इन्स्टाग्रामवर दीपिकालाही मागे टाकलं श्रद्धा कपूरने, सर्वात जास्त आहेत फॉलोव्हर्स

इन्स्टाग्रामवर दीपिकालाही मागे टाकलं श्रद्धा कपूरने, सर्वात जास्त आहेत फॉलोव्हर्स

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्राम फॉलोव्हर्स सातत्याने वाढत आहेत. ज्यामुळे तिने आता अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही याबाबतीत मागे टाकलं आहे. श्रद्धाचे सध्या इन्स्टाग्रामवर एकूण पाच करोड पासष्ट लाख फॉलोव्हर्स आहेत. ज्यामुळे इतर बॉलीवूड अभिनेत्रींशी तुलना केल्यास तिने आता दीपिकाला यात मागे टाकलं आहे तर प्रियंका चोप्राच्या ती खूप जवळ गेली आहे. दीपिकाच्या इन्स्टाग्राम फॉलोव्हर्सचा आकडा हा पाच करोड तेवीस लाख आहे तर प्रियंकाचा पाच करोड ब्याऐंशी लाख आहे. आतापर्यंत याबाबत प्रियंका आणि दीपिकामध्ये स्पर्धा सुरू होती. ज्यामध्ये त्या दोघी सतत एकमेकींच्या मागेपुढे जात होत्या. मात्र त्यात आता श्रद्धा कपूरचीदेखील भर पडली आहे. श्रद्धाच्या फॉलोव्हर्सची वाढती संख्या पाहता ती कधीही प्रियंका चोप्राच्या पुढे जाऊ शकते. प्रियंका चोप्राचे बॉलीवूड आणि हॉलीवूड असे दोन्ही मिळून इतके फॉलोव्हर्स आहेत. श्रद्धाचे त्या तुलनेत पाच करोड पासष्ट लाख फॉलोव्हर्स असणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. 

View this post on Instagram

#happysunday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

श्रद्धा कपूर इन्स्टा फॉलोव्हर्समध्ये ठरतेय अव्वल

भारतीय सेलिब्रेटीजची तुलना करता अभिनेत्रींमध्ये श्रद्धा सध्यातरी नंबर वनवर आहे. भारतीय सेलिब्रेटीजमध्ये विराट कोहलीचे इन्स्टाग्राम फॉलोव्हर्स हे सर्वात जास्त आहेत. विराटचे एकूण आठ करोड वीस लाख फॉलोव्हर्स आहेत. दीपिका आणि प्रियंकाचे नाव मागच्या वर्षी फेक फॉलोव्हर्स असणाऱ्या युझर्सच्या यादीत आले होते. इन्स्टिट्युट ऑफ कंटेम्परेरी म्युझिक परफॉर्मन्स (ICMP) द्वारा करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये दीपिकाचे जास्तीत जास्त फॉलोव्हर्स हे ऑटोमेटेड आहेत असं आढळलं होतं. श्रद्धा कपूरच्या फॉलोव्हर्सची संख्या देखील मागच्या एक वर्षापासूनच वाढलेली आहे. मात्र तिचे इन्स्टाग्राम पेज हे तिच्या ग्लॅमरस फोटो, चित्रपट आणि प्रोफेशनल अपडेट्स, ब्रॅंड इनडॉर्समेंट आणि  चित्रपटांचे प्रमोशन यांनी भरलेले आहे. ज्यामुळे तिचे फॉलोव्हर्स हे खरे असल्याचं दिसून येत आहे. श्रद्धानंतर आलिया भटचे पाच करोड दहा लाख, नेहा कक्करचे चार करोड ब्याऐंशी लाख, अक्षय कुमारचे चार करोड अडूसष्ट लाख, जॅकलिन फर्नांडिसचे चार करोड बासष्ट लाख, कतरिना कैफचे चार करोड अठ्ठेचाळीस लाख फॉलोव्हर्स आहेत. 

श्रद्धाच्या मेहनतीचे आहे हे फळ

श्रद्धा कपूर मागील काही वर्षांपासून तिच्या अभिनय, डान्स आणि लुक्समुळे लोकप्रिय होत आहे. शिवाय ती सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते आणि चाहत्यांना अपडेट देत असते. सोशल मीडियावरील तिच्या फॉलोव्हर्सचा वाढलेला हा आकडा तिच्या कामाबाबत असलेल्या प्रामाणिकपणाचं एक प्रतिक आहे. वडील दिग्गज अभिनेते असूनही मेहनतीने आणि अभिनयातून तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. श्रद्धा तिच्या शहाणपण आणि सकारात्मकतेमुळे चाहत्यांना सतत आकर्षित करत आहे. ज्यामुळे आता ती बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटीजपेक्षा जास्त लोकप्रिय ठरत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर झपाट्याने वाढत असलेले फॉलोव्हर्स या गोष्टीची ग्वाही देत आहेत. श्रद्धाने तिच्या या लोकप्रियतेचा चांगला वापर करत प्राणी कल्याण आणि प्राणी अधिकार याबाबत जागरुकता वाढवण्याचं सामाजिक कार्य केलेलं आहे. त्यामुळे तिच्यामधील ही सकारात्मकताच तिला यशाच्या शिखरावर नेत आहे.