ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘मिस यू मिस्टर’ सिद्धार्थ चांदेकर

‘मिस यू मिस्टर’ सिद्धार्थ चांदेकर

खूषखबर…खूषखबर सिद्धार्थ चांदेकरच्या फॅन्ससाठी खूषखबर. आता तुम्ही म्हणाल कसली खूषखबर तो तर 18 महिन्यांसाठी लंडनला जात आहे. यात काय खूषखबर. मग तुमच्यासाठी आहे स्पेशल अपडेट. आपला लाडका सिद्धार्थ कुठेही जात नाहीये.

तुम्ही पाहिली होती का सिद्धार्थ चांदेकरची ही इन्स्टा पोस्ट. खरंच सिद्धार्थने सोशल मीडियावर ही पोस्ट करताच त्याच्या चाहत्यांप्रमाणे माझ्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ वेबसीरिज आणि ‘जिवलगा’ सीरियल इतकी छान सुरू असताना अचानक सिद्धार्थ ब्रेक का घेत आहे. पण आज उत्तर मिळालं.

सिद्धार्थ कोणत्याही ब्रेकवर जात नसून ही होती त्याच्या आणि मृण्मयी देशपांडेच्या आगामी चित्रपटाची हटके पब्लिसिटी. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दोन कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. “मिस यू मिस्टर” या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले. ‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यात राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.

नात्यांमध्ये होणाऱ्या बदलाची कथा

चित्रपटांविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की, ‘मिस यू मिस्टर’चे लेखक आणि दिग्दर्शक समीर जोशी यांच्याबरोबरचा हा माझा दूसरा चित्रपट असून या आधी मी त्याच्या ‘मामाच्या गावाला जाऊया’ या सिनेमामध्ये काम केले होतं. ‘मिस यू मिस्टर’मध्ये मी ‘कावेरी’ नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते’.

ADVERTISEMENT

सिद्धार्थ – मिताली #tinypanda चा झाला साखरपुडा

मृण्मयी आणि सिद्धार्थची केमिस्ट्री

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला की ‘मृण्मयी आणि मी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमध्ये काम केले आहे. मृण्मयी देशपांडे ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळे मलादेखील सिनेमामध्ये तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण’ नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे’.

चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर म्हणतोय ‘घे जगूनी तू’

सधाच्या काळातील जोडप्याची गोष्ट

‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी चित्रपटाबाबत सांगताना म्हणाले की, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,”

ADVERTISEMENT

समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

07 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT