अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा वादात, अभिनवने केले गंभीर आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा वादात, अभिनवने केले गंभीर आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहलीच्या नात्यात गेल्या वर्षीपासून आलेली तफावत आता कोणाहीपासून लपून राहिलेली नाही. तेव्हापासून अभिनव कोहली मीडियासमोर आला नसला तरीही सोशल मीडियावरून मात्र पोस्ट करत अभिनवने श्वेता आणि आपण अजूनही एकत्र असल्याचे सांगितलं होतं. पण श्वेताने त्यावरही आखपाखड करून अभिनव खोटं बोलत असल्याचे सांगितले. दोघांचीही ही भांडणं आता अगदी चव्हाट्यावर आले आहे. पण आता अभिनवने पुन्हा एकदा गंभीर आरोप करत श्वेता तिवारीवर ताशेरे ओढरे आहेत. 

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, केला खुलासा

अभिनवने मांडली व्यथा

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनवने श्वेतावर गंभीर आरोप लावत आपला मुलगा रेयांशला श्वेता  आपल्याला भेटूही देत नसल्याचे म्हटले आहे. रेयांशला भेटता न आल्यामुळे आपल्याला अतिशय त्रास होत असल्याचेही त्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी पोलिसात तक्रार झाल्यानंतर अभिनव आणि श्वेताचं नातं चव्हाट्यावर आलं होतं. मात्र त्यानंतरही आपण एकमेकांशी व्यवस्थित बोलत असल्याचे अभिनवने सांगितले आहे. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत अभिनव समोर आला नव्हता. पण आता आपल्याला फसवणूक झाल्यासारखी वाटत असून यावर बोलणं गरजेचं आहे असं वाटत असल्यामुळेच समोर आल्याचं अभिनवने सांगितलं आहे. ‘श्वेताला गरज असताना  प्रत्येक वेळी आपण तिच्या मागे उभे राहिल्याचेही त्याने सांगितले. तिच्या आणि मुलांच्या गरजेची काळजी आपण घेत असल्याचेही त्याने सांगितले. मग रात्री 2-4 कितीही वाजलेले असले तरीही मी तिच्या मदतीसाठी जातो. ती मला मात्र नोकरासारखी वागवते. मला माझ्या मुलाबरोबर राहायचं आहे. पण ती मला त्याला भेटूनही देत नाहीये. कोणत्याही तरी एनजीओ अथवा ह्युमन राईट्स संस्थेने पुढे येऊन यामध्ये मला मदत करावी असंही मला वाटत आहे. दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे मी माझ्या मुलाला भेटलो नाही. मुलाला दोन्ही पालकांचं प्रेम मिळावं यासाठी मी गप्प आहे. माझ्या चार वर्षाच्या मुलाने मला सांगितले की मला तुझी आठवण येत नाही. हे त्याला कसं कळणार. श्वेता त्याला इतकं वाईट कसं काय शिकवू शकते याने मला अधिक त्रास झाला आहे. हे नातं व्यवस्थित व्हावं यासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत.’

अभिनेत्री श्वेता तिवारी झाली हेअर स्टायलिस्ट, घरातच कापले मुलाचे केस

मुलगा रेयांशसाठी तुटतो जीव

View this post on Instagram

Together we Stand...

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024) on

यापुढे  जाऊन अभिनवने सांगितले की मला रेयांशला न भेटण्यासाठी कोविड 19 चे कारण देण्यात आले. ‘अचानक हे  कारण देण्याचा काय अर्थ आहे. जर मी 15 मे ला भेटू शकतो तर कोरोना व्हायरस त्यापूर्वी दोन महिने आहे. पण त्याआधीसुद्धा त्याच्या सुरक्षेसाठी मी त्याला भेटायला गेलो नाही. पण रेयांशने अचानक व्हिडिओ कॉल चालू असताना फोन फेकून दिला आणि घाबरून मी भेटायला गेलो तर मला पोलिसांना बोलावून श्वेताने हाकलून लावलं. मला फक्त माझ्या मुलाची काळजी आहे  यामध्ये माझा कोणताही दोष नाही. मग मला ही वागणूक का? त्यावेळी माझा बांध फुटला आणि रडायला लागल्यावर पोलिसाने मला सावरलं. रेयांशला भेटण्यासाठी माझा जीव तुटत आहे पण श्वेता सतत काही ना काही कारणं देत आहे’

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा करणार लग्न, केला व्हिडिओ शेअर

माझे सगळे प्रॉब्लेम्स बाजूला ठेऊन मी श्वेताची काळजी घेतली आहे. 2016 पासून ती घटस्फोट मागत आहे पण मुलांसाठी सगळं काही विसरून आपली भांडणं सोडवूया असंच तिला सांगत आलो आहे. तिला काम करायचं होतं म्हणून मुलाला सांभाळण्यासाठी मी माझं करिअर बाजूला ठेवलं आणि इतकं असूनही ती माझ्यावर आरोप लावत आहे असंही अभिनवने सांगितलं आहे. एका तरी पालकाने मुलाबरोबर राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा निर्णय मी घेतला होता. अभिनवने लावलेल्या या गंभीर आरोपांवर श्वेताने अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांचे हे नाते दिवसेंदिवस अधिक खराब होत चालले आहे हे मात्र नक्की.