14 महिन्यांनंतर सोनम कपूर आणि नवऱ्यामधील दुरावा संपणार

14 महिन्यांनंतर सोनम कपूर आणि नवऱ्यामधील दुरावा संपणार

लग्नानंतर प्रत्येकीलाच सासरी जावं लागतं. मग ती अभिनेत्रीच का असेना. आता लग्नानंतर नवऱ्यापासून लांब राहणं शक्य तर नाही ना. दोघांनाही एकत्र राहणंच पसंत असतं. अभिनेत्री सोनम कपूरच्याबाबतीतही असंच काहीसं झालं आहे. मागच्या 14 महिन्यांपासून सोनम तिचा नवरा आनंद अहुजापासून वेगळी राहत आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात या दोघांचं लग्न झालं होतं. तेव्हा सोनम मुंबईत राहत होती आणि आनंद अहुजा लंडनमध्ये. त्याला भेटण्यासाठी सोनम लंडनच्या वाऱ्या करत असे. तर कधी आनंद मुंबईला येत असे. पण आता हे दोघंही या सगळ्याला कंटाळल्याचं दिसतंय आणि आता दोघांना एकत्र राहायचंय. 

मुंबईतलं घरही विकणार सोनम कपूर

सूत्रानुसार, सोनम कपूर मुंबईतील तिचा आलिशान फ्लॅट विकण्याच्या विचारात आहे. हा फ्लॅट तिने काही काळापूर्वी खरेदी केला होता. या बातमीनंतरच सोनम आता नवऱ्याकडे म्हणजे लंडनला शिफ्ट होत असल्याची चर्चा आहे. तसंच ती आणि आनंद लंडनच्या नॉटिंग हिलमध्ये प्रोपर्टी खरेदी करणाच्या बेतात आहे. जिकडे हे दोघं एकत्र राहतील. 

View this post on Instagram

Day 3

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

बातमीत आहे किती सत्यता

बॉलीवूड सेलिब्रिटीज नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. तशीच चर्चा सोनम कपूरच्या लंडन शिफ्टमध्ये होण्याबद्दल आहे. खरंतर सोनमच्या जवळच्या सूत्राचं म्हणणं आहे की, या बातमी पूर्णतः खरी नाही. सोनमही पक्की मुंबईकर असून तिचा पूर्णतः लंडनला शिफ्ट होण्याचा विचार नाही. हे कपल एकमेंकासाठी वेळ काढतात आणि शक्य असेल तेव्हा वेकेशनलाही जातात. 

कूल कपल सोनम आणि आनंद

बॉलीवूडमधील सेलिब्रिटीजपैकी सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद अहुजाची जोडी खूपच कूल आहे. या दोघांचंही लग्न मुंबईस्थित सोनमच्या घरी झालं होतं. कोणताही जास्त गाजावाजा न करता या दोघांचं लग्न झालं होतं. कारण तीन महिन्याआधीच सोनमची नात्याने काकू असणारी अभिनेत्री श्रीदेवी कपूर हिचं नुकतंच निधन झालं होतं. याचं भान ठेवत या दोघांनी लग्न केलं.

एकवर्षांनंतर हनिमून

लग्नानंतर सोनम कपूर आणि आनंद अहूजा आपापल्या कामात एवढे व्यस्त आहेत की, त्यांना हनिमूनला जायलाही वेळ मिळाला नव्हता. काही दिवसांपूर्वी हे जोडपं म्हणजे तब्बल एक वर्षानंतर ते दोघं जपानला हनिमूनसाठी गेले. आता मात्र त्यांना हा दुरावा सहन होत नाही. कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सोनम कपूर लवकरच झोया फॅक्टरमध्ये दिसणार आहे. या आधी ती डॅडी कूल अनिल कपूर आणि अभिनेता राजकुमार रावसोबतचा चित्रपट ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ मध्ये दिसली होती. 

हेही वाचा -

MeToo मध्ये अडकलेल्या राजकुमार हिरानीच्या मदतीला सोनम कपूर

विवेक ओबेरॉयचं ट्विट हे घृणास्पद आणि वर्गहीन, सोनम कपूरचं स्पष्ट मत

सोनम कपूरने साजरा केला 34 वा वाढदिवस, मलायकाने वेधून घेतलं लक्ष