श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

बॉलीवूडमध्ये लग्नसराईचा सीजन काही संपण्याचं नाव नाही. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे की, यावर्षी फरहान अख्तर-शिबानी दांडेकर, रणबीर कपूर- आलिया भट आणि अर्जून कपूर- मलायका अरोरा लग्न करण्याची शक्यता आहे. पण या जोड्यांच्या लग्नाबाबत कोणतीही ऑफिशिअल बातमी अजून आलेली नाही.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Getting ready for the biggest haldi ceremony of the year 💛💖


A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on
या यादीमध्ये अजून एका बॉलीवूड सेलिब्रिटीचं नाव सामील होण्याची शक्यता आहे. ते नाव म्हणजे अभिनेत्री श्रद्धा कपूर. श्रद्धा लवकरच तिच्या कथित बॉयफ्रेंड आणि सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबत विवाहबद्ध होऊ शकते.

हे दोघंही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत आहेत आणि दोघांनी 2018 सालापासून एकमेकांना डेट करायला सुरूवात केली.


rohan shrestha and shraddha kapoor


श्रद्धा आधीच एका वाईट रिलेशनमधून बाहेर पडली आहे आणि आता तिला सेटल होण्याची इच्छा आहे.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

Celebrating 👨‍👩‍👧‍👦🏝🌊❤️ @siddhanthkapoor


A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on
सूत्रानुसार, श्रद्धा 33 वर्षांची असल्यामुळे तिच्या आईबाबांचा लग्नासाठी तिच्यावर दबाव असल्याचं कळतंय. यामुळेच श्रद्धाने लग्नाबाबत रोहनशी बोलणं केलं आहे. जर सगळं व्यवस्थित झालं तर पुढच्या वर्षी श्रद्धाचं लग्न होऊ शकतं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happy Valentine’s Day! With love from us Street Dancers 💃🏻❤️🇬🇧🇮🇳


A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on
श्रद्धाच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ती सध्या 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटासाठी शूटींग करत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात वरूण धवन दिसणार आहे.

याशिवाय ती प्रभासच्या आगामी 'साहो'मध्ये आणि 'छिछोरे' या चित्रपटातही झळकणार आहे. 


हेही वाचा -


अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा


‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट


अभिनेत्री अॅमी जॅक्सनला करायचंय 'या' खास ठिकाणी लग्न