शिव- वीणाच्या ब्रेकअपच्या बातमीवर या व्हिडिओने फिरवले पाणी

शिव- वीणाच्या ब्रेकअपच्या बातमीवर या व्हिडिओने फिरवले पाणी

सेलिब्रिटी कपलच्या लिंकअपची बातमी पसरायला फारसा वेळ लागत नाही. लिंकअपच्या बातमीनंतर त्यांच्यामागे सगळ्यांचा ससेमिरा लागतो. ते काय करतात? कुठे जातात? कोणते फोटो पोस्ट करतात? याकडे सगळ्यांचेच लक्ष असते.पण याच कपलने जर त्यांचे फोटो पोस्ट केले नाही तर मात्र त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाही जोर धरु लागतात. असेच काहीसे झाले आहे. बिग बॉस मराठी फेम शिव-वीणाच्या बाबतीत. या रिअॅलिटी शो नंतर एकदम प्रकाशझोतात आलेली ही जोडी लोकांना जबरदस्त आवडली. पण काही काळ एकमेकांचे फोटो त्यांनी पोस्ट केले नाही आणि त्यांच्या ब्रेकअपची चर्चा जोर धरु लागली पण या नव्या व्हिडिओमुळे आता या ब्रेकअपच्या बातमीला थोडा ब्रेक लावलेलाच बरा असे तुम्हालाही वाटेल.

शिव-वीणाने घातलाय सेम मास्क

होळीच्या निमित्ताने शिवने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये शिवने चेहऱ्यावर मास्क घातला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर साहजिकच वीणा कुठे ? असा प्रश्न अनेकांना पडला. पण वीणाने एक व्हिडओ शेअर केला आणि सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या. कारण शिवने घातलेला तो मास्क आणि वीणाचा मास्क तोच आहे. त्यामुळे या दोघांनी हा दिवस एकत्र साजरा केला आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे. वीणा तेथे असून देखील त्या दोघांनी एकत्र व्हिडिओ करणे टाळले असे दिसत आहे आता हे नवीन काय? असा प्रश्न पडणे त्यामुळे साहजिक आहे. पण बाकी काही गोष्ट फारसी स्पष्ट नसली तरी देखील त्या दोघांचे ब्रेकअप झाले नाही हे नक्की!

माई-माधवचा असा अवतार पाहिल्यामुळे प्रेक्षकांना बसला धक्का, उलगडणार वाड्याची कथा

शिवने सांगितले होते कारण

बिग बॉस मराठी संपल्यानंतर काही काळ ते सोशल मीडियावर सतत एकत्र दिसत होते. त्यांनी त्यांचे अनेक फोटो शअर केले होते. पण जसा जसा काळ जाऊ लागला तसतसे त्यांचे फोटो कमी होऊ लागले. एरव्ही  त्यांचे एकमेकांच्या फोटोवर त्यांच्या रोमँटीक कमेंट्सही असायच्या पण आता या कमेंटसही कमी झाल्या आहेत. ज्यावेळी शिवला या संदर्भात विचारण्यात आले त्यावेळी मात्र त्याने त्याची बाजू स्पष्ट केली होती. करिअरकडे लक्ष देणे फार गरजेचे असल्यामुळे ते सध्या एकत्र दिसत नाही. सध्या वीणा ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या मालिकेचे शुटींग असल्यामुळए तिला फारसा वेळ मिळत नाही. दुसरीकडे शिवही त्याच्या कामामध्ये व्यग्र आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. 

आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

बिग बॉसमध्ये जुळले प्रेम

बिग बॉस मराठीमध्ये वीणा जगताप आणि रोडीज फेम शिव ठाकरे यांची ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांनाही कळले नाही. पण बरेचदा रिअॅलिटी शोमध्ये होणारी नाती ही फार काळ टिकत नाहीत. ती केवळ रिअॅलिटी शोपुरती मर्यादीत राहतात. या दोघांच्या नात्याबद्दलही अनेकांना असाच संशय येत होता. पण या दोघांनी हे नाते टिकवले. ते अजूनही टिकून आहे हे या नव्या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे. 


आता जर तुम्ही शिव-वीणाचे चाहते असाल तर अजिबात काळजी करु नका काऱण शिव-वीणामध्ये सगळे आलबेल आहे.

स्टार किड्ससाठी तारणहार ठरतोय करण जोहर