सोनम कपूरने साजरा केला 34 वा वाढदिवस, मलायकाने वेधून घेतलं लक्ष

सोनम कपूरने साजरा केला 34 वा वाढदिवस, मलायकाने वेधून घेतलं लक्ष

सोनम कपूरने केवळ अनिल कपूरची मुलगी ही ओळख न ठेवता बॉलीवूडमधील फॅशनिस्टा ही आपली स्वतःची ओळख इतक्या वर्षात बनवली आहे. बॉलीवूडच्या या फॅशनिस्टाचा आज 34 वा वाढदिवस आहे. सोनमच्या वाढदिवसाची पार्टी शनिवार रात्रीपासून तिच्या घरी चालू आहे. आपल्या कुटुंब आणि अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींसह सोनमने रात्री वाढदिवस साजरा केला तर रविवारीही घरच्या आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी सोनमच्या घरी ब्रंच पार्टी ठेवण्यात आली. सोनम कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशचे फोटो तिचा पती आनंद आहुजानेदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रात्री सोनमने केक कापून आपला बर्थडे साजरा केला तेव्हा तिचे वडील अनिल कपूर, आई सुनीता कपूर, बहीण रिया कपूर, नवरा आनंद आहुजा, बेस्ट फ्रेंड डिझाईनर मसाबा गुप्ता आणि काही जवळचे मित्रमैत्रिणी हजर होते.


khushi


ब्रंच पार्टीमध्ये सेलेब्सची हजेरी


karisma


सोनम कपूरच्या ब्रंच पार्टीमध्ये अनेक सेलेब्सने हजेरी लावली. आपलं कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी सोनमने स्पेशल ब्रंच पार्टी ठेवली. यामध्ये जास्तीत जास्त सेलेब्सने वेस्टर्न कपडे घालून येणं पसंत केलं. करिष्मा कपूर, महीप कपूर, शनाया कपूर, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर या सगळ्यांनीच वेस्टर्नाइज्ड कपडे घालणं पसंत केलं. जान्हवी आणि अनन्या शॉर्ट कपडे घातले तर शनाया आणि खुशीने वनपिस घातले. करिष्माने रेड कपड्यांमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तर महीप कपूरने जिन्स आणि टॉपमध्ये पार्टीला जाणं पसंत केलं. तर वरूण धवनने अगदीच शॉर्ट जीन्स आणि कॅज्युअल गेटअपमध्ये पार्टीला जाणंं पसंत केलं.


varun %281%29


यावेळी वरूणबरोबर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालदेखील दिसली. करण जोहरने नेहमीप्रमाणे आपलं स्टाईल स्टेटमेंट जपलं. तर सोनमचा भाऊ अर्जुन कपूरनेदेखील अगदी साधंच राहणं पसंत केल्याचं दिसून येत आहे. सोनमने स्वतः पांढऱ्या रंगाचा टॉप आणि सिल्व्हर रंगाचा स्कर्ट घातला. तर रियाने रेड रंगाचा गाऊन परिधान केला. यावेळी सोनमने आपल्या घराबाहेर येऊन मीडियासाठी केकही कापला. यावेळी तिने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत मनापासून आभार मानले.


मलायकाने घेतलं लक्ष वेधून
 

 

 


View this post on Instagram


 

 

#malikaarora #karanjohar #sonamkapoor Birthday party #viralbhayani @viralbhayani


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
इतर सगळे जण वेस्टर्न कपड्यांमध्ये असताना लक्ष वेधून घेतलं ते मलायका अरोराने. इतर वेळी कायम वेस्टर्न कपड्यांमध्ये असणारी मलायका सोनमच्या वाढदिवसाला मात्र अगदी भारतीय साडी परिधान करून गेली. त्यामुळे तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. काही ट्रोलर्सने तर तिच्या या पेहरावाकडे बघून म्हटलं, नणंदेच्या वाढदिवसाला सासरी जायचं त्यामुळे मलायकाने साडी नेसली आहे. मलायका पांढऱ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. पण अन्य अगदी कुटुंबामधील सगळेच वेस्टर्न कपड्यांमध्ये असताना मलायकाने असं साडीत वाढदिवसाला जाणं बऱ्याच जणांना खटकत आहे. कारण कोणत्या तरी लग्नाला आल्याप्रमाणे मलायका सजून आलेली दिसून आली. मलायका आणि अर्जुन जरी वेगवेगळे आले असले तरीही आता त्यांचं नातं कोणाहीपासून लपून राहिलेलं नाही. त्यामुळे कपूर घराण्याची सून होण्यासाठी मलायका अशी वाढदिवसाला सजून आली नाही ना? असाही कयास आता सोशल मीडियावर काढला जात आहे.  


फोटो सौजन्य - Instagram, Manav Manglani, Viral Bhayani


हेदेखील वाचा - 


जितेंद्रच्या एका अटीमुळे मालिका क्वीन एकता कपूरने केलं नाही लग्न


दिशा पाटनीच्या हाॅट फोटोंवर वडिलांची काय असते प्रतिक्रिया, दिशाने केला खुलासा


गँगरेपच्या आरोपाखाली अटक झालेला मी नाही,करणने चुकीची बातमी देणाऱ्यांना दिल्या कान पिचक्या