'कसौटी जिंदगी की' ची 'प्रेरणा' श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅक

'कसौटी जिंदगी की' ची 'प्रेरणा' श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅक

सीरियल "कसौटी जिंदगी की" सिझन 1 ची 'प्रेरणा' म्हणजेच श्वेता तिवारीच्या सर्व फॅन्ससाठी आहे खूषखबर. लवकरच प्रेरणा म्हणजेच श्वेता टीव्ही पुन्हा एकदा दमदार भूमिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. श्वेता तिवारीला ओळख मिळाली ती एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की या सीरियलमुळे. प्रेक्षक आजही तिला श्वेता तिवारी नाहीतर प्रेरणा म्हणून ओळखतात. श्वेता तिवारीने तिचा मुलगा रेयांश याच्या जन्मानंतर काही काळासाठी ब्रेक घेतला होता. ज्यामुळे ती छोट्या पडद्यापासून काही काळ दूर होती. श्वेताची भूमिका असणारी बेगूसराय ही शेवटची मालिका 2016 मध्ये आली होती. पण आता ती लवकरच नवीन भूमिका आणि नवीन सीरियलमधून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.  


श्वेताची मुलगी पलक तिवारीचं ही टीव्हीवर पदार्पणआपल्या नातीसोबत करणार कमबॅक


Shweta Tiwari TV returns4


श्वेता तिवारी लवकरच चॅनल अँड टीव्हीवरच्या मन्नत या नव्या डेली सोपमध्ये दिसणार आहे. या सीरियलमध्ये श्वेतासोबत दिसणार आहे कृतिका सेनगर. कृतिकाने कसौटी जिंदगी की सिझन 1 मध्ये श्वेताच्या नातीची भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना या आजी आणि नातीच्या जोडीला एकत्र टीव्हीवर पाहता येईल.  


'कसौटी जिंदगी की ’ मालिका सोडल्यानंतर हिना खान कुटुंबासोबत मालदीवमध्येअनिता हसनंदानी दिसणार व्हॅम्पच्या रूपात


Shweta Tiwari TV returns3
सूत्रानुसार, या सीरियलमध्ये व्हॅम्पच्या भूमिकेत दिसणार आहे टीव्हीवरची प्रसिद्ध नागिन अनिता हसनंदानी. मुख्य म्हणजे पहिल्यांदाच श्वेता तिवारी आणि अनिता हसनंदानी एका सीरियलमध्ये एकत्र दिसणार आहेत. या आधी अनिताने ये है मोहब्बतें व्हॅम्पची भूमिका केली आहे. या सीरियलमध्ये तिने रमन आणि ईशिता यांना खूपच हैराण केलं होतं. पण नंतर मात्र या भूमिकेला सकारात्मक करण्यात आलं होतं. नागिनमध्येही अनिता सकारात्मक भूमिकेत दिसली होती. आता बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा तिला व्हॅम्पच्या भूमिकेत बघणं नक्कीच इंटरेस्टींग असेल.  


पाहा अनिता हसनंदानीचे '61' सुंदर आणि स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्सनाटकांमध्ये सक्रीय होती श्वेता तिवारी


Shweta Tiwari TV returns 1


सीरियलच्या दुनियेपासून भलेही श्वेता तिवारी 3 वर्ष लांब असली तरी या दरम्यान तिने अभिनयाशी तिचं नातं कायम ठेवलं होतं. आपल्या मुलाला पूर्ण वेळ देत असतानाच श्वेता तिवारी नाटकांमध्ये काम करत होती. या निमित्ताने तिने अनेक शहरांमध्ये जाऊन नाटकं सादर केली. जिथे ती आपला मुलगा रेयांश यालाही सोबत नेत होती. आता एवढ्या लांब काळानंतर श्वेता तिवारीला टीव्हीवर बघणं हे तिच्या फॅन्ससाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. हे मात्र नक्की.