सोनाक्षी सिन्हा केलं होतं बॉलीवूड सेलिब्रिटीला डेट, केला खुलासा

सोनाक्षी सिन्हा केलं होतं बॉलीवूड सेलिब्रिटीला डेट, केला खुलासा

‘दबंग’ गर्ल सोनाक्षीने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. सोनाक्षी सिन्हाचा लवकर ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याचवेळी एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षीने मोठा खुलासा केला आहे. सोनाक्षीने बॉलीवूडमधील एका सेलिब्रिटीला डेट केलं होतं. पण याची कोणाला कल्पनाही आली नाही असं तिने सांगितलं आहे. याबद्दल कधीच कोणालाही कळलं नाही असंही सोनाक्षीने सांगितलं आहे. 

आई वडिलांना हवाय सुशील मुलगा

Instagram

सोनाक्षीलादेखील तिच्या नात्याबद्दल नेहमी वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येतात. सोनाक्षीला नक्की कोणत्या मुलाला डेट करायला आवडेल असंही तिला विचारण्यात येतं. यावेळी तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सोनाक्षीच्या आईवडिलांना तिने सुशील मुलाला डेट करावं असं वाटत आहे. पण तिच्या मते बॉलीवूडमध्ये असा कोणीही सुशील मुलगा नाही. तर याआधी आपण बॉलीवूडमधील मुलाला डेट केलं आहे असंही तिने सांगितलं. पण याबाबत कोणालाही काहीही माहीत नव्हतं असा खुलासाही तिने यावेळी केला आहे. पण सोनाक्षी सध्या कोणाला डेट करत नाहीये असंच तिने सांगितलं आहे. ती सध्या सुशील मुलाच्या शोधात असून तिच्या आईवडिलांनाही तिने लग्न करावं असं वाटत असल्याचं सांगितलं आहे. तर आपण कधी लग्न करणार हे आपणच सांगू असंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

सोनाक्षीबरोबर जोडलं गेलं होतं काही जणांचं नाव

Instagram

याआधी सोनाक्षीबरोबर बऱ्याच जणांची नावं जोडली गेली होती. यामध्ये शाहीद कपूरपासून ते बंटी सचदेवापर्यंत अनेक बॉलीवूडमधील लोकांचा समावेश आहे. बंटीबरोबर सोनाक्षीचं नाव जास्त काळापर्यंत जोडण्यात आलं होतं. पण याविषयी सोनाक्षीने यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. बंटी आपला चांगला मित्र असून त्याला डेट करत नसल्याचं सांगितलं होतं. तर राजकुमार चित्रपटाच्यावेळी शाहीद कपूरला सोनाक्षी डेट करत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यावेळी एका शो मध्ये हे दोघे एकत्रही दिसले होते. पण दोघांनीही कधीच हे कबूल केलं नाही. तर काही महिन्यापूर्वी सोनाक्षीचं नाव नवोदित अभिनेता झहीर इकबालबरोबरही जोडण्यात आलं होतं. पण यावरही सोनाक्षीने कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नव्हतं. 

सोनाक्षीला नात्यात धोका सहन होणार नाही

सोनाक्षीने या मुलाखतीमध्ये हे पण स्पष्ट केलं की, तिला नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका सहन होणार नाही. तिला जर कळलं की, तिचा बॉयफ्रेंड तिला फसवत आहे तर दुसऱ्या दिवशी तो नक्कीच जिवंत राहणार नाही असंही ती म्हणली. सोनाक्षी नात्याच्या बाबतीत अतिशय पझेसिव्ह असल्याचंही तिने सांगितलं आहे. दरम्यान सोनाक्षीचे ‘खानदानी शफाखाना’ हा 2 ऑगस्टला प्रदर्शित होणार असून यामध्ये तिच्यासह रॅपर बादशाह आणि वरूण शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. यामधून पहिल्यांदाच बादशाह पदार्पण करत आहे. तर 15 ऑगस्टला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बऱ्याच मोठ्या टीमसह सोनाक्षी काम करत आहे. अक्षय कुमार, शरमन जोशी, विद्या बालन, तापसी पन्नू अशी तगडी स्टारकास्ट सोनाक्षीबरोबर या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. एकाच महिन्यात सोनाक्षीचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत असून सध्या ती ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणातही व्यस्त आहे. एकूण सोनाक्षी सध्या खूपच व्यग्र आहे.