स्वप्नं पूर्ण होतात....शिव ठाकरेने दिला चाहत्यांना संदेश

स्वप्नं पूर्ण होतात....शिव ठाकरेने दिला चाहत्यांना संदेश

#BBM2 चा विजेता ठरला विदर्भाचा पोट्टा शिव ठाकरे. शिवला लोकांनी दिलेल्या भरपूर प्रेमामुळे अखेर त्याचं बिग बॉस जिंकण्याचं स्वप्नं पूर्ण झालं. त्याचं विजेता म्हणून नाव घोषित होताच एक जल्लोष झाला. पाहा बिग बॉस जिंकताच शिवने त्याच्या चाहत्यांचे मानलेले आभार.

शिवचा बिग बॉसमधला प्रवास

शिवला बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडमध्ये सगळ्या कंटेस्टंटनी अपात्र ठरवून बाहेर काढायचं ठरवलं होतं. पण शिवने हार न मानता बिग बॉसचा प्रवास सुरूच ठेवला. अखेर तोच शिव टॉप 5 मध्ये आला आणि नेहाला मोठ्या मतांच्या फरकाने हरवून Bigg Boss Marathi 2 चा विजेता ठरला. बिग बॉसच्या घरात त्याला वीणासारखी पार्टनर मिळाली. अभिजीत आणि वैशालीच्या रूपात दादा-ताई मिळाले आणि मैत्रीण म्हणून हिना पांचाळ मिळाली. बिग बॉसच्या प्रत्येक टास्कमघ्ये शिवने स्वःताला झोकून दिलं आणि अनेकदा तो जिंकलाही. एका टास्कच्या दरम्यान त्याने आरोहला केलेल्या इजेमुळे त्याच्यावर टिकाही झाली. पण हळव्या शिवने इमोशनल होत त्याचीही माफी मागितली. अखेरपर्यंत बाप्पा मोरया म्हणत त्याने सर्वांचं मन जिंकलं आणि बिग बॉसच्या ट्रॉफीला आपलसं केलंच. शिवला तब्बल 17 लाखांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.

वीणा आणि शिवचं नातं

बिग बॉसच्या सिझनमध्ये शिव आणि वीणाच्या सो कॉल्ड मैत्रीची खूप चर्चा झाली आणि त्यांच्यावर टिकाही झाली. पण तरीही हे दोघं शेवटपर्यंत एकत्र राहिले. अगदी काल विजेता घोषित होण्याआधीही शिवच्या घरच्यांनी मजेमजेत दोघांच्या जोडीला पसंती दिल्याचंही चित्र होतं. तर विनर ठरल्यावर शिवने वीणाला मिठी मारून तिच्यासोबत डान्सही केला. फिनालेसाठी या लोकांच्या फेव्हरेट जोडीने खास रोमँटिक डान्सही केला. पाहा त्याची झलक….

एका दिवसात दोन स्वप्नांची पूर्ती

रिएलिटी शो शिवसाठी नवा नाही. कारण बिग बॉस मराठी मध्ये येण्याआधी त्याने रोडीज नावाच्या हिंदील रिएलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे शिवचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स होते. पण त्याला महाराष्ट्रातल्या घराघरात पोचवलं ते बिग बॉसने. आज शिवला बिग बॉसच्या रूपात दोन स्वप्नं पूर्ण करता आली आहेत. एक तर त्याला बिग बॉसचा विनर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरं म्हणजे निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्याल त्यांच्या आगामी चित्रपटात भूमिका देण्याचं कबूल केलं आहे.