बिग बॉसचा हा तेरावा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. अगदी बेस्ट बेड फॉरेवर असो अथवा रश्मी आणि सिद्धार्थ शुक्लामधील भांडण असो रोज काही ना काहीतरी या घरामध्ये चालूच आहे. लवकरच बिग बॉसचा पहिला फिनाले होणार आहे. यामध्ये क्वीन निवडली जाण्यासाठी देण्यात आलेल्या टास्कमध्ये कोणतीही टीम न जिंकल्यामुळे फिनालेला कोणतीही एक स्पर्धक पोहचू शकलेली नाही. दरम्यान यावेळी पहिल्यांदाच गजाआड जाण्याची शिक्षा बिग बॉसने सुनावली आहे ती म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल या दोघांना. या शिक्षेमुळे सिद्धार्थ प्रचंड नाराज असून त्याने ती व्यक्तदेखील केली आहे.
Bigg Boss 13: बंद करण्याची मागणी, सलमानचा शो पुन्हा एकदा विवादात
सिद्धार्थ आणि शहनाजला मिळाली शिक्षा
आपापल्या ड्युटीवरून सिद्धार्थ आणि पारस या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले. त्यानंतर सिद्धार्थ शुक्लाने आपली किचन पार्टनर देवोलिना हिच्याबरोबरदेखील कामावरून वाद घातला. सिद्धार्थच्या मते देवोलिनची वागण्याची पद्धत योग्य नसून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. या वादादरम्यान आरतीने सिद्धार्थची बाजू उचलून धरली. तर दुसऱ्याच दिवशी शहनाझ रश्मीला सिद्धार्थ आणि तिच्या नात्याविषयी विचारते. या सगळ्यात सिद्धार्थ आणि शहनाझच्या विरोधात घरातील इतर सदस्य जात आहेत.
Bigg Boss 13: घरात होणार 3 हँडसमची एंट्री
कोण होणार गजाआड यासाठी झाला वाद
बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आपापसात ठरवून कोणत्या सदस्यांना गजाआड करायचं हे सांगायचं होतं. काल – कोठरीच्या शिक्षेसाठी नक्की कोण पात्र ठरणार आहे असा प्रश्न घरातील सदस्यांना विचारण्यात आला आहे. या दरम्यान देवोलिनाचा क्वीन असण्याचा कालावधी संपला असल्यामुळे सदस्यांना तिचंही नाव घेता येऊ शकेल अशी सूचना बिग बॉसतर्फे देण्यात आली. सिद्धार्थ शुक्लाने पारस आणि रश्मीचं नाव घेतलं कारण त्याच्या मते पारस कधीही त्याच्या वक्तव्यावर ठाम राहात नाही. तर रश्मी आणि पारस दोघांनाही सिद्धार्थचं नाव घेतलं. सिद्धार्थला मुलींशी व्यवस्थित बोलण्याची पद्धत नाही असं कारण देण्यात आलं. तर शहनाझलादेखील पारसने टारगेट केलं. दुसरं नाव तिचं घेत तिने आता तिच्या बबली इमेजमधून बाहेर येऊन स्वतःसाठी स्टँड घ्यावा असं पारसने स्पष्ट सांगितलं. या सगळ्या वादविवादानंतर सिद्धार्थ आणि शहनाझला गजाआड जाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेमुळे सिद्धार्थ शुक्ला प्रचंड रागावला असून त्याने भिंतीवर हात मारून स्वतःला त्रासही करून घेतल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर जाणार असून यामध्ये सिद्धार्थ डे, अबू मलिक, पारस छाब्रा, असिम रियाझ, माहिरा शर्मा आणि रश्मी देसाई यांचं नाव नॉमिनेट करण्यात आलं आहे.
Bigg Boss 13: फॅक्टरी टास्कनंतर होणार फिनालेमध्ये डायरेक्ट एंट्री
त्यामुळे आता नक्की कोण घरी जाणार आणि कोण बिग बॉसच्या घरात राहणार हे शनिवार आणि रविवारच्या भागात कळून येईल. दरम्यान यावेळी सलमान नक्की कोणावर बरसणार आणि कोणाला खडे बोल सुनावणार याचीदेखील चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. बऱ्याच जणांना सिद्धार्थ शुक्लावर अन्याय झाला असं वाटत असून रश्मी आणि पारस चुकीचे असल्याचंही वाटत आहे. पण आता सिद्धार्थला शिक्षा मिळाल्यानंतर त्याचा स्टँड आणि गेम नक्की काय असणार याकडेही त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. सिद्धार्थ आणि रश्मीतील वाद विकोपाला चालले असून यावर सिद्धार्थ नक्की काय स्टँड घेणार हे आता पाहावं लागेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.