बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कॅन्सरसारख्या एका मोठ्या आजाराशी लढा देऊन परतली आहे. तिने हा आजारदेखील आपल्या आयुष्यात अगदी सकारात्मक दृष्टीने घेतला. कॅन्सर झाला आहे हे कळल्यानंतरही तिने हार न मानता लढा दिला. आता पुन्हा तिने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. नुकताच सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेचा नवा स्टनिंग लुक पाहायला मिळाला आहे. तिचा हा ग्लॅमरस अंदाज बऱ्याच लोकांसाठी नवी प्रेरणा देणारा ठरत आहे.
वास्तविक, सोनाली बेंद्रेने आपल्या आजारानंतर पुन्हा एकदा हिंमत दाखवत एक फॅशन फोटोशूट करून घेतलं आहे. या शूटदरम्यान सोनाली खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. या आजारावर मात केल्यानंतर सोनाली खूपच उत्साही दिसून येत आहे. शिवाय ती आपलं कुटुंब आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सध्या आपलं आयुष्य खूपच आनंदात घालवताना दिसत आहे.
सोनालीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हे फोटोशूट तिने एका मॅगझिनसाठी केलं आहे. यामध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे. एका फोटोसह तिने एक मेसेजदेखील आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. यामध्ये सोनालीने म्हटलं आहे की, ‘आपल्या आयुष्यातील अनुभव आपल्याला कशा प्रकारे बदलतात हे सांगण्याचा एक मार्ग नक्कीच नाही. सर्व झालेले बदल हे कदाचित दिसू शकत नाहीत. मी जे काही शिकले आहे, अनुभवलं आहे, तो हाच आहे की, मी माझ्या भूतकाळात रमू शकत नाही. तर मी स्वतःला सजून धजून लोकांसमोर जाणं नक्कीच अनुभवेन. या मॅगझिनच्या कव्हर शूटच्या निमित्ताने मी हेच तुमच्यापर्यंत पोहचवू इच्छित आहे.’ या मॅगझिन कव्हरच्या फोटोसाठी सोनालीने करड्या रंगाचा आऊटफिट घातला असून तो तिच्यावर खूपच शोभून दिसत आहे. तिचा हा स्टनिंग लुक सध्या व्हायरल होत आहे. या फोटोतील तिच्या चेहऱ्यावरील चमक ही कॅन्सरसारख्या आजारावर मात केल्याचा आनंद स्पष्ट दाखवून देत आहे.
सोशल मीडियावर सोनालीच्या चाहत्यांना तिची ही स्टाईल खूपच आवडत आहे. चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोनालीची ही नवी हेअरस्टाईल तिला खूपच छान दिसत आहे. आपल्या आजारावरील उपचारादरम्यानही सोनाली कधीच डगमगली नाही. तिने आपल्या तब्बेतीबद्दल वर्षभर आपल्या चाहत्यांना फोटो, व्हिडिओ आणि पत्राद्वारे माहिती दिली. त्याचबरोबर तिने अनेक अनुभवदेखील याकाळात शेअर केले.
याआधीदेखील सोनालीने एका फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. त्यावेळी सोनालीने आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्यामधील बदल कसा स्वीकारावा हे सांगितलं होतं. तिचा हा लुक त्यावेळी मॅगझिन शूटसाठी नक्कीच नॉर्मल नव्हता. पण तिच्यासाठी ते तिचं स्वतःचं खरं आयुष्य होतं.
सोनालीने 4 जुलै, 2018 रोजी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना तिला कॅन्सर असून खूपच पुढची स्टेज असल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार तिला युटेरसचा मेटास्टेटिक कॅन्सर होता. या आजारावर चौथ्या स्टेजप्रमाणे उपचार करण्यात आले होते. या सगळ्या परिस्थितीनंतरही सोनालीने कॅन्सरवर मात करत पुन्हा एकदा फोटोशूट सुरु केलं. बऱ्याच लोकांसाठी ती प्रेरणा ठरत आहे.
फोटो सौजन्य - Instagram
हेदेखील वाचा -
सोनाली बेंद्रे इज ‘बॅक’, शुटींगला केली सुरुवात
कॅन्सरवर मात करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं पहिलं 'फोटोशूट'