खुशखबर! गायिका नीति मोहन होणार आई,शेअर केले फोटो

खुशखबर! गायिका नीति मोहन होणार आई,शेअर केले फोटो

लॉकडाऊनचा काळ अनेकांसाठी लाभदायक ठरला आहे असेच काहीसे सेलिब्रिटींसाठी दिसत आहे. अनेकांनी या काळात लग्न केली आहेत. तर अनेकांच्या घरी छोट्या पाहुण्याचे स्वागत झाले. कपिल शर्मा, अनिता हसनंदानी, अनुष्का शर्मा या कलाकारांच्या घरात नुकतेच बाळाचे आगमन झाले आहे. आता आणखी एका सेलिब्रिटीचे नाव यामध्ये घेतले जाणार आहे ते म्हणजे गायिका नीति मोहनचं. नीति मोहनने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. पती निहार पंड्यासोबत काढलेले तिचे हे फोटो सुंदर असून तिच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचे तेज दिसत आहे. दरम्यान, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्याप्रसंगी त्यांनी आई होणार असल्याचेही पोस्टमध्ये लिहिले आहे.

लग्नाचा वाढदिवस आणि आनंद

दोन वर्षांपूर्वी अभिनेता निहार पंड्या आणि गायिका नीति मोहन यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट त्यांनी त्यांच्या फॅन्ससाठी सोशल अकाऊंटवरुन शेअर केले होते. निहार आणि नीतिची केमिस्ट्री कायम त्यांच्या फोटोंमधून दिसून येते. नीतिने त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा नवा फोटो शेअर केले आहे.  1 +1 =3  असे लिहित त्यांनी ही बातमी शेअर केला आहे. लग्नाचा दुसरा वाढदिवस आणि कुटुंबात तिसरी व्यक्ती येणं असा याचा अर्थ आहे की नीतिला तिसरा महिना सुरु आहे याबद्दल अनेकांचा गोंधळ सुरु आहे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे नीति आई होणार आहे.नीतिने हा फोटो पोस्ट केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही या जोडप्याचे कौतुक केले आहे. श्रेया घोषाल, विशाल ददलानी, प्राजक्ता शुक्रे,  शाल्मली खोल्गडे या सगळ्यांनी शुभेच्छा देत तिचा आनंद द्विगुणित केला आहे. 

अंकिता लोखंडेच्या नृत्य अदा पाहून फॅन्स झाले घायाळ

सनशाईन ड्रेसमध्ये दिसत होती सुंदर

सेलिब्रिटी ज्यावेळी अशा बातम्या पोस्ट करतात. त्यावेळी अशा बातम्या पोस्ट करण्याचा अंदाज हा थोडा हटके असतो. नीतिने हे फोटोशूट समुद्रकिनारी केल्याचे दिसत आहे. नीतिने  पिवळ्या रंगाचा शॉर्ट शर्ट ड्रेस घातला आहे. टाय डाय प्रकाररातील हा ड्रेस नीतिवर चांगलाच उठून दिसत आहे.  पायात बोहमनी स्टाईल ग्लॅडिएटर प्रकारातील फुटवेअर आणि कानात लांब हुप्स असा तिचा साधालुकही फोटोमध्ये फारच सुंदर आहे. तिच्या कपड्यांना खरा न्याय मिळतोय तो निहारच्या बेबी पिंक रंगाच्या शर्टमुळे. बेबी पिंक आणि नेव्ही रंगाची डेनिम घातलेला निहार एकदम खूश दिसत आहे. 

शिल्पा शेट्टी आणि परेश रावलच्या 'हंगामा 2' मध्ये अक्षय खन्नाची स्पेशल एंट्री

मोहन सिस्टर्ससोबत निहार

निहार आणि नीतिचे नाते जितके दृढ आहे. तितकेच नीतिच्या बहिणी शक्ति आणि मुक्तिसोबतही त्याचा रॅपो चांगला आहे. या ट्रायोसोबत बरेचदा फिरण्याचे व्हिडिओज आणि फोटोच तो सतत शेअर करत असतो.  निहार पंडया हा  एक मॉडेल आणि अभिनेता असून त्याने सलमानच्या मेरी गोल्ड या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. दीपिका पदुकोण, गोहर खान यांच्यासोबत असलेल्या रिलेशनशीपच्या चर्चेमुळे तो कायम प्रकाशझोतात राहिला. सध्या निहार पंड्या फारसा दिसत नसला तरी देखील तो कायम चर्चेत असतो. नीति मोहनसोबत रिलेशनशीप असल्याची चर्चा वायरल झाली त्यानंतर तो अधिक प्रकाशझोतात आला. 

सध्या आई- बाबा होणारे नीति- निहार आपला एक वेगळा वेळ घालवताना दिसत आहे. त्यांच्या घरात हा नवा पाहुणा कधी येणार याची फॅन्सना प्रतिक्षा आहे. 

हा मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, लॉकडाऊनमध्ये केले होते लग्न