शिल्पा शेट्टीने मुलगा वियान सोबत केलं वर्कआऊट

शिल्पा शेट्टीने मुलगा वियान सोबत केलं वर्कआऊट

शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील एक फिट अभिनेत्री आहे. कारण ती तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात परफेक्ट समतोल सांभाळत आहे.चित्रपटाच्या पडद्यावरील भूमिका जी जितक्या कौशल्याने साकारते तितक्याच कुशलतेने कुंटुबाकडे लक्ष देते. एक चांगली मुलगी, बहीण, पत्नी आणि आई असल्याने तिच्या चाहत्यांना तिच्या बद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. शिवाय ती सोशल मीडियावर देखील फार अॅक्टिव्ह असते. तिच्या करिअर आणि कुंटुबाविषयी नेहमी अपडेट देत असते. नुकताच तिने तिचा मुलगा वियान याच्यासोबत वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून देशभराती मातांना तिने फिटनेसबाबत जागरुक केलं आहे.

शिल्पाचा फिटनेस मंत्रा


या व्हिडीओ मध्ये शिल्पा ट्राइसेप्स वर्कआऊट करत आहे. वर्कआऊट करताना तिने तिचा मुलगा वियानला मांडीवर घेतलं आहे. ती व्यायाम करता करता तिच्या मुलासोबत गप्पा मारत आहे. यामधून तिने सर्व मातांना असा संदेश दिला आहे की एखादा आईला तिच्या बाळाला सांभाळण्यासाठी विशेषतः तो मुलगा असेल तर जास्त शारीरिक क्षमतेची गरज असते. त्यामुळे सर्व मातांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं असं तिला यातून सांगायचं आहे. शिल्पा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेसचे धडे देत असते. ती स्वतः नेहमी व्यायाम, योगासने, डाएट याच्यावर जास्त भर देते. त्यामुळेच ती एक मुलाची आई असूनही इतकी सुंदर आणि फिट आहे.


महिलांसाठी फिटनेस टिप्स बद्दल देखील वाचा
शिल्पा मुलावर करतेय सुसंस्कार


काही दिवसांपूर्वीच शिल्पाने तिच्या मुलासोबत आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये वियान त्याची आजी म्हणजेच शिल्पाची आई सुनंदा शेट्टी यांचे पाय दाबत होता. या व्हिडिओला देखील चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली होती. या व्हिडिओ मध्ये शिल्पा तिच्या मुलाला विचारत आहे की, बेटा तू काय करत आहेस? यावर वियान सांगत आहे की “मी आजीच्या पायांना मालिश करत आहे.” वियानच्या या उत्तरावर शिल्पा मुलाला समजावत आहे की वियान आजीच्या पायांना मालिश केल्यामुळे तुला भरपूर आर्शिवाद मिळतील. यावरून शिल्पा तिच्या मुलावर जे संस्कार करत आहे याचा अंदाज येतो. शिल्पा नेहमीच तिच्या मुलाला सतत चांगले विचार आणि संस्कार देण्याचा प्रयत्न करत असते. शिल्पाचे सध्या लहान मुलांच्या रिअॅलिटी शोची जज आहे. या शोमध्ये देखील मुलांसोबत तिचे एक छान बॉंडिंग दिसून येते.


खरंच महेश भटने कंगनावर फेकली होती का चप्पल


हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' थोडेसे बदल (Healthy Lifestyle Tips In Marathi)


निरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Fitness Tips For Women In Marathi)


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम