चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर म्हणतोय ‘घे जगूनी तू’

चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर म्हणतोय ‘घे जगूनी तू’

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी एक ‘ती’ असते, जी त्याला कधीच मिळत नाही. पण तिला तो कधीच विसरु शकत नाही. मग ‘ती’ त्याला अशा वेळेला भेटते, जेव्हा तो त्याच्या हनिमूनवर असतो. त्यातून उडणारा गोंधळ आणि तयार झालेला प्रेमाचा लव्ह ट्रँगल म्हणजे ‘ती and ती’.
 

 

 


View this post on Instagram


 

 

ती and ती On 8th March “ १ मार्चला माझा ‘ती and ती’ सिनेमा रिलीझ होणार होता पण तो आता एक आठवडा पुढे जाऊन ८ मार्चला रिलीझ होतोय. याचे कारण म्हणजे १ मार्चला तीन मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मराठी सिनेमाला थिएटर्स मिळणे कठीण होऊ शकते. तसेच सिनेमांच्या निर्मात्यांचेही नुकसान होऊ शकते आणि मराठी सिनेसृष्टीचा एक भाग म्हणून आपल्याच मराठी सिनेमांचे आणि निर्मात्यांचे नुकसान होऊ नये असं मनापासून वाटतंय म्हणूनच मी माझा सिनेमा एक आठवडा नंतर रिलीझ करतोय. जेणेकरुन मराठी प्रेक्षकांनाही मराठी सिनेमांचा आनंद घेता येईल.” ... पुष्कर जोग #TiAndTi #8March #WomensDay @mrinalmrinal2 @jogpushakar @sonalee18588 @prarthana.behere #AnandPanditMotionPictures #GoosebumpsEntertainment #HyperbeesMediaPvtLtd #CarnivalPictures @videopalaceindia @thomascookofficial


A post shared by Pushkar Jog (@jogpushkar) on
सई-अनय-प्रियांका या तिघांची गोष्ट असलेला हा अर्बन रोमँटिक कॉमेडी सिनेमा कौटुंबिक मनोरंजन करणार आहे.

याचा अंदाज प्रेक्षकांना ट्रेलरमधून नक्कीच आला असणार.


IMG-20190213-WA0003
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना एक सुंदर सरप्राईज देण्यात आलं होतं. ते सरप्राईज म्हणजे चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकरच्या छोट्याशा भूमिकेची झलक


IMG-20190213-WA0008
‘ती and ती’ या चित्रपटातल्या ‘घे जगूनी तू’ या गाण्यातून सिध्दार्थची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच या सिनेमाची इंटरेस्टिंग आणि प्रेक्षकांना सिनेमाशी कनेक्ट करुन ठेवणारी  कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली आहे.

Subscribe to POPxoTV

या सिनेमातील हे पहिलं गाणं ‘घे जगूनी तू’ नुकतंच सोशल मिडीयावर रिलीज करण्यात आलं. ‘घे जगूनी तू’ या गाण्याचे बोल वलय मुळगुंद यांनी लिहिले असून गौरव बुरसे आणि अर्पिता चक्रवर्ती यांनी हे गाणं गायलं आहे. सुंदर शब्द, आवाज यांच्यासोबतीने साई-पियुष या म्युझिकल जोडीने या गाण्याला दिलेलं संगीतदेखील अतिशय सुंदर आहे. हे गाणं पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे आणि सिध्दार्थ चांदेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.


‘लव्ह यु जिंदगी’ म्हणतेय आयुष्यावर भरभरुन प्रेम करणारी रिया उर्फ प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)

भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती & ती’ हा सिनेमा येत्या ८ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..