श्वेताच्या 'डॉक्टर डॉन'मधील भूमिकेवर सुश्मिता सेनचा प्रभाव

श्वेताच्या 'डॉक्टर डॉन'मधील भूमिकेवर सुश्मिता सेनचा प्रभाव

काही वर्षांपूर्वी आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्वेता शिंदे पुन्हा एकदा तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. श्वेता सध्या 'डॉक्टर डॉन'ची डार्लिंग डीन म्हणून लोकप्रिय होत आहे. झी युवा वाहिनीवरील ही मालिका सध्या प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. ज्यामुळे डॉनला वश करणाऱ्या या डार्लिंगविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. मात्र एवढंच नाही श्वेताच्या या भूमिकेवर अभिनेत्री सुश्मिता सेनचा प्रभाव आहे. 

Instagram

डॉक्टर डॉनमध्ये श्वेताची नेमकी काय आहे भूमिका

श्वेताच्या प्रत्येक भूमिकेवर तिचे चाहते भरभरून प्रेम करतात हे सर्वांना माहीत आहेच मात्र आता यात चक्क एका इंटरनॅशनल डॉनची भर पडली आहे. श्वेता साकारत असलेली मेडिकल कॉलेजची डीन अतिशय शिस्तप्रिय आहे. नियमबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल डॉन ‘देवा’ अॅडमिशन घेतो आणि खरी धमाल सुरू होते. या मालिकेतील ‘देवा’ हा डीनच्या प्रेमात असल्यामुळे तिच्यावर छाप पाडण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत असतो. देवा वेगवेगळ्या पद्धतीने डीनला प्रपोज करताना मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यासाठी तो नेमकं काय काय करणार हे या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. श्वेताच्या मते या भूमिकेबद्दल तिला विचारणा केली, त्यावेळी तिला सुश्मिता सेनचा फोटो दाखवण्यात आला होता. या मालिकेसाठी ती अशी दिसणं अपेक्षित आहे असं तिला सांगण्यात आलं होतं. श्वेताच्या मते जर असा आदर्श तिच्यासमोर असेल तर निश्चितच काम करण्याची प्रेरणा आपोआपच मिळते. शिवाय तिने याआधी साकारलेल्या अनेक भूमिकांमध्ये तिने एकतर्फी प्रेम केलेलं आहे. या भूमिकेत मात्र एक हिरो हिरोईनच्या प्रेमात पडलाय. खलनायिकेच्या भूमिकेतून  आणि एकतर्फी प्रेम करून करून श्वेता कंटाळली होती त्यामुळे ही भूमिका तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. 

श्वेताने सांगितला देवदत्त नागेचा फिटनेस फंडा

देवदत्त नागेच्या फिटनेसबद्दल सगळ्यांनाच अनेक गोष्टी माहीत आहेतच. श्वेताने देवदत्तच्या  फिटनेसबाबतचे काही खास सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिच्या मते देवदत्त एवढा फिट आहे कारण त्याची वर्कआऊट करण्याची कोणतीच विशिष्ट वेळ नाही. दुपारी दोन वाजता, संध्याकाळी सहा वाजता, मध्यरात्री बारा वाजता किंवा अगदी पहाटे दोन वाजता सुद्धा देवदत्त व्यायाम करताना दिसू शकतो. इतकी मेहनत घेतल्यावर तो फिट असणार यात शंकाच नाही. श्वेताच्या मते डॉक्टर डॉनची संपूर्ण टीम खूप यंग आणि एनर्जेटिक असल्यामुळे सेटवर नेहमी खेळीमेळीचं वातावरण असतं. या मालिकेचं शूटिंग एका कॉलेजमध्ये होत असल्यामुळे तिला देखील तिच्या कॉलेजचे दिवस पुन्हा अनुभवायला मिळत आहेत. डॉ. डॉनची संपूर्ण गॅंग  मिळून सेटवर ऑन-स्क्रिन आणि ऑफस्क्रीन धमाल सुरू असते. 

श्वेता शिंदेचा अभिनय प्रवास

श्वेता मूळची साताऱ्याची ती महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत आली. मुंबईत महाविदयालयात शिक्षण घेत असतानाच तिच्या दिलखेचक सौंदर्यामुळे तिला सतत मॉडेलिंग च्या ऑफर येऊ लागल्या. सौंदर्य आणि तिचा आत्मविश्वास यामुळे घरचा पाठिंबा नसतानाही तिने या ऑफर्स स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पहिले नाही. कारण या ऑफर्ससोबत तिला अनेक उत्तोमत्तम मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारायला मिळाल्या.  ज्यामुळे तिला महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्धी मिळाली. सध्या ती निर्मिती क्षेत्रात वळली असल्यामुळे प्रचंड बिझी झाली आहे. त्यामुळे तिला अभिनयासाठी हवा असेलला वेळ देता येत नाही. या क्षेत्रातही तिने चमकदार कामगिरी केली. लोकप्रिय मालिका ' लागीर झालं जी’ आणि सध्या सुरु असलेली ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची यशस्वी रित्या तिने निर्मिती केली. आता श्वेताने पुन्हा एकदा अभिनयक्षेत्रात पुनरागमन केलं आहे.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

'दबंग' सलमानचा हळवेपणा पुन्हा दिसला, पूरग्रस्त गाव घेतले दत्तक

नेहा कक्करविषयी आदित्यच्या मनात आहेत या भावना, आदित्य म्हणाला…

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘मंगली’ ला मराठीचे वेध