श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नातही अडचणी, पतिविरोधात पहिल्यांदा बोलली श्वेता

श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नातही अडचणी, पतिविरोधात पहिल्यांदा बोलली श्वेता

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत सगळ्यांचा अन्याय सहन करणारी प्रेरणा सगळ्यांच्याच परिचयाची आहे. हे पात्र निभावणाऱ्या श्वेता तिवारीच्या खऱ्या आयुष्यातील परिस्थिती ही काही वेगळी नाही. आयुष्याचा पहिला जोडीदार निवडताना ती चुकली म्हणून तिने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला खरा. पण या दुसऱ्या लग्नातही ती समाधानी नाही. हे तिनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. तिच्या संसारातील अंतर्गत गोष्टी तिने पहिल्यांदाच मीडियासमोर मांडल्या आहेत. 

कपिल देवचा ‘नटराज शॉट’ लगावताना दिसला रणवीर सिंह, शेअर केला फोटो

काय म्हणाली श्वेता तिवारी?

instagram

श्वेता तिवारीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, मला लोक विचारतात दुसऱ्या लग्नातही अडचणी येऊ शकतात का? त्या सगळ्यांना मला सांगावसं वाटतं की, हो दुसऱ्या लग्नातही अडचणी येऊ शकतात. मला माझ्या अडचणींना कसे सामोरे जायचे ते माहीत आहे. मी कोणत्याही परिस्थितीत रडत न बसता लढण्याला अधिक जास्त  महत्व देते आणि आजही मी जे बोलत आहे ते माझ्या कुटुंबाचा विचार करुनच बोलत आहे. त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी मी सगळं काही करु शकते. मग यामध्ये पती चुकीचा वागला असेल तर त्याची तक्रार करायलाही मी मागे पुढे पाहत नाही. 

का होती १३ वर्ष बॉलीवूडपासून दूर शिल्पा शेट्टी

काही दिवसांपूर्वी पती विरोधात केली तक्रार

Instagram

श्वेता आणि अभिनव यांच्या नात्यात काही अडचणी असल्याचे तेव्हा लक्षात आले ज्यावेळी श्वेता तिवारी कांदिवली समता नगर पोलीस स्टेशनमध्ये स्वत:च्या मुलीसोबत पोहोचली. तिने अभिनवच्या गैरवर्तनाबाबत तक्रार नोंदवल्याचेदेखील कळले. पण त्यावेळी तिने त्यावेळी उपस्थित मीडियाशी बोलणे पसंत केले नाही. ती तेथून निघून गेली. पण त्यांच्यामध्ये काही ठिक नसल्याचे तेव्हाच कळले होते. त्यानंतर असे कळले होते की, अभिनव कोहली श्वेताची मोठी मुलगी पलकसोबत वाईट वागला होता. तिच्यासोबत त्याने असभ्य वर्तन केल्यामुळेच ती चिडली होती आणि थेट पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले होते.

महिलांना दिला सल्ला

श्वेता तिवारी त्या मुलाखतीदरम्यान पुढे म्हणाली की, प्रत्येक महिलेच्या संसारात काहीना काही अडचणी असतात.पण त्या महिला समोर येऊन कधीच काही बोलत नाही. त्या सगळ्या महिलांना मला सांगावेसे वाटते की, तुम्ही समोर येऊन या गोष्टी बोला.  तर काही जण लग्न झालेले असूनही विवाहाव्यतिरिक्त इतरांशी संबंध ठेवतात. असे काही करण्यापेक्षा त्या व्यक्तीला सोडलेले बरे आणि ते त्याला सांगितलेले बरे नाही का? 

दोन्ही लग्नांमध्ये अडचणी

Instagram

श्वेता तिवारी प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने खूपच कमी वयात भोजपुरी अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केले. राजापासून तिला एक मुलगी आहे. पण सतत संशय घेणं, शिवीगाळ करणं, मारणं यामुळे श्वेता तिवारी आणि राजामध्ये दुरावा आला. मीडियासमोर अनेक तमाशे केल्यानंतर ही दोघं वेगळी झाली. 2007 साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतरही श्वेताच्या आयुष्यात राजाने अनेक पेच प्रसंग उभे केले. त्यामुळे तिच्या करिअरवरही त्याचा फार परिणाम झाला. 2013 साली तिने अभिनेता अभिनव कोहलीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव रेयांश असे आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.