श्वेता तिवारीने आपल्या दुसऱ्या नवऱ्याची केली पोलिसात तक्रार, मुलीला मारल्याचा आरोप

श्वेता तिवारीने आपल्या दुसऱ्या नवऱ्याची केली पोलिसात तक्रार, मुलीला मारल्याचा आरोप

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी बऱ्याच कालावधीपासून टीव्हीवर काम करत नाहीये. ती आपल्या कुटुंबामध्ये व्यस्त आहे. तिने अभिनव कोहलीबरोबर दुसऱ्यांदा लग्न केलं आणि ती स्थिरावली अशा बातम्या येत असतानाच काही महिन्यांपासून यांच्यामधील नातं बिघडलं असल्याच्याही बातम्यांना सुरुवात झाली आहे. श्वेता तिवारी पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसेला बळी पडल्याच्या बातम्यांना जोर येऊ लागला आहे. श्वेताच्या दुसऱ्या नवऱ्याने तिची मुलगी पलक तिवारीवर हात उगारला असल्याचं कळत आहे. 

वेबसिरीजचे चाहते असाल तर या 5 वेबसिरीज तुम्ही पाहिल्यात का?

अभिनवने मारली पलकच्या थोबाडीत

सुत्रानुसार मागच्या वर्षीपासून श्वेता आणि अभिनवमधील नातं विस्कटत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण ही गोष्ट दोघांनीही मान्य केली नाही. श्वेताने या गोष्टीवर बोलण्यास नकार दिला होता तर अभिनवने ही गोष्ट फेटाळून लावली होती. पण आता पुन्हा अभिनवने रागाने श्वेताची मुलगी पलक तिवारीवर हात उगारला असल्याचं समोर आलं आहे. यानंतर श्वेता पोलीस स्टेशनमध्ये पोहचली असंही सांगण्यात आलं आहे. 

अभिनव दारूच्या नशेत

View this post on Instagram

Together we Stand...

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024) on

सुत्रांच्या म्हणण्यानुसार पोलीस स्टेशनमध्ये श्वेता आपली मुलगी पलकबरोबर खूपच आरडाओरडा करत रडत होती. श्वेताने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे अभिनव नेहमी दारूच्या नशेत असतो. यानंतर अभिनवला पोलिसांनी साधारण रात्री 1 च्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्यानंतर 4 तास त्याची चौकशी केली. त्यानंतर श्वेताने हे प्रकरण घरीच निकालात काढण्याचा निर्णय घेतला असून कोर्टकचेरी या प्रकरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान अभिनवविरूद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे अभिनवने श्वेताच्या मुलगी पलक हिला अभद्र शिव्या दिल्या असून तिच्याशी अश्लील भाषेत व्यवहार केला. तसंच ऑक्टोबर 2017 मध्ये पलकला त्याच्या मोबाईलमधील मॉडेलचे अश्लील फोटो दाखवून तिचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे अभिनववर समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनवला त्यानंतर अटक झाली असून त्याचा तपास करण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

या' अभिनेत्री प्रमोट करत आहेत Nude Yoga, व्हायरल झाले फोटोज

श्वेताचा पहिला नवराही करायचा मारझोड

View this post on Instagram

😃

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरीबरोबर झालं होतं. श्वेताच्या पहिल्या नवऱ्याकडूनही तिला अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे तिने काही कालावधीनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. राजा बऱ्याचदा दारू पिऊन तिला मारायचा. तसंच तिच्या शो च्या सेटवर जाऊन तिच्याबरोबर वाईट वागायचा. 9 वर्षांच्या लग्नानंतर श्वेता राजापासून वेगळी झाली. 2007 मध्ये तिने घटस्फोट घेतला. पलक ही श्वेता आणि राजा यांची मुलगी आहे. त्यानंतर अभिनेता अभिनव कोहली याला तीन वर्ष डेट केल्यानंतर 2013 मध्ये श्वेताने पुन्हा लग्न केलं. अभिनवने पलकलादेखील पित्याचं प्रेम द्यायचं कबूल केलं. तर या दोघांना 2016 मध्ये एक मुलगा झाला. त्यानंतर मागच्या वर्षीपासून या दोघांमध्ये खटके उडायला लागल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पलकही नेहमी तिच्याबद्दल सर्व काही सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पलक दिसायला सुंदर असून तीदेखील लवकरच टीव्ही क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं सांगण्यात येत होतं. पण अजूनही पलकने कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करण्यास सुरुवात केलेली नाही. पण सोशल मीडियावर पलकचे अनेक चाहते आहेत. 

‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलीवूडच्या ‘राहुल’ला