सोनाली कुलकर्णी नव्या भूमिकेत, ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे करणार निवेदन

सोनाली कुलकर्णी नव्या भूमिकेत,  ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे करणार निवेदन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे, ती आता क्राइम पेट्रोल सतर्क या आगळ्या वेगळ्या सीरीजचे निवेदन करणार आहे. जस्टिस रिलोडेड नावाच्या या आवृत्तीत व्यापक आणि गंभीर गुन्ह्याचे नाट्यमय सादरीकरण केले असून विविध आव्हानांमुळे त्यात रहस्य निर्माण होते. अखेरीस एका नव्या दृष्टीकोनातून त्याकडे पाहावे लागते. निवेदक म्हणून, सोनाली कुलकर्णी या भागात सतर्कतेचे इशारे आणि विचार प्रक्रियेत आवश्यक असलेल्या फेरबदलांबद्दल सांगणार आहे. हे कठीण असून विचार करण्यास प्रवृत्त करते. एखाद्या गुन्ह्याविरोधात तक्रार दाखल करणे किती महत्त्वाचे असते, याबाबतही ती जागृती करताना दिसेल.

श्रद्धा कपूर पहिल्यांदाच साकारणार डबल रोल, 'चालबाज इन लंडन'चा व्हिडिओ केला शेअर

सोनालीची ही नवी भूमिका

या नव्या भूमिकेबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी नुकतेच ‘क्राइम पेट्रोल’ च्या टीमसोबत काम सुरु केले आहे. टीम खूप अप्रतिम आहे. अशा उत्साही आणि परिपूर्ण टीमसोबत काम करताना परफॉर्मरची उंची वाढते. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एक बॅटरीसारखा आहे. तो सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावे, याबद्दल जबाबदार असले पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी करणार आहे. चला सजग आणि जबाबदार बनूया.” सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये काम केले आहे. सोनालीचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. तसंच सोनाली कुलकर्णी पटकन प्रेक्षकांशी कनेक्ट होते. त्यामुळे या सिरीजमधून नक्कीच सोनाली काहीतरी वेगळी भूमिका करत असून समाजामध्ये नक्की कोणत्या प्रकारची लोकं असतात हेदेखील ती समोर घेऊन येणार आहे. समाजात घडणाऱ्या घटना आणि त्या घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन किती महत्वाचा आहे हेदेखील यातून दिसून येणार आहे. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा हा अधिक मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे या समाजात वागताना कसे वागायला हवे आणि काय करायला हवे हे यातून स्पष्ट करण्याचा सोनालीचा प्रयत्न असणार आहे. जागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे. 

लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजीवर अमृता-पुष्करने मारला ताव

मराठीमध्येही अभिजित खांडकेकर करणार निवेदन

तर मराठीमध्येही असाच शो येत असून याचं  निवेदन प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर करणार आहे. याचेही प्रोमो सुरू झाले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिजितने आपल्या सोशल मीडियावर याचा प्रोमो शेअर केला आहे. गुन्हेगारी वाढत चालली आहे आणि असे अनेक चेहरे आहेत जे गुन्हे करून लपतात. त्यामुळे नक्की कसा गुन्हा केला जातो आणि आपण कसे सतर्क राहायला हवे याबाबत सर्व माहिती या दोन्ही शो मधून मिळणार आहे. क्राईम पेट्रोलचे आतापर्यंत अनेक भाग याआधीही करण्यात आले आहेत. जगात घडणाऱ्या घटना नक्की कशा घडतात त्याबाबत चित्रीकरण करून लोकांना सतर्क करण्याचे काम या शो द्वारे करण्यात येते. सोनाली आणि अभिजितच्या या शो ला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागेल. मराठीमध्येही असा शो सोनी घेऊन येत असल्याने प्रेक्षकांना नक्कीच या शो बद्दल कुतूहल आहे आणि उत्सुकताही आहे. 

बॉलीवूडवर कोरोनाचा गंभीर परिणाम, घर विकण्याची काहींवर आली वेळ

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक