ADVERTISEMENT
home / मनोरंजन
महाराष्ट्राच्या हास्य जत्रा पर्व २ मध्ये सिद्धार्थ आणि सौरभची हजेरी

भन्नाट, विनोदी स्किट्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सोनी मराठीवर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व-२’ने  आठवड्यातील चार दिवस राखीव ठेवले आहेत. आठवड्याची सुरुवात धमाल पद्धतीने करणारा या कार्यक्रमाचा पहिला फॉरमॅट म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’. या फॉरमॅटमध्ये गेल्या दोन आठवड्यात वेगवेगळ्या थीमवर आधारित कॉमेडी स्किट्स कलाकारांनी सादर केले आणि या कार्यक्रमाचे जज महेश कोठारे यांनी देखील हे स्किट्स एन्जॉय करत कलाकारांच्या विनोदी अभिनयाला दाद दिली. आता पुढील आठवड्यात या फॉरमॅटमध्ये म्हणजेच सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी खास पाहुणे कलाकारांच्या उपस्थितीत ‘हॉटेल’ या थीमवर कलाकार स्किट परफॉर्म करणार आहेत. या थीममध्ये ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याचा नेमका काय संबंध आणि अन्न बचत करणारी खानावळ, हर हर भोजनालयची मुलाखत अशा ब-याच धमाल करणा-या स्किट्स प्रेक्षकांना पुढील आठवड्यात पाहायला मिळणार आहेत.

वाचा – ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ परतली, महेश कोठारे करणार शो जज

mahesh
सौरभ आणि सिद्धार्थची उपस्थिती

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या आगामी मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार सिध्दार्थ जाधव आणि सौरभ गोखले या कार्यक्रमात उपस्थितीत राहणार आहेत. एका नवीन कलाकाराच्या छोटाशा परफॉर्मन्समुळे सिद्धार्थने भावूक होऊन त्याचा करिअर मधला पहिला अनुभव या मंचावर सर्वांसोबत शेअर केला. समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे आणि त्यांच्या सोबतीला ८ नवीन कॉमेडीयन्स यांच्या परफॉर्मन्सला ‘वाह! वाह! कमाल…’ अशी दाद सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखले यांनी दिली.

ADVERTISEMENT

वाचा –  ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अंतिम टप्प्यात

 hasya jatra 2

नवा सीझन नवा फॉरमॅट

ADVERTISEMENT

२६ डिसेंबरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा पहिला सीझन संपला. इतक्या लगेच दुसरे सीझन येईल,असे वाटले नव्हते पण नवीन वर्षाचे औचित्य साधत या धम्माल कॉमेडी शोचा दुसरा सीझन सुरु होणार आहे. आता दुसरा सीझन म्हणजे वेगळेपणा असणारचं नाही का?  आठवड्यातील ४ दिवस हा नवा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’ अशी थीम आहे. या दोन दिवसांचे परफॉर्मन्स महेश कोठारे जज करत आहेत. महेश कोठारे यांच्यासोबत सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक परीक्षक म्हणून काम पाहात आहेत आणि हे दोघे आठवड्याच्या शेवटी ‘परफॉर्मन्स ऑफ द वीक’ ची निवड करतात. या नव्या कोऱ्या सीझनचे वैशिष्टय असे की, या सीझनमध्ये सेलिब्रिटी विनोदवीर आणि पहिल्या पर्वाचे विजेतेदेखील सहभागी झाले आहेत. 

 hasya jatra siddharth

मागचा सीझन गाजला होता

महाराष्ट्राची हास्य जत्राचा पहिला सीझनदेखील खूप गाजला होता. आतापर्यंत अनेक मराठी हास्य शो येऊन गेले आहेत. मात्र असे असतानाही लगेच दुसरा सीझन घेऊन येणारा हा पहिलाच शो आहे. पहिल्या सीझनमध्ये प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हे जज होते. तर या सीझनमध्ये पहिल्यांदाच महेश कोठारे जज म्हणून दिसत आहेत. महेश कोठारे नक्की कशा प्रकारे या कलाकारांना दाद देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय. त्यामुळे यावेळचा सीझन नव्या जोड्या आणि नवे जज यांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

17 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT