मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा अजून संपला नसून एका नंतर एक फंक्शन्स सुरूच आहेत. याच फंक्शनमधील आकाश आणि श्लोकाचं लग्नानंतरच प्रि रिसेप्शन फंक्शन (ज्याला मंगल पर्व म्हटलं जात आहे) ठेवण्यात आलं होतं. या फंक्शनला अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. या सर्व सेलेब्समध्ये एका चेहऱ्याला बघून सगळ्यांनीच म्हटलं गुड टू सी यू. ही व्यक्ती होती सोनाली बेंद्रे.
आकाश और श्लोका अंबानीच्या पोस्ट वेडींग फंक्शनमध्ये बॉलीवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे फोटोशूट मीडिया सेंटरवर पोचली आणि तिला बघून सगळेच अवाक झाले. असं यामुळे झालं कारण नुकतीच सोनालीने कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाला मात देत जीवनाची लढाई जिंकली. तेव्हा सोनालीला बघून सगळे म्हणाले ‘गुड टू सी यू’ ( Good to See U) तुला बघून बरं वाटलं.
कॅन्सरची ट्रीटमेंट घेऊन भारतात परत आल्यावर सोनाली पहिल्यांदाच फंक्शनमध्ये दिसली. आकाश अंबानीच्या पोस्ट वेडींग फंक्शनला सोनाली आपल्या नवऱ्याबरोबर गोल्डी बहलसोबत दिसली. सोनालीने या फंक्शनला लाल रंगाचा सोनेरी वर्क केलेला शेरवानी सूट घातला होता. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती. या फंक्शनमध्ये आपल्या सोबर आणि सिंपल लुकने सोनालीने सगळ्यांचच लक्ष वेधलं. सोनालीने खास फंक्शनसाठी हेअर विगही घातला होता, जो तिला खूपच सूट करत होता.