ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सोनाली बेंद्रे इज ‘बॅक’, शुटींगला केली सुरुवात

सोनाली बेंद्रे इज ‘बॅक’, शुटींगला केली सुरुवात

कॅन्सरवर उपचार घेऊन मुंबईत परतलेली सोनाली बेंद्रे आता पुन्हा एकदा कामासाठी सज्ज झाली आहे. तिने या संदर्भातील माहिती स्वत:च इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. तिच्या या धैर्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. आता ती कधी आणि कुठे दिसणार आहे याची उत्सुकता तिच्या फॅन्ससोबत आम्हलाही आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रसन्न तर दिसते आहेच. पण तिचा आत्मविश्वासही वाढलेला दिसत आहे. शिवाय तिचे किमोथेरपीमुळे गेलेले केसही हळुहळु येत आहेत हे कळत आहे. तिचा हा फोटो तिच्या आयुष्याच्या एका नवा पर्वाची सुरुवात आहे हे सांगणारा आहे. 

समीरा रेड्डीकडे आहे गुड न्यूज

सेटवर परतून आनंद

सोनालीने आपला फोटो शेअर करत एक भावूक पोस्टदेखील लिहिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने म्हटले  आहे की, एका मोठ्या प्रसंगातून मी बाहेर आले आहे. या काळात अनेक अडचणी आल्या. त्याला मी सामोरे गेले याचा मला आनंद आहे. या सगळ्या प्रसंगातून बाहेर पडत असताना मला माझ्या आयुष्याचा खरा अर्थ कळला आणि आता सेटवर परतल्यानंतर काम करण्यासाठी मी खूप उत्साही आहे.’’ या पोस्टमधून कामाचा उत्साह आणि जीवनाचा खरा अर्थ कळत आहे. या व्यतिरिक्त कॅन्सरवर उपचार घेण्याच्या कालावधीतही तिने तिचे अनेक फोटो शेअर केले आहे. या सगळ्या कठीण प्रसंगात दु:खी न होता त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे तिचे धैर्यच दिसून आले आहेत. त्यामुळेच तिच्या फॅन्सनाही हुरुप आला होता. तिच्या कॅन्सरनंतरच्या प्रत्येक पोस्टवर त्यांनी तिचा आत्मविश्वास वाढवला आहे. आता आनंदाची गोष्ट हीच की, सोनाली बेंद्रे परतली आहे आणि तिने शुटींगलादेखील सुरुवात केली आहे.तिने शेअर केलेला फोटो कोणत्यातरी सेटवरचा असावा असा अंदाज देखील अनेकांनी व्यक्त केला आहे.  

ADVERTISEMENT

पाहा सई ताम्हणकरच्या ‘पॉंडीचेरी’सिनेमाचे पोस्टर

वर्षभरापूर्वी झाला होता कॅन्सर

वर्षभरापूर्वी सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याची बातमी आली होती. या बातमीनंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता. उपचारासाठी ती तातडीने अमेरिकेला निघून गेली होती. उपचारादरम्यान किमोथेरपी घेत असल्यामुळे तिचे केसही गेले होते. केस नसलेले फोटोही तिने इन्स्टावर शेअर केले होते. तिला या काळात आधार देण्यासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही न्यूयॉर्कला पोहोचले होते. जर तुम्हाला आठवत असेल तर सोनालीला कॅन्सर होण्याआधी ती ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोच्य परीक्षकाची भूमिका साकारत होती. पण तो शो तिला इलाजासाठी मध्येच सोडावा लागला होता. तिच्या शोतून अचानक जाण्यामुळे हुमा कुरेशीने सोनालीची जागा घेत परीक्षकाची भूमिका पार पाडली. 

पु.ल. साकारण्यासाठी आणले तिरुपतीहून केस

ADVERTISEMENT

लग्नानंतर घेतला होता ब्रेक

सोनाली बेंद्रेने आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केली आहेत. तिने दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत लग्न केले. त्यानंतर ती सिनेमांपासून लांब राहिली. २०१३ साली ती पुन्हा पडद्यावर दिसली पण कॅमिओ रोलमधून.. ‘वन्स अपॉन अ टाईम ईन मुंबई दोबारा’मध्ये तिचा कॅमिओ होता. त्या आधी जिस देस मे गंगा रहती है, दिलजले, मेजर साहब, डुप्लीकेट, हमारा दिल आपके पास है अशा काही सिनेमांमधून उत्कृष्ट काम करत प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय तिने अनेक जाहिरातींमधून कामही केले आहे. तिचा गोड चेहरा आणि हसू आजही अनेकांच्या लक्षात आहे. 

(फोटो सौजन्य- Instagram)

03 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT