सरोगसीच्या माध्यमातून आई होणार असल्याचेही तिला कळले होते. पण तिने नुकतेच काही चित्रपट साईन केल्यामुळे तिला ते करणं भाग होतं. ‘निकम्मा’ या चित्रपटाचे शुटींग पूर्ण झाले असून तिचा दुसरा चित्रपट ‘हंगामा’ ही संपणार असल्याचे कळत आहे. तिला आता तिच्या मुलीला वेळ द्यायचा आहे. म्हणूनच ती आता एक मोठा ब्रेक घेणार आहे.  समिशासोबत तिला आपला वेळ घालवायचा आहे. त्यमुळेच तिने शुटींगचे शेडयुल बदलून घेतले. तिला समजून घेतल्याबद्दल तिने टिमचेही आभार मानले आहेत. 

Good news: शिल्पा शेट्टी पुन्हा आई, घरी आली लक्ष्मी

कुंद्रा कुटुंबात आनंद

Instagram

शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्या घरी समिशा आल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. महाशिवरात्रीच्या शुभमर्हुतावर तिने आपल्या मुलीचा फोटो शेअर केला. त्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.शिवाय कुंद्रा कुटुंबाला देखील मुलगी हवी होती. त्यामुळे सध्या कुंद्रा कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

अबीर आणि मिष्टीच्या लग्नादरम्यान कलाकारांनी केली धमाल

सरोगसीच्या माध्यमातून बनल्या आई

बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे सरोगसीच्या माध्यमातून आई बनल्या आहेत. गौरी खान, एकता कपूर, किरण खान, तुषार कपूर, करण जोहर, सनी लिओन, कश्मिरा शहा या काही सेलिब्रिटी देखील सरोगसीच्या माध्यमातून आई बनल्या आहेत. 


शिल्पा शेट्टीच्या घरी समिशाच्या रुपात नन्ही परी आल्यामुळे सध्या त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.