#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात अनेक नाट्यमय गोष्टी पाहायला मिळत आहेत. या पर्वात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या पहिल्या पर्वापेक्षा नवीन आहेत. शिवाय या पर्वामधील स्पर्धकदेखील मागील पर्वातील स्पर्धंकांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत. दुसऱ्या पर्वात सुरूवातीपासून एका स्पर्धकाच्या नावाची फार चर्चा झाली… ते नाव म्हणजे ‘शिवानी सुर्वे’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानी सुर्वे ही या पर्वातील एक स्ट्रॉंग स्पर्धक होती. मात्र तिला तिच्या प्रकृती अस्वास्थामुळे बिग बॉसच्या घरातून पडावं लागलं होतं. मात्र आता शिवानी पुन्हा बिग बॉसच्या घरात अगदी अचानक दाखल झाली आहे. शिवानीची ही एन्ट्री अगदी नाट्यमय पद्धतीने झाली असली तरी त्यामुळे तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे. शिवाय आता शिवानीच्या अशा परत येण्यामुळे बिग बॉसच्या घरातील खेळाची रंगत अधिकच वाढत जाणार आहे. 

Instagram

काय म्हणाले शिवानीचे 'आई-बाबा'

शिवानी बिग बॉसच्या घरी पुन्हा परत आल्यामुळे तिच्या चाहत्यांप्रमाणेच तिच्या घरच्यांनादेखील खूप आनंद झाला आहे. याबाबत शिवानीच्या आई-बाबांनी त्यांचं मत व्यक्त केलं, “आम्हाला नेहमीच शिवानी बिग बॉसची विनर व्हावी असं वाटत होतं. शिवाय तिला चाहत्यांकडून तसा प्रतिसादही मिळत होता. मात्र अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर यावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आम्ही तिची वैद्यकीय चाचणी आणि तिच्यावर योग्य उपचार केले. त्यामुळे शिवानी आता पूर्णपणे बरी झाली आहे. शिवाय आता बिग बॉसने तिला आता पुन्हा घरात जाण्याची संधी दिली आहे. शिवानी बिग बॉसमध्ये पुन्हा गेल्यामुळे आम्हाला नक्कीच फार आनंद झाला आहे. सध्या ती बिग बॉसच्या घरात एक पाहुणी म्हणून गेली आहे. जे घरातील इतर सदस्यांना सांगण्यास तिला मनाई करण्यात आली आहे. मात्र आई-वडील म्हणून आम्हाला ती बिग बॉसच्या घरात पुन्हा एक सदस्य असावी आणि या सिझनची विनर ठरावी असंच वाटत आहे.”

Instagram

शिवानीच्या चाहत्यांची प्रतिक्रिया...

शिवानी सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोव्हर्स आहेत. आता शिवानी बिग बॉसमध्ये परत आल्यामुळे तिच्या चाहत्यांना फारच आनंद झाला आहे. शिवानीचं असं  परत येणं चाहत्यांसाठी एक सुखद आनंदाचा धक्काच आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला भरघोस शुभेच्छा आणि कंमेट्स देण्यास सुरूवात केली आहे. ‘वेलकम बॅक शिवानी’, ‘शिवानी परत आली’, ‘आमची वाघीण परत आली’ अशा शब्दात चाहत्यांनी तिचं स्वागत करण्यास सुरूवात केली आहे. शिवानीच्या चाहत्यांच्या या प्रतिक्रिया पाहून शिवानी घरात फक्त पाहुणी म्हणूनच राहणार की ती पुन्हा घरातीलच एक सदस्य होणार हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. शिवाय सध्या बिग बॉसच्या घरातील जे वातावरण आहे त्यामध्ये शिवानी नेमकी कोणाच्या ग्रूपमध्ये जाणार, ती नेमकी किती दिवस बिग बॉसच्या घरात राहणार,  शिवानी आणि वीणा-शिवचं जमणार की वाजणार, बिग बॉसचा निर्णय बदलला तर शिवानी बिग बॉसची विनर होऊ शकेल का अशा अनेक गोष्टींची उकल बिग बॉसच्या पुढील भागातून प्रेक्षकांना होणार आहे. या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आता बिग बॉसच्या घरातील खेळ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत हे मात्र नक्की!

अधिक वाचा

#BBM च्या घरात पुन्हा पडली वादाची ठिणगी

प्रियांकाने गायले नीक जोन्सचे गाणे, व्हिडिओ झाला व्हायरल

Birthday Special: चित्रपटातून काढून टाकल्यावर रडली होती कतरिना, पण हाल बघून सलमान हसला

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम