‘शिमगा’ चित्रपटातून घडणार कोकणातील शिमगोत्सवाचं दर्शन

‘शिमगा’ चित्रपटातून घडणार कोकणातील शिमगोत्सवाचं दर्शन

कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणात होळीच्या सणाला 'शिमगोत्सव' असं म्हणतात. त्यामुळे होळीत कोकणातील प्रत्येक घराला उत्सवाचं स्वरूप प्राप्त होत असते. शिमग्याच्या पालखीसाठी चाकरमानी आवर्जुन गावी जातात. थोडक्यात 'शिमगा' हा कोकणी माणसाचा अगदी आवडता सण असतो. याच शिमगोत्सवाचं दर्शन घडविणारा 'शिमगा' चित्रपट 15 मार्चला प्रदर्शित होत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

So here's a hint in continuation to my recent post. One of the 2 looks!


A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on
 


शिमगोत्सवासाठी शिमग्याची टीम सज्ज


केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित 'शिमगा' चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन निलेश कृष्णा करत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं टीझर आणि गाणी प्रदर्शित करण्यात आली होतं. राजेश शृगांरपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहेत. राजेश शृंगारपुरेने 'झेंडा', 'युद्ध' अशा अनेक मराठी आणि 'मर्डर 3', 'सराकार राज' या हिंदी चित्रपटातून काम केलं आहे. तर भूषण प्रधान 'कॉफी आणि बरंच काही', 'सतरंगी रे', 'टाईमपास' या चित्रपटात प्रेक्षकांनी पाहिलं आहे. शिमगा चित्रपटातील संगीत पंकज पडघन यांचं असून या चित्रपटातील गीतं गूरू ठाकूर आणि वलय यांची आहेत. शिमगा चित्रपटाच्या टीझरमध्ये शिमाग्याचा पालखी उत्सव आणि गावकऱ्यांचे भांडणतंटे दाखविण्यात आले आहेत. देव मोठा की माणसाचे मान-अपमान या विषयावर हा चित्रपट बेतलेला असण्याची शक्यता आहे.

Subscribe to POPxoTV 

 

 


View this post on Instagram


 

 

My 2019 begins with this!


A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on
शिमगोत्सवाचं अनोखं दर्शन


कोकणातील शिमगोत्सव हा प्रत्येक गावकऱ्याचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. चाकरमानी या सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. शिमग्याची पालखी ग्रामदैवताच्या मंदीरापासून गावातील प्रत्येकाच्या घरोघरी नेण्यात येते. गावोगावी शिमग्याची पालखी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचविण्यात येते. या शिमग्याच्या पालखीतून ग्रामदेवता स्वतः विराजमान होऊन प्रत्येक गावकऱ्याला दर्शन देण्यासाठी घरोघरी येते अशी ग्रामस्थांची भावना असते. त्यामुळे घरात गोडाधोडाचा नैवद्य केला जातो. कोकणवासियांच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर बेतलेला 'शिमगा' चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सहाजिकच चाकरमानी यंदाच्या होळीसोबत शिमगोत्सवासोबतच शिमगा चित्रपटाचीही आतुरतेने वाट पहात आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Super excited... Need your wishes 😊


A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on
अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या घरी ‘या’ नव्या पाहुण्याचं जंगी स्वागत


आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम