या कारणामुळे शिल्पा शेट्टी होती बॉलीवूडपासून दूर

या कारणामुळे शिल्पा शेट्टी होती बॉलीवूडपासून दूर

‘चुरा के दिल मेरा गोरीया चली’ म्हणत सगळ्यांचं हृदय चोरणारी बॉलीवूडची हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. तब्बल 13 वर्षांच्या गॅपनंतर ती बॉलीवूडमध्ये येत आहे. शिल्पा जरी मोठ्या पडद्यापासून किंवा चित्रपटापासून दूर राहिली तरी ती नेहमीच इंडस्ट्रीचा भाग होती. मग ते तिच्या सोशल मीडियावरील योगा मीडियामुळे असो वा रिएलिटी शोजच्या जज करण्याने असो. ती सतत तिच्या फॅन्सशीही कनेक्टेड होती. मग तिच्या या आगामी प्रोजेक्टमध्ये असं काय खास आहे की, तिने पुन्हा अभिनय करण्याचं ठरवलं?

शिल्पाचा कमबॅक प्रोजेक्ट

View this post on Instagram

And it beginss.. ⁣💙 #Nikamma

A post shared by Shirley (@shirleysetia) on

आपल्या फिटनेस आणि लुक्समुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते. आता शब्बीर खानच्या एक्शन फिल्म ‘निकम्मा’मधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. हा एक रोमँटीक कॉमेडी सिनेमा असल्याचं कळतंय. तब्बल 13 वर्षांच्या गॅपनंतर हाच चित्रपटाचं निवडण्याचं कारण मात्र अजून कळलेलं नसलं तरी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये फ्रेश जोडी पदार्पण करत आहे ती म्हणजे शर्ली सेटीया ही इंडो-किवी सिंगर आणि अभिमन्यू दास्सानी.

बॉलीवूडपासून दूर राहण्याचं कारण

2007 साली शिल्पाच्या आलेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने या चित्रपटानंतर ती कधी मोठ्या पडद्यावर दिसली नाही. तिचा चित्रपटापासून दूर राहण्याचा निर्णय हा तिचा स्वतःचा आणि तिने विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता, असं तिचं म्हणणं आहे. जेव्हा तुम्ही लाईमलाईटमध्ये नसता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी मिस करता. तेव्हा तुम्हाला वाटतं की, तुम्ही फेमपासून दूर जात आहात आणि लोकं तुम्हाला विसरून जातील. पण हे सगळं मिस नाही केलं कारण मी तेव्हा छोट्या पडद्यावर काम करत होते. आपल्या आत्तापर्यंतच्या अभिनयाच्या प्रवासाकडे वळून बघताना शिल्पा म्हणते की, अभिनेत्री बनणं माझ्या नशिबात होतं.

शिल्पाच्या आयुष्यातला ‘तो’ किस्सा

Instagram

शिल्पाच्या आयुष्यातला अभिनयाशी निगडीत एक किस्साही तिने नुकताच एका शोमध्ये शेअर केला. मी 15 वर्षांची असताना एका इव्हेंटमध्ये गेले होते आणि एका माणसाने माझ्याकडे पाहून सांगितलं की, फोटोशूट करून घे. पुढच्याच दिवशी ते फोटो एका शोच्या सेटवर वाटण्यात आले आणि सुरूवात झाली माझ्या फिल्मी करिअरची. आयुष्यातल्या त्या एका घटनेने तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही.

‘धडकन’ने जिंकलं शिल्पाने सगळ्यांचं मन

शिल्पा शेट्टीने बॉलीवूडमधल्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण आजही तिचे चाहते तिचा धडकन हा चित्रपट आवर्जून पसंत करतात. याबाबतचा एक किस्साही शिल्पाने शेअर केला आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन जो दाखवण्यात आला आहे तो नव्हताच. तो बदलण्यात आला. खरंतर हॅपी एडींगमुळे या चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला. खरंतर आधी अंजली देवला सांगते की, ती रामच्या मुलाची आई होणार आहे. हे ऐकताच देवचा मृत्यू होतो पण हे खूपच ट्रॅजिक होतं. त्यामुळे ते बदलून असं दाखवण्यात आलं की, देव महिमासोबत निघून जातो.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.