आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण वेग पकडण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाही. जशी गाडी विना पेट्रोल पुढे जाऊ शकत नाही तसंच काहीसं आपल्या शरीराचंही आहे. जर शरीराला वेळेवर अन्न मिळालं नाहीतर ते व्यवस्थित कार्य करू शकत नाही. सकाळचा नाश्ता शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, पण बरेचदा आपण नाश्ता करणं टाळतो. कारण आपल्याला वाटतं की, यामुळे कॅलरी इनटेक कमी होईल. पण याचा परिणाम उलटा होतो ज्यामुळे तुम्ही आजारीही पडू शकता. सकाळच्या वेळेला शरीराला योग्य प्रमाणात कॅलरीज न मिळाल्याने दिवसभरात अनेक वेळा भूक लागू शकते. परिणामी तुम्ही दिवसभर काहीही उलटसुलट खाऊ शकता आणि त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया सकाळी नाश्ता न केल्याने शरीराला कशाप्रकारे नुकसान होऊ शकतं.
जर तुम्ही असा विचार करत असाल की, सकाळी नाश्ता न केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळेल. तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. एका सर्वेक्षणानुसार, सकाळचा नाश्ता न करणाऱ्यांचं वजन हे झपाट्याने वाढतं. खरंतर नाश्ता न केल्याने तुमच्या शरीराचं मेटाबॉलिजम हळू होतं आणि जेव्हा आपण लंच करतो तेव्हा आपल्याकडून ओव्हरईटींग केलं जातं. ज्यामुळे आपलं वजन जलद गतीने वाढतं.
हो, सकाळचा नाश्ता न केल्याने टाईप-2 डायबिटीज होण्याचा धोका 54% टक्क्यांपर्यतं वाढू शकतो. हार्वर्ड यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने 46,28 9 महिलांवर खाण्याच्या सवयी आणि आरोग्याबाबत जवळपास 6 वर्ष रिसर्च केलं. ज्यामध्ये आढळून आलं की, ज्या महिला सकाळचा नाश्ता करत नाहीत, त्यांना नाश्ता करणाऱ्या महिलांच्या तुलनेत टाईप-2 डायबिटीज होण्याची जास्त शक्यता असते.
केस गळण्याच्या समस्या हाही सकाळचा नाश्ता सोडण्याचा साईड इफेक्ट असू शकतो. नाश्ता न केल्याने शरीरामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होत नाही. ज्यामुळे केस गळण्याची समस्या सुरू होते. कारण सकाळच्या वेळी नाश्ता केल्यानेे केसांना आवश्यक असणारी पोषक तत्त्व प्राप्त होतात. जी केस निरोगी ठेवतात. यामुले केसांमध्ये केराटीनची पातळीही योग्य प्रमाणात कायम राहते. जर तुम्हीही चांगल्या केसांचे चाहते असाल तर सकाळचा नाश्ता करणं टाळू नका.
जर तुम्ही सकाळचा नाश्ता नाही केला तर तुम्हाला दिवसभर अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. कारण रात्रभर तुमचं पोट रिकामं राहतं, ज्यामुळे शरीरामध्ये अॅसिडचं प्रमाण वाढतं आणि सकाळी आहार न मिळाल्याने अॅसिडीटी होते. हा त्रास बऱ्याच काळासाठी राहिल्यास तुम्हाला अल्सरही होण्याचाही धोका असतो.
सकाळचा नाश्ता न केल्यास त्याचा परिणाम तुमच्या मेंदूला आवश्यक न्यूट्रीशन आणि पूर्ण उर्जा मिळत नाही. यामुळे मेंदू नीट कार्य करू शकत नाही. परिणामी, तुमचं कोणत्याही कामात मन लागत नाही. थकव्यासोबतच मूड स्विंग होणं ही कॉमन गोष्ट आहे.
जे.ए.एम.एने पब्लिश केलेल्या एका अभ्यासानुसार सकाळचा नाश्ता न केल्याने हृदयासंबंधित समस्या निर्माण होण्याचीही शक्यता असते. खरंतर, नाश्ता न केल्याने जाडेपणा वाढतो, ज्याचा हृदयावर वाईट परिणाम होतो. अशामुळे जास्तकरुन लोकांना हृदयविकाराचे बळी पडतात.
सकाळचा नाश्ता न केल्याने डोकेदुखीचा त्रासही जाणवू शकतो. कारण, सकाळी शरीराला जर योग्य आहार मिळाला नाहीतर शुगर लेव्हल जलद गतीने कमी होते आणि ग्लूकोज अपुरं पडल्याने शरीरात अशा हार्मोन्सची निर्मिती होते ज्यांच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. यामुळे डोकेदुखी, मायग्रेनसारखा त्रास जाणवू शकतो.
मग वर सांगितलेल्या समस्या टाळायच्या असल्यास कधीही सकाळचा नाश्ता करणं टाळू नका.
हेही वाचा -
परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल
जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक