अभिनेत्री स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा होती की

अभिनेत्री स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा होती की

स्मिता पाटील हे असं नाव आहे, जे हिंदी सिनेमासृष्टीत कोणीही आजही विसरलेलं नाही. फक्त 10 वर्षात या अभिनेत्रीने ज्या पद्धतीने इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं. त्यामुळे प्रत्येक जण तिच्या स्टारडमला घाबरू लागला होता. आपल्या सशक्त अभिनयाने आपली ओळख बनवणाऱ्या स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1956 मध्ये झाला होता आणि वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी 13 डिसेंबर 1986 ला त्यांचं निधन झालं. स्मिता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक दृष्टीक्षेप टाकूया त्यांच्या यशस्वी आयुष्यावर आणि प्रेमकहाणीवर.

अभिनयाने दिलं नाव आणि प्रेमाने दिली टीका

एकीकडे स्मिता पाटील यांना नेहमीच त्यांच्या अभिनयासाठी ओळखण्यात येतं. त्यांच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक झालं आहे. पण स्मिता आणि राजकारणी-अभिनेता राज बब्बर यांच्यातील नात्याने मात्र त्यांच्यावर टीका झाली होती.अनेकांनी त्यांच्याबद्दल म्हटलं की, राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचं घर स्मिता यांनी तोडलं. याबाबतीत स्मिता यांना आपल्या आईकडूनही बरेचदा ऐकावं लागे.

प्रेमाची झाली होती अशी सुरूवात

‘भीगी पलके’ या चित्रपटादरम्यान राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्यातील प्रेमाला सुरूवात झाली होती. 80 च्या दशकात त्या दोघांनी लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरूवात केली. असं म्हणतात की, राज बब्बर हे आपल्या बायको नादिराला घटस्फोट देणार स्मिता यांच्याशी लग्न करणार होते. पण असं झालं नाही आणि नंतर त्यांनी स्मिता यांना आपल्या फ्रेंड सर्कलपासून दूर ठेवायला सुरूवात केली होती.

आईचा होता विरोध

असं म्हणतात की, स्मिता पाटील यांच्या आईचा राज आणि त्यांच्या नात्याला विरोध होता. स्मिता यांच्या आईचं म्हणणं होतं की, जी स्मिता स्त्रियांच्या अधिकारासाठी लढते ती कोणाचं घर कसं तोडू शकते. पण राज बब्बर यांच्या सोबतच्या नात्याबाबत त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही.

शेवटची इच्छा

स्मिता पाटील असं नेहमी म्हणायच्या की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला एका सुहासिनीसारखं तयार करा. मृत्यूनंतर स्मिता यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांचं शव सुहासिनीसारखं सजवण्यात आलं होतं. काही लोकांनी असंही म्हटलं की, जणू काही स्मिता यांना आधीच माहीत होतं की, त्या जास्त दिवस जगू शकणार नाहीत आणि तसंच झालं त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच आरोग्याच्या कारणामुळे त्यांचा 13 डिसेंबरला मृत्यू झाला. स्मिता यांच्या पश्चात प्रतीकचा सांभाळ त्याच्या आजीआजोबांनी केलं. आज प्रतीकनेही बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून ओळख मिळवली आहे. त्याचा अभिनयही उत्तम आहे.

2019 मध्येच प्रतीक बब्बर आणि त्याची गर्लफ्रेंड सान्या सागर यांचं लखनऊमध्ये धूमधडाक्यात मराठी पद्धतीने लग्न झालं. या लग्नाला बब्बर कुटुंबियही उपस्थित होते. लग्नानंतर या दोघांनी मुंबईतही रिसेप्शन दिलं होतं. ज्याला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.