सिम्बा आता होणार जंगलचा राजा, आला ‘लायन किंग’चा नवा टीझर

सिम्बा आता होणार जंगलचा राजा, आला ‘लायन किंग’चा नवा टीझर

रणवीरच्या सिम्बाने सगळ्यांना वेड लावल्यानंतर आता जंगलचा खराखुरा राजा ‘सिम्बा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हो आम्ही बोलत आहोत. हॉलीवूडच्या सिम्बाबद्दल.. ‘द लायन किंग’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यात सगळ्यांचा लाडका छोटा सिम्बा लवकरच जंगलचा राजा होणार असल्याचे दिसत आहे. सोमवारी ऑस्करसोहळा पार पडला. त्या आधी डिस्नीने या चित्रपटाची घोषणा करत त्याचा टीझर रिलीज केला. खरंतर तीन महिन्यांपूर्वी या चित्रपटाच टीझर ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. सोमवारी आणखी एक टीझर रिलीज करण्यात आला. ज्याच्या खाली king live long असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हा या चित्रपटाचा आणखी एक टीझर आहे असे म्हणायला हवे.  तुम्ही ९०च्या दशकातील असाल तर तुम्हाला द लायन किंग हा सिनेमा नक्कीच आठवत असेल, त्याचाच हा पुढील भाग आहे.


भारतीय लघुपटाने पटकावला ऑस्कर, जाणून घ्या याविषयी अधिक


काय आहे टीझरमध्ये ?


चित्रपट डीस्नीची प्रस्तुती आहे म्हटल्यावर त्यात अॅनिमेशन हे आलेच. अॅनिमेशननी भरलेला असा हा टीझर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. या टीझरची सुरुवात एका आफ्रिकी संगीताने होते.जंगलातील वेगवेगळे प्राणी यात दाखवण्यात आले आहे. या संगीतावरुन नव्या पर्वाची सुरुवात होणार याची जाणीव होते.आफ्रिकेच्या सवाना जंगलात मुसाफा (सिम्बाचे वडील) जंगलच्या नव्या राजाची घोषणा करताना दिसतात. एका उंच टोकावर सिम्बाला हातात घेऊन त्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात येते. ही घोषणा करत असताना तेथे बगिथी बाबा( माकड)यासोबत आणखी काही प्राणी देखील दिसत आहे. टीझर इतका छान झाला आहे की,त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढते.

Subscribe to POPxoTV

सिम्बाचा तो सीन पाहून आठवतो बाहुबली


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लायन किंगचा आणि बाहुबलीचा काय संबंध. बाहुबली :द कनक्ल्युजन या चित्रपटात माहेश्मती साम्राज्याच्या नव्या उत्तराधिकारीची घोषणा शिवगामीदेवी जशी करते काहीसा तसाच हा सीन लायन किंगच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर तुम्हील बाहुबली या चित्रपटाचे चाहते असाल तर तुम्हाला हे आठवल्यावाचून राहणार नाही.


चांदनीच्या साडीचा केला लिलाव, वाचा किंमत


 १९९४ ला आला होता ‘द लायन किंग


९०च्या दशकातील मुलांना हा चित्रपट माहीत असण्याची शक्यता आहे. कारण  मूळ चित्रपट १९९४ साली रिलीज झाला होता. त्यावेळी हा चित्रपटा कार्टून स्वरुपात पाहायला मिळाला. पण आता हा नवा चित्रपट अॅमिनेशन स्वरुपातील आहे. जर तुम्ही जुना चित्रपट पाहिला नसेल तर या चित्रपटाचा थोडासा फ्लॅशबॅक तुमच्यासाठी.. तर हा चित्रपट सिम्बा नावाच्या एका सिंहाची गोष्ट आहे. मुसाफा या सिंहाचा तो मुलगा. मुसाफा उत्तराधिकारी म्हणून छोट्या सिम्बाची घोषणा करतो. पण त्याचे राजा होणे निशान अर्थात मुसाफाच्या भावाला पटत नाही. तो बगावत करुन सिम्बाच्या वडिलांना मारतो आणि छोट्या सिम्बाला जंगलाबाहेर हाकलून देतो. जंगलातून काढून टाकल्यानंतर ते जंगलचा राजा हे पद मिळवेपर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट आहे. आता या नव्या अॅनिमेटेट भागात काय बदल करतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Subscribe to POPxoTV

 'द जंगल बुक'प्रमाणे मिळेल का यश?


 २०१६ साली आलेल्या  ‘द जंगल बुक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जॉन फेवरोऊ यांनीच हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. द जंगल बुकची लोकप्रियता आणि तिने जमवलेला गल्ला पाहता आता हा चित्रपट किती कमाई करेल याची उत्सुकता ही आहे.


(सौजन्य- Instagram,Youtube)