टॅक्सीतला तो अनुभव आठवला की, सोनमच्या अंगावर येतो काटा

टॅक्सीतला तो अनुभव आठवला की, सोनमच्या अंगावर येतो काटा

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच सोशल मीडियावर एक्टीव्ह असते. ती सतत तिचे अपडेट्स आणि फोटोजही तिच्या फॅन्ससोबत शेअर करत असते. पण सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून चित्रपट आणि लाईमलाईटपासून दूरच आहे. कारण ती सध्या नवरा आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहत आहे. तिच्या लंडनमधील वास्तव्यादरम्यान तिला नुकत्याच एका वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. जो तिने तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला. त्या वाईट अनुभवाने ती इतकी वाईटरित्या घाबरली आहे की, आजही ती घटना आठवल्यावर तिच्या अंगावर काटे येतात. नेमकं काय झालं सोनमसोबत.

सोनमने ट्वीट केला तो वाईट अनुभव

सोनमने ट्वीट करत सांगितलं की, लंडनमधील एका टॅक्सी प्रवासात कॅब ड्राईव्हरने तिच्यासोबत खूपच वाईट वर्तुवणूक केली. ज्यावर टॅक्सी सर्व्हिसने काही प्रतिक्रियाही दिली नाही. ट्वीटमध्ये सोनम म्हणाली आहे की, 'हॅलो, मला आताच लंडनमध्ये एका टॅक्सी सर्व्हिसचा खूप वाईट अनुभव आला. तुम्हीही सावधान राहा. सर्वात योग्य आणि सुरक्षित आहे ते म्हणजे सार्वजनिक ट्रान्सपोर्ट. त्याचा वापर करा. मी खूपच घाबरले आहे. 

Instagram

सोनमने पुढे सांगितलं की, तो कॅब ड्रायव्हर मानसिकरित्या खूपच अस्थिर होता. तो तिच्यावर जोरजोरात ओरडत होता. तो प्रवास संपता संपता ती खूपच घाबरली होती. सोनमने तक्रार करत त्या कॅब कंपनीलाही ट्वीटमध्ये टॅग केलं आहे. या तक्रारीबाबत सोनमने लिहीलं आहे की, मी त्या कॅब कंपनीच्या एपवर जाऊन अनेक वेळा तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन डिस्कनेक्ट करण्यात आला. सोनमच्या तक्रारीच्या ट्वीटनंतर त्या टॅक्सी कंपनीने सोनमला संपर्क केला आणि लिहीलं की, या घटनेसाठी आम्ही सोनमची माफी मागतो. तुम्ही कृपया तुमचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर मेसेज करा म्हणजे आम्हाला या प्रकरणात लक्ष घालता येईल. यावर लंडनमधील बऱ्याच जणांनी ट्वीट केलं. तसंच सोनमच्या अनेक फॅन्सनी असंही म्हटलं की, कॅब सर्व्हिसकडून असंच दुर्लक्ष करण्यात आलं तर त्यांच्यावरून लोकांचा विश्वास उठेल. तुमच्या माहितीसाठी ही टॅक्सी सर्व्हिस भारतातसुद्धा आहे.

सोनमच्या फॅन्सनी व्यक्त केली चिंता

Instagram

सोनमने ट्वीटरवर हा वाईट अनुभव सांगताच तिच्या फॅन्सनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त करत तिची चौकशी केली. तर काहींनी तिची खिल्ली उडवत तिला ट्रोलही केलं आहे. काही दिवसांपूर्वी सोनमने तक्रारही केली होती की, प्रवासादरम्यान तिच्या बॅग्ज्स गायब झाल्या होत्या. 

कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास द झोया फॅक्टर या चित्रपटात तिला शेवटचं पाहण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी करिनाने सांगितलं की, सोनम कपूरसोबत सुपरहिट वीरे दी वेडिंगचा सिक्वल ती घेऊन येत आहे.

वाईट अनुभवांबाबत सेलेब्स होत आहेत व्यक्त

काही काळापूर्वी अभिनेता राहुल बोसनेही एका हॉटेलमधील महागड्या सर्व्हिसबाबत पोस्ट टाकली होती. त्यासोबतच आता अनेक सेलेब्स वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक समस्यांबाबत लोकांपुढे व्यक्त होत आहेत. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.