शिल्पा शेट्टीच्या मुलाला WWE स्टार John Cena चा खास संदेश

शिल्पा शेट्टीच्या मुलाला WWE स्टार John Cena चा खास संदेश

अभिनेत्री शिप्ला शेट्टी कुंद्रा (Shipa Shetty Kundra) सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच स्वत:चे आणि अगदी तिच्या मुलाचे वियान राज कुंद्राचे (Viaan Raj Kundra) फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. जे व्हायरल होत असतात. शिल्पाचा मुलगा वियान टायगर श्रॉफ आणि WWE स्टार जॉन सिना (John Cena) चा चाहता आहे. तो नेहमीच त्यांच्यासारखी फाईट करायचा प्रयत्न करतानाचे व्हिडिओ शिल्पा पोस्ट करत असते. पण शिल्पा आणि तिच्या मुलाला आता जास्त आनंद झालाय कारण खुद्द जॉन सिनाने वियानला खास संदेश पाठवला आहे. 

वियानचा व्हिडिओ पाहून जॉन सिना प्रभावित

शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान याचा एक व्हिडिओ शिल्पाने शेअर केला होता. ज्यामध्ये वियान आपण जॉन सिनाचे खूप मोठे फॅन असल्याचं सांगत आहे. तसंच त्याने यामध्ये जॉन सिनासंबंधित बऱ्याच गोष्टीही सांगितल्या होत्या. हा व्हिडिओ जॉन सिनानेदेखील पाहिला आणि वियानच्या गोष्टीने जॉनसिना प्रभावित झाला. त्यामुळे त्याने वियान राज कुंद्रासाठी एक खास संदेश पाठवला आहे. हा वियानसाठी आलेला जॉन सिनाचा व्हिडिओ शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जॉन सिनाचा हा मेसेज पाहून दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. आपला आनंद व्यक्त करताना शिल्पाने कॅप्शन दिली आहे की, ‘हे देवा! माझा मुलगा जो 7 वर्षाचा आहे त्याने आपल्या मुलाखतीमध्ये जॉन सिना आणि डब्ल्यू डब्ल्यू ई बद्दल इतकी माहिती दिली आहे. मला खरंच माहीत नाही की, हे सर्व त्याला कसं माहीत आहे. माझ्या मुलाचं स्वप्नं या संदेशातून साकार झालं असून त्यासाठी मी मनापासून WWE आणि जॉनसिनाचे आभार मानत आहे.’

जॉन सिनाचा खास संदेश

वियानला जॉन सिनाने एका व्हिडिओद्वारे खास संदेश पाठवला आहे. त्यामध्ये जॉन सिनाने वियानला आपला मित्र म्हटलं असून त्याला म्हटलं, ‘हे वियान, मी तुझा मित्र जॉन सिना बोलतोय. मी तुझा व्हिडिओ आणि तुझे मसल्स पाहिले. आता मला जिममध्ये जाऊन अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.’ या व्हिडिओमध्ये वियानसाठी जॉन सिनाने गाणंही गायलं आहे. जॉन सिना हा WWE चा खूप मोठा स्टार असून जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. तसंच जॉन सिनाने बॉलीवूडमध्ये एका चित्रपटातही काम केलं आहे. याआधी अंडरटेकरनेही बॉलीवूडमध्ये अक्षयकुमारबरोबर काम केलं आहे. 

वियानचे आधीही झालेत व्हिडिओ व्हायरल

शिल्पा शेट्टीच्या मुलाला फायटिंग आणि त्वायकोंंडोमध्ये खूपच इंटरेस्ट आहे. इतक्या लहान वयातही सकाळी लवकर उठून तो मेहनत घेऊन या गोष्टींचं शिक्षण घेत आहे. टायगर श्रॉफ आणि जॉन सिना हे त्याचे आदर्श असून तो त्यांच्यासारखं होण्याचा आतापासून प्रयत्न करत आहे. याआधीदेखील वियान राज कुंद्राचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून तो मार्शल आर्ट्सदेखील शिकत आहे. शिल्पा नेहमीच आपल्या मुलाचे फोटो आणि व्हिडिओ अभिमानाने शेअर करत असते. तर काही महिन्यांपूर्वीच वियानने एका रियालिटी शो मध्ये उपस्थिती लावली होती जिथे त्याने आपल्या काही करामतीही करून दाखवल्या होत्या. तेव्हाही एक आई म्हणून शिल्पाची मान अभिमानाने उंचावली होती. आता हळूहळू वियानदेखील शिल्पाच्याच पावलावर पाऊल ठेवणार असं चित्र सध्या दिसत आहे.