अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी '15' नंबर आहे लकी, जाणून घ्या कसा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी '15' नंबर आहे लकी, जाणून घ्या कसा

भाग्य, लक, गुडलक, लकी चार्म या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या मानण्यावर आहेत. त्यामुळे कोणासाठी कुठली गोष्ट ‘लकी’ असेल हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या अंकाला खास स्थान नक्कीच असतं. मग ती कोणाची तरी जन्मतारिख असेल किंवा अंकशास्त्रानुसार आलेला एखादा अंक. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातदेखील असाच एक अंक लकी असल्याचं तिचं म्हणणं आहे. नुकतंच शिल्पाने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून याचा खुलासा केला आहे. शिल्पाच्या मते तिच्या आयुष्यात ‘15' या अंकाला खास महत्त्व आहे. जाणून घेऊ या यामागे नेमकं काय गुपित आहे…

'15' नंबर आहे शिल्पा शेट्टीसाठी लकी

शिल्पा शेट्टी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली असून तिला सरोगसीच्या माध्यमातून मुलगी झाली आहे हे सर्वांना माहीत असेलच. शिल्पाची मुलगी आता दोन महिन्यांची झाली आहे. शिल्पाने तिच्या मुलीसोबत म्हणजेच शमीशा शेट्टी कुंद्रासोबत खेळत असलेला एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये शिल्पाने तिच्या आयुष्यात असलेल्या पंधरा या अंकाचं महत्त्वदेखील सांगितलं आहे. शमीशाचा जन्म ‘15’ फेब्रुवारीचा असल्यामुळे शिल्पाला ‘15’ अंक लकी वाटत आहे. शिवाय यासोबतच या ‘15’ एप्रिलला तिच्या टिकटॉक व्हिडिओला ‘15 मिलीयन’ म्हणजे एक करोड पन्नास लाख फॉलोव्हर्स झालेले आहेत. तिचे  आणि राजचे टिकटॉक व्हिडिओ पाहण्यासाठी तिने तिच्या सर्व फॉलोव्हर्सचे आभार व्यक्त केले आहेत आणि 15 अंक तिच्यासाठी कसा लकी ठरला आहे हे देखील शेअर केलं आहे. 

 

 

टिकटॉकवर शिल्पा करतेय 'राज'

राज आणि शिल्पा सध्या टिकटॉवर व्हायरल होताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रेटी टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. मात्र यामध्ये शिल्पा आणि राजच्या टिकटॉक व्हिडिओजनां सर्वात जास्त पसंती मिळत आहे. शिल्पा तिच्या पतीसोबत दररोज या व्हिडिओमधून काहीतरी मजेशीर शेअर करत असते. पूर्वी तिचे एकटीचे टिकटॉक व्हिडिओ असायचे मात्र यामघ्ये आता राज कुंद्रा आणि शिल्पाची बहीण शमीता शेट्टीदेखी बऱ्याचदा दिसते. लॉकडाऊनमध्ये शिल्पा तिच्या कुटुंबासोबत वेळ आनंदात घालवताना सध्या दिसत आहे.कदाचित यामुळे तिला तिच्या मुलीकडे थोडा जास्त वेळ देता येणं शक्य आहे.

शिल्पा लवकरच दिसणार ‘निकम्मा’मध्ये

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे बॉलीवूडचे एक हॅपी कपल आहे. त्यांच्या लग्नाला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत.त्याचबरोबर ती आता विहान आणि शमीशाया दोघांची प्रेमळ आईदेखील आहे. शिल्पा नेहमीच तिच्या मुलाला काहितरी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत असते. शिल्पाने लग्नानंतर चित्रपटात काम करणं कमी केलं होतं. मात्र शिल्पा बऱ्याचदा रिअॅलिटी शो आणि फिटनेस व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत असते. तिचे फूड आणि फिटनेस असे दोन्ही व्हिडिओज प्रेक्षकांना फार आवडतात. लवकरच शिल्पा बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार आहे. तिचा ‘निकम्मा’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र आता लॉकडाऊनमुळे कदाचित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.