आदित्य नारायण आणि श्वेता अगरवाल लग्नबंधनात, फोटो व्हायरल

आदित्य नारायण आणि श्वेता अगरवाल लग्नबंधनात, फोटो व्हायरल

अभिनेता, निवेदक आणि गायक आदित्य नारायणने आपल्या दहा वर्षाचे मैत्रीच्या नात्याचे रूपांतर लग्नात केले आहे. दहा वर्षांपासून ओळखत असलेल्या श्वेता अगरवालशी आदित्यने मंगळवारी (1 डिसेंबर) लग्न केले. आदित्यने सोशल मीडियावर अजून स्वतः फोटो पोस्ट केले नसले तरीही त्याच्या वरातीपासूनच सर्व फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत आणि आदित्यच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाचे हे फोटो खूपच आवडत आहेत. आदित्य आणि श्वेता या दोघांनीही कलर को - ऑर्डिनेशन करून लग्नाचे कपडे घातले होते आणि दोघांचीही जोडी अत्यंत सुंदर दिसत होती. आदित्यचे चाहते आता मात्र त्याने फोटो पोस्ट करायची वाट पाहत आहेत.

सई लोकुर अडकली विवाहबंधनात, सोहळ्याचे अप्रतिम फोटो

आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो अनेक पेजवर व्हायरल

आदित्याने काही दिवसांपूर्वीच आपण  सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते. लग्नाची तयारी करण्यासाठी आणि अत्यंत खासगी व्यक्ती असल्याने हा ब्रेक घेत असल्याचे आदित्यने सांगितले होते. मात्र आदित्यच्या लग्नाचे अनेक फोटो हे  वेगवेगळ्या सोशल पेजवर व्हायरल झालेले दिसून येत आहे. या सर्व फोटोमध्ये  आदित्य आणि श्वेता अत्यंत आनंदी दिसत असून दोघांचीही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. दरम्यान आदित्यच्या वरातीचेही अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. कोरोना असल्याने घरच्या आणि  अगदी जवळच्या माणसांच्या  उपस्थितीमध्ये  आदित्यने लग्न केले असून सर्व  रितीरिवाजांसह त्याने लग्न केले आहे. त्याच्या वरातीमध्ये आई आणि वडीलही अगदी प्रेमाने आणि  मजेने नाचतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Casting couch: लग्नाचे आमिष देत अभिनेत्रीवर दोन वर्ष अन्याय, पोलिसात घेतली धाव

मागच्या महिन्यात केली होती घोषणा

आदित्य नारायणने मागच्या महिन्यात श्वेतासह लग्न करणार असल्याची घोषणा करून सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.  इतकंच नाही तर श्वेता त्याच्या आयुष्यात दहा वर्ष आहे हे समजल्यानंतर प्रत्येकालाच धक्का  बसला होता.  कारण आदित्यबाबत कधीही कुठेही अशा प्रकारच्या गोष्टी छापूनही आल्या नव्हत्या आणि इतकं असूनही आदित्य आणि श्वेताने आपलं नातं जपत लग्न करण्याचा निर्णय घेतला हे त्यांच्या चाहत्यांनाही भावले. आदित्यने नुकताच केवळ तिलक झालेल्याचा फोटो आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला होता आणि त्यानंतर त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तसंच आदित्यचे लग्न ठरल्याचे कळल्यापासून त्याच्यावर सतत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

प्रेगनन्सीमध्ये अनुष्का करतेय शिर्षासन, विराटची घेत आहे मदत

लहानपणापासूनच केली स्वतःची ओळख निर्माण

उदित नारायण आणि दीपा नारायण यांचा एकुलता एक मुलगा असला तरीही आदित्यने अगदी लहानपणापासून स्वतःची ओळख स्वतःच निर्माण केली आहे. बालकलाकार म्हणून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून गाणीही गायली आहेत. त्याशिवाय आदित्य एक उत्तम निवेदक असून त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर अप्रतिम आहे हे त्याने नेहमीच दाखवून दिले आहे. आदित्यने आतापर्यंत अनेक रियालिटी शो चे निवेदन केले असून आपण कुठेही कमी नाही हे दाखवलेच आहे. त्याशिवाय खतरों के खिलाडी या रियालिटी शो मधून आपण कशालाच  घाबरत नाही हेदेखील त्याने दाखवून दिले आहे. शो जिंकला नसला तरीही प्रेक्षकांचे मन मात्र आदित्यने या शोद्वारे जिंकले हे नक्की.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक