सोहा - कुणालची इनाया बनवते आहे पोळ्या, व्हिडिओ व्हायरल

सोहा - कुणालची इनाया बनवते आहे पोळ्या, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडमधील स्टार्स आणि त्यांची मुलं हा नेहमीच चर्चेचा विषय असतो आणि त्यातही जर करिना कपूर आणि सोहा अली खान असतील तर मग काही विचारायलाच नको. सध्या सोशल मीडियावर सोहा अली खान आणि कुणाल खेमूची गोंडस मुलगी इनायाचा (Inaaya Naumi Kemmu) पोळी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इनायाचे फोटो आणि व्हिडिओ सोहा नेहमीच शेअर करत असते. इनायाला नवाबी नाही तर अगदी सामान्य मुलीसारखंच सर्व प्रशिक्षण सोहा देत आहे. सोहा आणि कुणाल (Soha Ali Khan and Kunal Kemmu) तिच्यावर अगदी गायत्री मंत्र म्हणण्यापासून ते तिच्याबरोबर खेळण्यापर्यंतचे सर्व संस्कार उत्तम पार पाडत असल्याचंही दिसून येत आहे. इनाया दिसायला अत्यंत सुंदर असून बाहुलीसारखी आहे. त्यामुळे या लहान वयातही तिला खूपच चांगले फॅन फॉलोईंग आहे. सोहा अली खानने इनायाचा स्वयंपाकघरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये इनाया पोळी करताना दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी खूपच लाईक केले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. सोहा आणि कुणाल या दोघांचंही कौतुक चाहते करत आहेत.

या मराठी अभिनेत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांच्या मनावर सोडली छाप

इनाया करतेय स्वयंपाकघरात पोळ्या (चपाती)

इनाया अगदी सामान्य घरातील मुलींसारखी मन लावून पोळपाट लाटणं घेऊन पोळी करतानाचा व्हिडिओ सोहाने आपल्या  सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. महत्वाचं म्हणजे इनाया अगदी सराईत गृहिणीप्रमाणे पोळपाट लाटणं घेऊन गोल पोळी करत आहे. इतकंच नाही तर ती पोळी अगदी पिठात व्यवस्थित परतून पुन्हा व्यवस्थित लाटत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. इनायाचं तर कौतुक आहेच. पण तिला अशा प्रकारचं शिक्षण देत असल्यामुळे आणि अगदी सामान्य मुलीप्रमाणे वागवत  असल्यामुळे कुणाल आणि सोहाचंही विविध स्तरातून कौतुक होत आहे. स्वतः नवाब असूनही सोहा कधीही नवाबी थाट दाखवत नाही. तसेच संस्कार आता इनायालाही मिळत आहेत अशीच चर्चा आता सोशल मीडियावरही सुरू झाली आहे. सोहाने नेहमीच आपला वेगळेपणा दाखवून दिला आहे. सबा अली खान, सोहा अली खान आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे नवाब असूनही कधीही नवाबी थाट अथवा माज दाखवत नाहीत. यामध्ये सारा अली खानचंही (Sara Ali Khan) नाव जोडलं गेलं आहे. आपल्या संस्कारांशी अत्यंत नाळ जोडून हे सर्व जण वागतात आणि आता हीच शिकवण इनायालाही मिळत आहे याचं कौतुक चाहत्यांकडून होत आहे. 

कला आणि चित्रपटातील योगदानासाठी आर माधवनला मिळाला सन्मान

कुणाल आणि सोहाचे इनायावरील संस्कार

कुणाल आणि सोहा नेहमीच आपली मुलगी इनायवर योग्य  संस्कार करत असल्याचे दिसून आले आहे. इतकंच नाही तर कुणाल आणि इनायाचा अर्थात बापलेकीचा बाँडही सोहा नेहमी शेअर करत असते. मध्यंतरी विचित्र भाषेतील व्हिडिओ सोहाने शेअर केला होता. मात्र तो व्हिडिओ बघून सगळ्यांना हसूही आलं होतं आणि कुणाल आणि इनायमधील अप्रतिम बाँडही दिसून आला होता. मुलांशी मुलांप्रमाणे वागावं आणि त्यांच्या कलाने घेत त्यांना योग्य शिक्षण द्यावं ही जबाबदारी सोहा आणि कुणाल दोघेही अत्यंत अप्रतिमपणे पार पाडत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांचं नेहमीच कौतुक होत असतं. तसंच इनायाचे अन्य व्हिडिओ आणि फोटोही मीडियामध्ये व्हायरल होत असतात. पण इनायाचं वागणं लहान असूनही इतकं अदबशीर आणि अप्रतिम असतं की, सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला खूपच लाईक मिळतात आणि कमेंट्सही मिळतात. आता सोहा नक्की पुढे कोणता इनायाचा व्हिडिओ शेअर करणार याकडेही चाहत्यांचे नक्कीच लक्ष लागून राहिले असेल. कुणालने इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून काम सुरू केले होते.  त्यामुळे इनायादेखील काम करणार का असाही प्रश्न त्यांच्या  चाहत्यांना आहे. कारण इनाया इतकी छान  आहे की, ती कोणत्याही जाहिरातीमध्ये अथवा चित्रपटामध्ये काम करू शकेल असा विश्वास चाहत्यांना वाटतो आहे. 

ज्येष्ठ गीतकाराला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहा कक्करची मदत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक