मानसी नाईकच्या लग्नानंतर सुरू झाली आता सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची लगबग

मानसी नाईकच्या लग्नानंतर सुरू झाली आता सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची लगबग

कोरोनानंतर जनजीवन पूर्ववत असतानाच एकीकडे लग्नसोहळेही धूमधडाक्यात पार पडत आहेत. नवीन वर्षीच्या सुरूवातीलाच अनेक सेलिब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकले. दोन दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नसोहळ्याचा थाट माट चाहत्यांना अनुभवता आला. त्याआधी अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णी या मराठी सेलिब्रेटींच्या लग्नाची धमाल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता सर्वांचं आवडतं मराठी सेलिब्रेटी कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. लग्न सोहळ्यासाठी सिद्धार्थ आणि मिताली पुण्यातील त्यांच्या घरी पोहचले असून लग्नाच्या विधींना सुरूवात देखील झाली आहे.

सिद्धार्थच्या ग्रहमख पूजेतील लुक

सिद्धार्थ चांदेकरच्या घरी लग्नापूर्वीची ग्रहमख पूजा पार पडली असून त्याने या विधीचे फोटो शेअर केले आहेत. ग्रहमख पूजेपासून लग्नाच्या विधींना सुरूवात होत असते. यासाठीच सिद्धार्थने त्याचे ग्रहमख पूजेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्या फोटोंसोबत सिद्धार्थने एक छान कॅप्शनही दिली आहे, " सोड मुंज झाली. आता जातो काशी ला, ओके बाय."  अशा शब्दात त्याने त्याचा ग्रहमख पुजेचा फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थने या विधीसाठी ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी, डोक्यावर मुंडावळ्या बांधत त्याचा मुंजीचा लुक केला होता.  मितालीनेही लग्नाच्या आधी मनात निर्माण होणाऱ्या भावना तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केल्या होत्या. सिद्धार्थ आणि मिताली यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. प्रेमात पडल्यावर एकत्र सहजीवनाचा निर्णय घेत त्यांनी मागच्या वर्षी थाटामाटात साखरपूडा केला होता. या साखरपूड्यांचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.  सिद्धार्थने दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन्स डेला त्याने त्याच्या पोस्टमधून मितालीवर प्रेम असल्याची जाहीर कबूली दिली होती. त्याच वर्षी त्याने सप्टेंबर महिन्यात त्याने मितालीला लग्नाची मागणी घातली होती. आता लवकरच लवकरच सिद्धार्थ आणि मिताली लग्नासारख्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. लग्नविधींना सूरूवात झाल्यामुळे दोघांच्या घरात सध्या सनईचा सुर ऐकू येत आहे. काही दिवसांपासून त्यांचे केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि जवळच्या मित्रमंडळींनी त्यांचे कौतुकाने केळवण केलं होतं. 

सिद्धार्थ आणि मितालीचा कसा असणार विवाह सोहळा -

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाह सोहळा पु्ण्यातील एका जुन्या वाड्यात रंगणार आहे. पुण्यामध्ये असे अनेक वाडे आहेत जिथे थाटामाटात विवाहसोहळे आयोजित केले जातात. मात्र या दोघांचं लग्न नेमकं कोणत्या वाड्यात होणार हे त्यांनी जाहीर केलेलं नाही. कारण अजूनही कोरोनाचा धोका कमीम झालेला नाही. शिवाय शासकीय नियमानुसार कमी लोकांच्या उपस्थितीत आणि  कोरोनाचे सर्व नियम पाळत हा विवाह पार पाडणार आहे. अर्थातच या लग्नासाठी फक्त जवळची नातेवाईक मंडळी आणि काही खास मित्रमंडळी यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. सिद्धार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा 24 जानेवारीला पार पडणार अशी चर्चा आहे. ज्यामुळे लवकरच त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतील.