गायक सोनू निगम पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल

गायक सोनू निगम पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या पाठी लागलेलं तब्येतीचं शुक्लकाष्ठ काही त्याचा पिच्छा सोडायला तयार नाहीयं. असह्य पाठदुखीमुळे त्पाला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सोनू नेपाळमधील पोखरमध्ये कॉन्सर्टसाठी पोचल्यावर त्याला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. त्याला लगेचच काठमांडूमधील नॉर्विक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, हॉस्पिटलच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या डेप्युटी जनरल मॅनेजर आरपी मैनाली यांनीही या गोष्टीला दुजोरा दिलाय.

मैनाली यांनी दिलेल्या माहीतीनुसार, सोनूला व्हीआयपी लाउंजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सोनूला पाठीत अक्यूट पाठदुखी झाली आहे. डॉक्टरांनी MRI काढला असून पुढील तपासणीसाठी रिपोर्टसची वाट पाहत आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

At today's shoot in Karnal for a music video.


A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on
त्यानंतरच पुढच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत ठरवण्यात येईल. सोनूवर सध्या या हॉस्पिटलमधील डॉक्टर पंका जलन आणि डॉक्टर प्रवीण नेपाल हे उपचार करत आहेत.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

A Good Beat, gives a Hair Raising Experience.. #beat #music #bts


A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on
सोनू निगमला या आधीही फूड अॅलर्जीमुळे नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्याच्या डोळ्याला अॅलर्जीमुळे भरपूर सूज आली होती. मांसाहार केल्यामुळे अॅलर्जी होऊन त्याच्या डोळा सूजला होता. ज्यामुळे त्याला मुंबईत आयोजित केलेले त्याचे काही शोजही कॅन्सल करावे लागले होते.


सोनूने त्यावेळी हॉस्पिटलमधले फोटोज इंस्टाग्रामवर शेअरही केले होते. तसंच बरं झाल्यावर फॅन्सना थँक्यूही म्हटलं होतं.

सोनूने 6 फेब्रुवारीला इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये एका फोटोत त्याचा डोळा सूजलेला दिसत होता. तर दुसऱ्या फोटोत त्याला ऑक्सीजन मास्क लावलेला दिसत होता. त्यावेळी त्याला दोन दिवसातच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

नुकतंच सोनू निगमने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत परफॉर्मही केलं होतं. त्यामुळे त्या पाठोपाठ आलेल्या या बातमीने सोनूच्या फॅन्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. 


हेही वाचा -


सोनू निगमच्या ‘रकम्मा’ गाण्यावर अभिनय करणार हटके डान्स


तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’