लग्नासाठी आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम, डिसेंबरमध्ये करणार लग्न

लग्नासाठी आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम, डिसेंबरमध्ये करणार लग्न

नेहा कक्कर पाठोपाठ आता गायक आणि निवेदक आदित्य नारायणही लग्नबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीत अभिनेत्री श्वेता अगरवालसह आपलं नातं आदित्यने मान्य केलं आणि आपण डिसेंबरमध्ये तिच्याशी लग्न करणार असल्याचंही सांगितलं. आता लग्नासाठी आदित्यने काही काळ सोशल मीडियाला रामराम ठोकायचे निश्चित केले आहे आणि त्याने तसे आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून सांगितलेदेखील आहे. आदित्य नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो पण आता डिसेंबरमध्ये लग्न होईपर्यंत आदित्यने सोशल मीडियाला रामराम ठोकायचे ठरवले आहे.

आपल्या प्रेमासाठी अंकिता लोखंडेची भावपूर्ण पोस्ट

अत्यंत खासगी पद्धतीने करणार लग्न

श्वेताबरोबर लग्न करण्याचा आपल्याला अत्यंत आनंद असल्याचेही आदित्यने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पहिल्यांदाच त्याने श्वेताबरोबर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आम्ही लग्न करत आहोत. मी या जगातला सर्वात नशीबवान मुलगा आहे कारण जोडीदार म्हणून 11 वर्षापूर्वी मला श्वेता माझ्या आयुष्यात लाभली आहे आणि आता आम्ही डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधत आहोत. आम्ही दोघेही  अत्यंत खासगी आणि स्वतःमध्येच रममाण राहणारे असे आहोत आणि त्यामुळे खासगी आयुष्य हे खासगीच राहावे असं आम्हाला दोघांनाही वाटत आहे. त्यामुळे लग्नाच्या तयारीसाठी काही काळासाठी सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. डिसेंबरमध्ये भेटू. तर नेहमीच्या अंदाजात त्याने जाता जाता दोन गाण्याचा लाईन्सही लिहिल्या आहेत. P.S. कहा था ना..कभी ना कभी तो मिलोगे कहीं पे हमको यक़ीन है 😋’. आदित्य आणि श्वेता एकमेकांना अकरा वर्षांपासून ओळखत आहेत. मात्र कधीही कोणताही गाजावाजा या गोष्टीचा झाला नाही.  केवळ एक चित्रपट दोघांनी एकत्र केला आणि तेव्हापासून ते दोघेही एकत्र आहेत.  मध्यंतरी त्यांच्या नात्यात अनेक चढउतार आले मात्र आता शेवटी लग्न ठरल्यानंतर दोघेही अत्यंत आनंदी आहेत. श्वेता अगरवालने केवळ एका चित्रपटात काम केले असून ती सोशल  मीडियावरही जास्त अॅक्टिव्ह नाही.  त्यामुळे तिच्याबद्दल अधिक माहिती अथवा तिचे जास्त फोटोही उपलब्ध नाहीत.  

Bigg Boss14: डबल एविक्शनचा झटका, एका आठवड्यात कविता कौशिकने गुंडाळला गाशा

खासगी सोहळ्यामुळे फोटो दिसणं अशक्य

आदित्य आणि श्वेता 1 डिसेंबरला लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या दोघांच्याही घरी लगीनघाई आहे. पण हे लग्न अगदी खासगी पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे त्यांचे फोटो जोपर्यंत आदित्य पोस्ट करत नाही तोपर्यंत चाहत्यांना पाहता येणं अशक्य आहे असं वाटत आहे. आदित्यने याच कारणामुळे सोशल मीडियापासूनही दूर राहण्याचं ठरवलं आहे. सध्या आदित्य इंडियन आयडॉल या शो चे निवेदन करत आहे. आदित्यने  आतापर्यंत अनेक शो चे निवेदन केले असून रियालिटी शो चा देखील तो भाग बनला आहे. ‘खतरों के खिलाडी’ या शो मध्ये आदित्यने आपण अत्यंत निडर असल्याचे दाखवत दुसऱ्या क्रमांकापर्यंत बाजी मारली होती. आदित्य अत्यंत हुशार असून नेहमीच त्याला मजामस्ती  करताना पाहिलं गेलं आहे. आता लवकरच आदित्य विवाहबद्ध होत असून त्याने आपले फोटो पोस्ट करावेत असं नक्कीच त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. पण वाट पाहण्यापलीकडे सध्या काहीही करता येणे शक्य नाही हेदेखील तितकेच खरं आहे. आदित्यला POPxo मराठीकडून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! 

कश्मीरा शाहचं हॉट फोटोशूट पाहुन क्लिनबोल्ड झाला कृष्णा अभिषेक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक