गायिका हर्षदीप कौर झाली आई, मुलगा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर

गायिका हर्षदीप कौर झाली आई, मुलगा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर

गायिका हर्षदीप कौरने काही महिन्यांपूर्वी आपण गरोदर असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. मंगळवारी (2 मार्च) हर्षदीप कौर आणि तिचा पती मनकित सिंह यांंनी सोशल मीडियावर आनंदाची बाब जाहीर करत आपल्याला मुलगा झाल्याचे सांगितले आहे. मनकित सिंहबरोबरचा एक फोटो शेअर करत हर्षदीपने आपला आनंद व्यक्त केला आहे. फोटोवर लिहिले आहे… ‘मुलगा झाला, 02-03-2021, आणि आता साहसी गोष्टींना सुरूवात’. हर्षदीपने आपल्या गरोदरपणात पूर्ण आराम केला असून नेहमीच आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मार्चमध्ये आपण आई होणार हे हर्षदीपने काही महिन्यांपूर्वीच सांगितले होते.

ज्युनियर सिंहच्या येण्याने झालाय अत्यानंद

हर्षदीप कौरने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘पृथ्वीवर थोडासा स्वर्ग अवतरला आहे आणि आम्हाला आई - वडील बनवले. आमच्या ज्युनिअर सिंहच्या येण्याने घरात खूपच आनंद झाला आहे, याशिवाय मोठा आनंद असूच शकत नाही.’ हर्षदीप आणि मनकित पहिल्यांदाच आईवडील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी हर्षदीपने आपल्या पतीसह एक फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन लिहिली होती, ‘झोप पूर्ण न होण्याची दिवस लवकरच येणार आहेत, आताच आपल्याला झोप पूर्ण करून घ्यायला हवी’

बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच करतेय लग्न

फेब्रुवारीमध्ये केले होते आई होणार असल्याचे जाहीर

हर्षदीपने बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो पोस्ट केले आहेत. तर एका फोटोमध्ये  आपल्या पतीसह अत्यंत आनंदी हर्षदीप दिसत  आहे. हर्षदीपने या फोटोला कॅप्शन लिहिली आहे की, ‘या छोट्या बाळाला भेटण्यासाठी मी खूपच उत्साही आहे. हे बाळा अर्धा माझा अंश आहे आणि अर्धा अंश त्याचा आहे ज्याच्यावर माझे सर्वात जास्त प्रेम आहे. ज्युनिअर कौर/सिंह लवकरच मार्च 2021 मध्ये या जगात येणार आहे.  तुमच्या आशिर्वादाची गरज आहे.’ हर्षदीपने अगदी शेवटच्या महिन्यात ही गुड न्यूज शेअर केली आहे कारण आपलं आयुष्य अधिक खासगी असावं असं दोघांनाही वाटतं.  

एका मुलाखतीमध्ये तिने स्पष्ट केले होते की, ‘हो मी तिसऱ्या ट्रिमस्टरमध्ये आहे आणि डिलिव्हरीपासून केवळ एक महिना दूर आहे. माझा नवरा मनकित आणि मी दोघेही अतिशय खासगी आयुष्य जगतो. मागच्या वर्षी कोविडच्या काळात बऱ्याच कमी लोकांना भेटण्याची आम्हाला संधी मिळाली. तसंच परिस्थिती इतकी खराब होती की, कोणालाही गरोदरपणाबद्दल सांगण्यात आलं नाही. पण मी अत्यंत आनंदी आहे की, आमच्याकडे आता एक लहान बाळ येणार आहे.’

अभिनेत्री किश्वर मर्चंटने शेअर केला फोटो, आई होणार असल्याची केली घोषणा

हर्षदीपने 2015 मध्ये बांधली होती मनकितशी लग्नगाठ

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm

हर्षदीप ही बॉलीवूडमधील नावाजलेली गायिका आहे.  कटिया करू, दिलबरो, नच दे ने सारे, जालिमा अशा अनेक हिट गाण्यांमुळे ती प्रसिद्ध आहे. याशिवाय काही रियालिटी शो मध्ये परीक्षक म्हणून तिने कामही पाहिले आहे. मनकित सिंह तिचा कॉलेजपासून मित्र होता आणि तिने सहा वर्षांपूर्वी त्याच्यासह लग्नगाठ बांधली आहे. आता आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिल्याने दोघेही अत्यानंदी आहेत.  दरम्यान आता आपल्या मुलाचे नाव हर्षदीप काय ठेवणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ही प्रसिद्ध गायिका लवकरच होणार आई, शेअर केला फोटो

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक