मराठमोळा राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी’ होणार, 11 व्या हंगामासाठी होकार

मराठमोळा राहुल वैद्य ‘खतरों के खिलाडी’ होणार, 11 व्या हंगामासाठी होकार

‘बिग बॉस’ (Bigg Boss 14) या रियालिटी शो मधून सर्वांचे मन जिंकणारा स्पर्धक मराठमोळा राहुल वैद्य (Rahul Vaidya) आता अजून एका रियालिटी शो साठी सज्ज झाला आहे. सर्वात जास्त टीआरपी मिळविणारा शो म्हणून प्रसिद्ध असणारा ‘खतरों के खिलाडी’ (Khatro ke Khiladi) च्या 11 व्या हंगामासाठी राहुल वैद्यने होकार दिला असल्याचे त्याने स्वतःच सांगितले आहे. तसंच 6 मे च्या रात्री केपटाऊनला जाण्यासाठी आपण निघणार असल्याचेही राहुलने सांगितलं आहे. त्यामुळे आता रोहित शेट्टीच्या या शो मध्ये नक्कीच धमाल येणार आहे. राहुलच्या चाहत्यांना त्याच्या या निर्णयाने नक्कीच आनंद झाला आहे. राहुल वैद्य नक्की आता कोणकोणते स्टंट करणार आणि हा शो तरी जिंकून येईल अशी आशा आता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

या अभिनेत्री केवळ सौंदर्याची खाण नाहीत, तर हातात आहे कला

होकार तर दिला पण....

राहुल वैद्यने आपण नक्की कशाकशाला घाबरतो हे पण स्पष्ट केलं आहे. आपण या शो साठी होकार तर दिला आहे. पण आपण सापांना घाबरतो. पाण्यालाही घाबरतो आणि आपल्याला नीट पोहता येत नसल्याचे त्याने सांगितले आहे. तसंच स्विमिंग पूलमध्ये असणारे पाणी हे साधारण पाच सहा फूट असते पण इथे समुद्रात जायचे असते त्यामुळे आता मात्र मनातून घाबरलो आहे असंही राहुल म्हणाला आहे. पण आपण प्रत्येक स्टंट उत्तम करण्याचा प्रयत्न करू असंही राहुलने सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना राहुल नक्कीच माघार घेणार नाही याची खात्री आहे. बिग बॉसमध्येदेखील राहुलने कधीही कोणत्याही टास्कमध्ये हार मानली नव्हती. त्यामुळे इथेही खऱ्या स्टंटमध्ये तो मागे हटणार नाही अशी खात्री त्याच्या चाहत्यांना आहे. तसंच राहुलने किमान हा शो तरी जिंकावा असंही त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. कारण रियालिटी शो मध्ये राहुल नेहमीच दुसऱ्या अथवा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. पण प्रत्येक रियालिटी शो मध्ये राहुलने प्रेक्षकांचे आणि त्याच्या चाहत्यांचे मन मात्र जिंकले आहे हे नक्की. रोहित शेट्टीचे मराठी माणसांवरचे प्रेम लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता राहुलसह रोहित शेट्टीचा कसा बाँड तयार होणार हेदेखील पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. 

रूचिता जाधव अडकतेय विवाहबंधनात, लग्नविधीला सुरूवात

अनेक सेलिब्रिटींचा होकार

या वर्षीच्या हंगामात अनेक सेलिब्रिटींना होकार दिला असून अनेक नावाजलेले चेहरे या शो मध्ये दिसून येणार आहेत. राहुल वैद्यसह कलर्सचा चेहरा असणारा अर्जुन बिजलानी, सर्वात लहान वयाची अभिनेत्री अनुष्का सेन, रोडीज फेम वरूण सूद, अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी, दिव्यांका त्रिपाठी, महक चहल, सना मकबूल, विशाल आदित्य सिंह, गायिका आस्था गिल, अभिनेत्री सनाया इराणी हे सर्व दिसणार आहेत. त्यामुळे यावेळचा सीझन नक्कीच गाजणार आहेत. अनेक नावाजलेले सेलिब्रिटी यावेळी यामध्ये सहभागी होणार असून या सर्वांचे लाखोंमध्ये चाहते आहेत. हे सर्व सेलिब्रिटी याच आठवड्यात केपटाऊनला रवाना होणार असून लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान चित्रीकरण झाल्यानंतर डान्स दिवाने या शो च्या समाप्तीनंतर ‘खतरों के खिलाडी’ हा शो प्रसारित करण्यात येईल. 

पुन्हा भेटीला येणार 'जिवलगा' मालिका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक