सोनम कपूरने हॅलोविनसाठी केला मर्लिन मुनरो लुक, सोशल मीडियावर झाली ट्रोल

सोनम कपूरने हॅलोविनसाठी केला मर्लिन मुनरो लुक, सोशल मीडियावर झाली ट्रोल

अभिनेत्री सोनम कपूर तिच्या अभिनयापेक्षा फॅशन आणि ब्युटीस्टाईलसाठी जास्त लोकप्रिय आहे. सोनम सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ज्यामुळे ती तिचे विविध स्टायलिश लुक्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोनमने नुकताच एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या टीमने मेकअप आणि कठीण परिश्रम करून सोनमचा हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मुनरो लुक तयार केला आहे.  या लुकचा पूर्ण व्हिडिओ सोनमने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओवरून सोनमला युझर्सनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आणि विचित्र कंमेट्स सुद्धा दिल्या.

सोनम कपूरचा मर्लिन मुनरो लुक

सोनम कपूरने हा व्हिडिओ शेअर करत त्यासोबत शेअर केलं की, "माझी मर्लिन मुनरो मोंमेट...पाहा कशी सोनम कपूर आहुजा मर्लिन मुनरो झाली. टाईम लॅप्स पाहुन फसू नका. कारण मला या लुकसाठी इथे तासनतास बसून राहावं लागलं आहे आणि ही जादू केली आहे माझ्या टीमने.. ज्यामुळे हा रिझल्ट शेवटी मिळाला आहे"

सोनमने हा लुक हॅलोविन 2020 साजरा करण्यासाठी केला आहे. कोरोनामुळे हॅलोविन 2020 जगभरात अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. काही सेलिब्रेटीजनीं ड्रेस -अप होत आणि निरनिराळे लुक करत हा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा यासाठी भयानक आणि भीतीदायक लुक केले जातात. मात्र सोनम कपूर नेहमी हॅलोविनला बॉलीवूड,हॉलीवूड अभिनेत्रींचे आणि सुंदर लुक ट्राय करते. मागच्या वर्षी तिने अनारकली लुक केला होता. या वर्षी ती हॅलोविनला मर्लिन मुनरो झाली आहे. ज्यासाठी तिने ग्रे शेडचा ब्लॉंड हेअर कट, रेड लिपस्टिक असा लुक केला आहे. या लुकसाठी करण्यात आलेलं मेकअप ट्युटोरिअल तिने चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. 

सोनम झाली या लुकवरून ट्रोल -

मर्लिन मुनरो ही हॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री होती. जिचा मृत्यु तरूणवयात आणि रहस्यमय पद्धतीने झाला होता. या कारणासाठीच सोनमने हॉलोविनला हा लुक केला असावा. सोनमवर मर्लिन मुनरो लुक करण्यासाठी वास्तविक तिच्या मेकअप टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र हा लुक पाहुन सोनमचे चाहते मात्र फार खुष झालेले दिसत नाहीत. कारण काही युझर्सनी सोनमच्या लुकला लाईक केलं आहे मात्र काहींनी चक्क तिला विचित्रर कंमेट दिलेल्या आहेत. ट्रोलर्सनी या  व्हिडिओवर कंमेट केली आहे की, " तुझे विग लटकत आहे. त्याला आधी नीट फिक्स कर ताई"  काही ट्रोलर्संनी तिला चांगले फेस पेटिंग केले आहे असं म्हटलं आहे. ज्यामुळे सोनमचा हा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो चर्चेचा विषयदेखील बनला आहे.

सोनम नेहमीच अशा छोट्या मोठ्या कारणांसाठी सोशल मीडियावर ट्रोल होत असते. त्यामुळे तिला याबाबत विशेष काहीच वाटत नसावं. काही दिवसांपूर्वीच तिला सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणीदेखील तिला नेपोटिझमसाठी  ट्रोल करण्यात आलं होतं. या कारणासाठी काही युझर्सनी सोनमला इन्स्टावर अनफॉलो करण्यासही सुरूवात केली होती. 

तुम्ही देखील असे निरनिराळे लुक ट्राय करणार असाल तर त्यासाठी बेस्ट मेकअप प्रॉडक्ट अवश्य वापरा.

Beauty

Manish Malhotra Glitter Mascara Topcoat

INR 950 AT MyGlamm