एकेकाळी बॉलीवूडमध्ये खूप चर्चा झाली होती या लव्ह ट्रॅंगल्सची

एकेकाळी बॉलीवूडमध्ये खूप चर्चा झाली होती या लव्ह ट्रॅंगल्सची

बॉलीवूडच्या दुनियेत जितकं ग्लॅमर आहे तितकं दुःखही आहे. इथे प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडत असतं. कुणी कुणाच्या प्रेमात पडतं तर कुणी अनेक वर्षांच्या नात्याला अचानक पूर्णविराम देतं. रिलेशनशिप स्टेटस तर दररोज बदलत असतात. एवढंच नाही तर या  कलाकारांना त्यांची तुटलेली आणि  जोडलेली नाती स्वीकारण्यास मुळीच वेळदेखील लागत नाही. काही वेळा यामुळे प्रेमाचे त्रिकोण तयार होतात आणि ज्यांची चर्चा अफेअर आणि ब्रेकअपपेक्षाही जास्त रंगते. यासाठीच जाणून घेणार आहोत बॉलीवूडमधले असे काही लव्ह ट्रॅंगल ज्यांची चर्चा आजही केली जाते. 

सलमान, कतरिना आणि रणबीर -

कतरिनाची जोडी बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त शोभली ती बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसोबत. सलमानचे चाहते कतरिनाला आजही सलमानची प्रेयसीच मानतात. त्यांच्या प्रेमाविषयी चित्रपटातही खुलेपणाने बोललं जातं. मात्र जेव्हा कतरिना सलमानला डेट करत होती तेव्हा तिचं एकीकडे रणबीर कपूररसोबतही सूत जमलं होतं. अजब प्रेम की गजब कहानी आणि राजनिती या दोन चित्रपटांमध्ये त्यांच्यातील जवळीक वाढली होती असं म्हटलं जातं. रणबीरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी तिने सलमानसोबत असलेलं जुनं नातं तोडलं होतं. मात्र आता ती या दोघांपैकी कोणत्याच रिलेशनशिपमध्ये नाही. रणबीर आणि आलिया भटचं सूत जुळलं आहे. सलमानने जुन्या गोष्टी विसरत कतरिनाशी पुन्हा मैत्री केली आहे.

शाहिद, करिना आणि सैफ अली खान -

एक काळ असा होता की शाहिद आणि  करिना  एकमेकांच्या पूर्ण प्रेमात बुडाले होते. मात्र टशन चित्रपटात करिना सैफ अली खानच्या जवळ आली आणि शाहिदसोबतचं तिचं नातं दुरावलं गेलं. पुढे सैफ अली खान आणि करिना यांच्या नात्याचा बॉंड इतका वाढला की जब वी मेट चित्रपटादरम्यान मोठ्या पडद्यावर बेस्ट जोडी ठरूनही करिना आणि शाहिदचं ब्रेकअप झालं होतं.  2007 साली करिनाने शाहिदसोबत ब्रेकअप केलं आणि 2012 साली तिने सैफशी लग्नगाठ बांधली. आता शाहिद  मीरा राजपूतसोबत आणि करिना सैफ अली खानसोबत आपापल्या संसारात सुखी आहेत. 

कतरिना, रणबीर आणि दीपिका -

एकेकाळी या तिघांच्या लव्ह ट्रॅंगलचीदेखील सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. बचना ए हसिनो या चित्रपटादरम्यान रणवीर कपूर आणि दीपिका  पादकोण एकमेकांच्या खूप जवळ आले. मात्र नंतर अजब प्रेम की गजब कहानी हा  चित्रपट करत असताना रणबीर कपूर कतरिनाकडे आकर्षित झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजनिती चित्रपटादरम्यान रणबीर कपूर आणि कतरिना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रणवीरने दीपिकाला धोका दिला. ज्यामुळे या तिघांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली. आता दीपिका रणवीर सिंहसोबत लग्न करून खूश आहे. रणवीर कपूर आलिया भटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि कतरिना त्याच्यापासून दूरावली आहे. 

सलमान खान, ऐश्वर्या रॉय आणि विवेक ओबेरॉय -

हम दिल दे चुके सनम या चित्रपटादरम्यान ऐश्वर्या रॉय आणि सलमान खान यांच्यामध्ये अफेअर असल्याची चर्चा होती. मात्र चित्रपटाप्रमाणेच त्यांच्या नात्याचाही गोड शेवट झाला नाही. कारण सलमानच्या वागण्याचा कंटाळा येऊन ऐश्वर्याने विवेक ओबेरॉयसोबत नातं जुळवलं. मात्र त्यामुळे सलमान आणि विवेकच्या नात्यात टशन निर्माण झाली होती. दोघांनीही त्यावेळी त्यांच्यातील भांडणे मीडियासमोर उघड केली होती. मात्र नंतर हळूहळू सर्व काही निवळू लागलं. ऐश्वर्याने  अभिषेक बच्चनसोबत संसार थाटला आणि या दोघांपासून दूर झाली. मात्र तो एक असा काळ होता जेव्हा या तिघांच्या नात्याविषयी खूप चर्चा झाली होती. 

शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना -

बॉलीवूडमधील हा एक अतिशय त्रासदायक लव्ह ट्रॅंगल होता. में खिलाडी तू अनाडी नंतर अक्षय आणि शिल्पा एकमेकांना डेट करू लागले होते. या दोघांची ऑनस्कीन केमिस्ट्री हिट ठरत होती. असं असतानाच अक्षयने शिल्पाची बेस्ट फ्रेंड ट्विंकल खन्नाला डबल डेट करणं सुरू केलं. जेव्हा ही गोष्ट शिल्पाला समजली तिने या नात्यातून बाहेर पडणं योग्य समजलं. पुढे अक्षयने ट्विंकल खन्नासोबत विवाह केला आणि शिल्पाने राज कुंद्रासोबत संसार थाटला.