इनायासह काढलेल्या फोटोवर सोहा अली खानला नेटकऱ्यांनी दिल्या वाईट कमेंट्स

इनायासह काढलेल्या फोटोवर सोहा अली खानला नेटकऱ्यांनी दिल्या वाईट कमेंट्स

सोहा अली खान नेहमीच आपली मुलगी इनाया खेमूबरोबर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. कुणाल, सोहा, इनाया आणि सैफ, करीना, तैमूर हे सध्या सगळेच लंडनमध्ये आहेत. रोज त्यांचे कोणते ना कोणते फोटो अथवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सोहाने पोस्ट केलेल्या एका फोटोवर नेटकऱ्यांनी अतिशय वाईट कमेंट्स द्यायला सुरुवात केली असून सोहाला ट्रोल करण्यात येत आहे. सोहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केल्यापासून तिला या कमेंट्सना सामोरं जावं लागत आहे. नेहमी चांगल्या कमेंट्स मिळवणाऱ्या सोहाला अशा गोष्टीसाठी सध्या ट्रोल करण्यात येत आहे. 

सोहाने इनायाबरोबरचा फोटो केला पोस्ट

View this post on Instagram

Babycino anyone?

A post shared by Soha (@sakpataudi) on

सोहाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये तिच्याबरोबर तिची मुलगी इनाया खेमूदेखील आहे. सोहाने फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेक नेटकऱ्यांच्या वाईट कमेंट्स यायला सुरुवात झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असं नक्की काय आहे या फोटोमध्ये? तर सोहाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती वयस्कर दिसत आहे. त्यावरूनच तिला ट्रोल करण्यात येत आहे. तिने फोटो पोस्ट करत कॅप्शन दिली, ‘Babycino Anyone?’ पण तिला असं वाटलंही नसेल की, आपल्याला अशा प्रकारच्या कमेंट्ना सामोरं जावं लागेल. यामध्ये अनेकांनी तिला ‘Old Face App’ वापरलं का असाही प्रश्न विचारला आहे. तर काहींनी तिला टेन्शन न घेता आयुष्य जगण्याचा सल्लाही दिला आहे. त्यापैकी एकाने तिला म्हटलं आहे की, ‘तू आधी किती सुंदर होतीस, आता इतकी वयस्कर का वाटायला लागली आहेस?’ तर एका व्यक्तीने तिला तिचं झिरो फिगर डाएट बंद करण्याचाही सल्ला दिला आहे. तर काहींनी तिला चेहऱ्यावर टेन्शन दाखवू देऊ नकोस असंही म्हटलं आहे. इतकंच नाही तर इनायाची तू आई नाहीस तर आजी वाटत आहेस अशीही कमेंट एका व्यक्तीने केली आहे. तर एका व्यक्तीने म्हटलं, ‘इतका सुंदर फोटो आहे पण तुम्ही इतक्या वयस्कर का दिसत आहात?’ सोहा या फोटोमध्ये वयस्कर दिसत असल्याचं बहुतांश नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तिला अशा कमेंट्स या फोटोवर येत आहेत. 

करिनालाही करण्यात आलं होतं ट्रोल

View this post on Instagram

Sun Kissed in Tuscany ❤️❤️🍷🍷🍷🍷

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

याआधी बऱ्याच सेलिब्रिटीजना वेगळं दिसण्याबद्दल अथवा थोडं वयस्कर वाटण्याबद्दल ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामध्ये मलायका अरोरा, गौरी खान, प्रियांका चोप्रा यांचाही समावेश आहे. इतकंच नाही तर सोहाची वहिनी अर्थात करिना कपूरलाही वयस्कर दिसत असल्यामुळे आधी ट्रोल करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच करिनाचा टुस्कानीमधील एक सनबाथिंगचा फोटो व्हायरल झाला. त्यावेळी तिलादेखील अशाच कमेंट्सना सामोरं जावं लागलं होतं. केवळ महिला सेलिब्रिटीज नाहीत तर अगदी शाहरूख खानसारख्या बॉलीवूडच्या बादशाहलाही अशा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. नेटकऱ्यांच्या अशा कमेंट्पासून कोणीही सुटलेलं नाही. सोहा सध्या कोणत्याही चित्रपटात काम करत नसून आपल्या मुलीची काळजी घेत आहे. पण तिने यावर कोणतंही भाष्य केलेलं अजून दिसून आलेलं नाही. याआधीदेखील ट्रोल झाल्यानंतर कधीही सोहाने भाष्य केलेलं नाही.