नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेंडला इशारा, ‘माझ्या नावाचा वापर करण्याचं धाडस नको करू’

नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेंडला इशारा, ‘माझ्या नावाचा वापर करण्याचं धाडस नको करू’

नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांचं ब्रेकअप होऊन बरेच महिने झाले आहेत पण तरीही यांच्या नात्यातील दुरावा अधिकाधिक वाढत चाललेला दिसून येत आहे. गायिका नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांनी आपले नाते एका रियालिटी शो मध्ये जाहीर केले पण  त्यानंतर एकाच महिन्यात त्यांनी वेगळे झाल्याचेही सांगितले. पण आता नेहा कक्करने तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली याला आपल्यापासून दूर राहण्याची आणि आपल्या नावाचा प्रसिद्धीसाठी वापर न करण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर त्याने हा प्रकार न थांबवल्यास सर्व सत्य उघड करणार असल्याचंही तिने म्हटले आहे. एकेकाळी हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण गेल्या वर्षी ब्रेकअप झाल्यानंतर नेहाने याबाबत संपूर्ण जगाला माहिती दिली होती. त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याबद्दल नेहाने तेव्हाच वक्तव्य केले होते. पण त्यावेळी हिमांशने मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देणे योग्य समजले होते. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हिमांशने आपली बाजू स्पष्ट करत काही गोष्टी उघड केल्या. मात्र हे नेहाच्या अजिबात पचनी पडलेले नाही. 

नेहा कक्कड आणि आदित्यचं लग्न खरंच ठरतंय...

नेहाने हिमांशला दिली आहे सक्त ताकीद

ब्रेकअप झाले तेव्हा गोष्टी फारच बिघडल्या होत्या असं नाही पण त्यानंतर बरेच काही घडत गेले आणि गोष्टी अजून बिघडत गेल्या. आपल्या आयुष्यातील हा सर्वात वाईट काळ असल्याचे हिमांशने सांगितले. सध्या परिस्थिती नीट असली तरीही एक वेळ अशी होती की सर्व जग माझ्याविरोधात उभे ठाकले होते आणि त्याचा प्रचंड त्रास झाल्याचेही हिमांशने व्यक्त केले. इतकेच नाही तर नेहासोबतच्या ब्रेकअपविषयी सांगताना हिमांश म्हणाला की, ‘नेहा एका रियालिटी शो वर गेली असता रडली आणि त्यानंतर प्रत्येकाने मला दोष द्यायला सुरूवात केली. त्यावेळी माझा माझ्यावरचा ताबा सुटून मलाही रडायला येत होतं पण मी मात्र त्यावेळी सर्व गोष्टी धैर्याने हाताळायचे ठरवले’. मात्र ही मुलाखत समोर आल्यानंतर नेहा कक्करचा राग अनावर झाला. नेहाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हिमांशवर निशाणा साधत त्याला सक्त ताकीद दिली आहे. ‘माझ्याविषयी जे वाईट विचार करतात त्यांची माझ्यालेखी काहीही किंमत नाही. ते अतिशय खोटारडे आणि जळू स्वभावाचे आहेत. ते केवळ माझ्या नावाचा वापर प्रसिद्धीसाठी करत आहेत. यापूर्वी केला आहे. पण मी इतकंच सांगेन की, माझ्या नावाचा वापर करण्याचे धाडसही करू नये. स्वतःच्या कामाने नाव कमवा, माझ्या निमित्ताने नको’. नेहाने अशी पोस्ट शेअर केली आहे. 

बॉयफ्रेंडमधून बाहेर पडत नेहा कक्करने केली मोठी घोषणा

कुटुंबाचं सत्य सर्वांसमोर आणेन - नेहा कक्कर

नेहाने इतकंच सांगितलं नाही तर हिमांशचे नाव न घेता तिने पुढे त्याच्या कुटुंबावरही निशाणा साधला आहे. ‘मी आता तुझ्याबाबत काहीही बोलले तर फक्त तुझेच नाही तुझ्या कुटुंबाचेही सत्य सर्वांसमोर आणेन. त्यांनी आतापर्यंत माझ्याबरोबर जे काही केले ते सर्वांसमोर आणेन. माझ्या नावाचा चुकूनही यापुढे वापर करू नका. मला खलनायक सिद्ध करून स्वतः बिचारा असल्याचं भासवणं बंद करा’ अशी स्पष्ट भूमिका नेहा कक्करने घेतली आहे. या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं माहीत नाही. पण एकमेकांवर सध्या चिखलफेक चालू असल्याचं मात्र दिसून येत आहे. नेहा कक्करचे लाखो करोडो चाहते आहेत. तर हिमांशचेही अनेक चाहते आहेत. पण अचानक त्यांच्या अशा वागण्याने त्यांच्या चाहत्यांचीही मनं दुखावली गेली आहेत. यावर आता हिमांश पुन्हा प्रतिक्रिया देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

गायिका नेहा कक्करने सांगितलं ब्रेकअपमागचं खरं कारण

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.